Skip to main content

आई

लेखक अक्षय दुधाळ यांनी सोमवार, 10/04/2017 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आई जिचं प्रेम मोजता येत नाही ती आई... उगवत्या सूर्याची तेज आई... काटेरी वनातल नाजूक फुल आई... पावसाळ्यातली छत्री, थंडीतली शाल, उन्हाळ्यातली सावली जिच्या पदरात आहे ती आई पहिला श्वास म्हणजे आई... आयुष्याच्या पुस्तकातील पहिले पान आई... घरातल्या घरात गजबजलेल गाव आई... घराचा पाया, मंदिरातील देव आई... समईतून उजेड देणारा धागा आई... मायेचा फटका, जेवणातल मीठ आई... प्रश्नाला पडलेले उत्तर आई... बहिर्याचे कान लंगड्याचा पाय वासराची गाय तशी लेकराची माय आई... सरतही नाही आणि पुरतही नाही अशी जन्माची शिदोरी आई... कवितेची ओळ, गाण्याची चाल आई... आयुष्याच्या मुव्हीची डायरेक्टर आई... जिवंतपणी दिसनारं देवाच रूप आई आ

खरवस(बिन चीकाचा)

लेखक नूतन सावंत यांनी सोमवार, 10/04/2017 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
. लहानपणी खरवस एकतर घरच्या म्हणजे आजोळच्या गायींच्या चीकाचा असायचा,नाहीतर गोरेगावहून एक भय्याजी येत असत.ते आमच्याकडे आले की, वाटीभर चीक तसाच देत असत.तो कितव्या दिवसाचा आहे हेही सांगत असे आणि मग आई ठरवायची त्यात कितीपट दूध मिसळायचे ते.त्यात साखर किंवा गूळ,वेलचीपूड घालून एका मोठ्या पातेल्यात पाणी घालून, त्यात हे छोटे पातेले घालून,छोट्या आणिमोठ्या पातेल्यावर झाकण्या घालून स्टोव्हवर चढवले जाई.दहा पंधरा मिनिटातच वेलचीचा स्वाद दरवळू लागे,आई त्यात सुरीचे टोक बुडवून पाही.आईचे समाधान झाले की, भावाची घासाघीस सुरु होई.भय्याज

टायपो ( कथा )

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 10/04/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
टायपो ( कथा ) ( काल्पनीक ) घनदाट जंगलांनी व्यापलेला अ‍ॅमॅझॉन खो-याचा विस्तीर्ण आणी तेवढाच दुर्गम भुभाग . या जंगलामधे अनेक नरभक्षक रानटी टोळ्या , जंगली हिंस्त्र श्वापदे यांचा कितीतरी शतकांपासुन वावर आहे . किवागो ही या रानटी टोळ्यांमधली एक शक्तीशाली जमात . किवागो योद्धे हे कायम आपल्या हद्दीच्या रक्षणासाठी विषारी तीरकामठे घेउन पहारा देत असत . कुणा इतर टोळीने येथे प्रवेश करायचा प्रयत्न जरी केला तरी त्यांची खैर नसे . किवागो योद्धयांच्या विषारी बाणांना ते एका क्षणात बळी पडत . दिवस संपुन हळुहळु अंधार पडु लागला होता . नेहमीप्रमाणेच किवागो योद्धे आपल्या हद्दीवर डोळ्यात तेल घालुन पहारा देत होते .

होम ब्र्युड ऑरगॅनिक पायनापल वाईन – अन तीन शिलेदार !!

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी सोमवार, 10/04/2017 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
तर असं की मी (ज्याक), बाबा योगीराज अन डॉक श्रीहास राहतो या थर्ड वर्ल्ड मधल्या अत्यंत म्हणजे अत्यंतच पुढारलेल्या औरंगाबाद नामक शहरात. इथे खानपान अन इंटरमेंट ची ईतकी म्हणजे ईतकी फार-फार ठिकाणं असल्याने सारखं सारखं बाहेरचंच खाऊन घरी काय करता येईल याचा विचार चालला होता, अन तेव्हाच ठरलं, (म्हणजे मी ठरवलं अन बाकीच्यांनी अनुमोदन दिलं). की हो, घरी “वाईन” तयार करायची. सुरुवातीला शिलेदारांना हे जमेल की नाही वाटलं, पण जमेल, करून तर बघू, जमली तर वाईन नाहीतर सरबत, हाकानाका?
Taxonomy upgrade extras

वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 10/04/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
डिअर ऑल, अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल. वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे. यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल.

नाशिकचा औद्योगिक इतिहास : १

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 10/04/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलपेनच्या टाचणी सारख्या छोट्या तोंडापासून विमानापर्यंत हजारो उत्पादने बनवणाऱ्या नाशिकची एक औद्योगिक नगरी म्हणून जगभर आज ख्याती आहे. नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमधून मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या जवळ जवळ सगळ्या उत्पादनाची निर्मिती आज नाशिक मध्ये होते. गंमत अशी आहे की देशांतर्गत जवळपास सगळ्या महत्वाच्या शहरांना रस्ते रेल्वे यांनी जोडलेल्या नाशिकची मुख्यत्वे उद्योगामुळेच अखिल विश्वाशी जरी अलगद नाळ आता जोडली गेली असली तरी नाशिकने आपलं गावपण छान जपलंय. त्यामुळे नाशिकचा आजवरचा औद्योगिक इतिहास आणि भविष्याकडे होणारी वाटचाल हा एक छान चिंतनाचा, अभ्यासाचा विषय होऊ शकतो.

अंजलीची गोष्ट - संवेदना .... सहवेदना

लेखक aanandinee यांनी सोमवार, 10/04/2017 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
"डॉक्टर, आत येऊ?" दरवाज्यातून आवाज आला. "हं, ये" अंजलीने पाहिलं काल रात्री डिलिव्हरी झालेली १२ नंबरची पेशंट आली होती. "अगं चालून का आलीस तू? काही होतंय का?" अंजलीने काळजीने विचारलं. "बस आधी". राधा समोरच्या खुर्चीवर बसली. राधा परवा डिलिव्हरी साठी बायकांच्या वॉर्डमध्ये ऍडमिट झाली होती. घरची परिस्थिती बरी होती म्हणून स्पेशल रूम घेतली होती. काल रात्री नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ बाळंतीण दोघेही व्यवस्थित होते. पहिलंच बाळ, त्त्यामुळे घरच्यांमधे आनंदी आनंद होता. "बाळ कुठे आहे?" अंजलीने विचारलं.

आईस क्रिम

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 10/04/2017 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बालपणी " वाडीलाल..अमुल..वॉल्स"असे ब्रान्डेड आईसक्रिम नसायचे... सुट्या लागल्या कि पॉट भा्डयानी आणायचा..्बर्फ आणायचा...खडे मिठ..आणायचे.. घरचे दुध साखर..त्यात आंबे वा कलिंगड घालुन ते मिश्रण पॉट मधे घालायचे बाजुनी बर्फ ्मिठ घालुन पोराना बसवायचे फिर्वायला.... फिरवताना जड जायला लागले कि समजायचे आईस क्रिम तयार झाले... मग आतले भांडे अलगद बाहेर काढायचे..अन मस्त आईस क्रिम चापायचे.. आईस क्रिम फिरवत असताना ह्याच्या शर्टाच्या आत बर्फ टाक अश्या मज्या मस्करी चालायच्या .

नको तेवढे सत्य..... सत्यानाश !

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 10/04/2017 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी शिकविले होते, बोलावे नेहमी खरे मनात एक ओठात दुसरे, हे वागणे नाही बरे ..... आता वाटते, असे सांगणे होते कां खरेच चांगले? मनातले खरे ऐकून झालेय कधी कोणाचे भले? ..... कालच असे झाले, नवीन साडी होती नेसली पदर आखूड वाटला, सैलसर वेढे होते खाली ..... कंटाळा आला ठीक करायचा, म्हटले ह्याना विचारू अहो, चांगली दिसतेय, की पुन्हा नेसून सुधारू? .... हे तरी अस्से नां, एरवी पुस्तकात डोके खुपसून आज मात्र नेमके ह्यांनी पाहिले नीट लक्ष देऊन .... “शी शी अग काय हे कशी नेसलीय भोंगळ म्हणतील तुला मैत्रिणी किती ही अजागळ .... तुझी ती सरिता बघ, कशी साडी नेसते चोपून बघणारे सुद्धा बघतात सारखे सारखे मागे
काव्यरस

भाजलेल्या कैरीचे रायते

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 10/04/2017 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
बय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी!! साहित्यः २/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट raita कृती: कैय्रा धुवा, पुसून कोरड्या करा. निखाय्रात किंवा मध्यम आचेवर कैय्रा भाजून घ्या. गार होऊ द्या. साल सोलून गर काढून घ्या.