Skip to main content

ॐ नम: शिवाय

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 28/04/2017 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
देवाधिदेव महादेव स्मशानात बसलेले असतात... त्यांचे गण बेभान होऊन ॐ नम: शिवाय म्हणत नाचतं असतात.. शिवरात्र असते...महादेव आपल्या भक्ता समवेत,,शिवरात्रीचा आनंद लुटत असतात..अनेक भक्त महादेवाच्या भेटीस येत असतात.. त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घेत असतात.. असाच एक बुद्धिवादी भक्त महादेवाच्या भेटीला आला... उघडे नागडे भस्म चर्चित अनेक गण बेभान होऊन नाचत होते.. ते पहाताच तो महादेवास म्हणाला स्वामी आपण ब्रह्मांड निर्मिते..सा-या तंत्र विद्ये चे आपण जनक.. अन अश्या उघड्या नागड्या गांजेशस गणात आपण कसे रमता?

विनोद खन्ना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 28/04/2017 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज विनोद खन्ना आपल्या मध्ये नाहीत एक आठवण ...... गोष्ट जुनी आहे.. अभिनेता विनोद खन्ना यांच्या आयुष्यातला नाजुक काळ होता तो पत्नी गीतांजली बरोबर फाटले होते.. स्मिता पाटील त्यांच्या जवळ येत होती.. त्या सुमारात विनोद ओशो कडे सल्ल्या साठी गेले होते.. आपली समस्या सांगितल्यावर भगवान ओशो म्हणाले.. "फिल्म जीवन मे तो आप ऍक्टींग कर रहे हो उसे जीवन समजो और निजी जीवन जो जि रहे हो उसमे ऍक्टींग करो" Act like you are living life Live life like you are acting ................................ मनका मित मध्ये ब्रेक मिळाला अन विनोद खन्ना उदयास आला तशी लिना चंदावरकर पण.. तिला पण ब्रेक याच सिनेमात मिळाला

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 27/04/2017 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता? परमार्थाच्या आवरणाखाली लपवलेला पण सदासर्वकाळ जागृत असलेला स्वार्थ; पुनर्जन्म संकल्पनेतुन स्वकेंद्री बनलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या वर्तुळांचा बनलेला समाज; जन्माधारीत जातीव्यवस्थेतून तयार झालेली शोषणमूलक समाजव्यवस्था; दैवतीकरण, बालविवाह, हुंडा व सतीप्रथा या सर्वांतून होणारे स्त्रीशोषण आणि कामसूत्राचा इतिहास असूनही लैंगिक संबंधांमध्ये असलेला चोरटेपणा; हे सर्व आपले पूर्वसंचित होते.

शेक्सपिअरचे “यक्ष”गान

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 27/04/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
"द टेम्पेस्ट –(झंझावात)". भाषाप्रभू शेक्सपिअरच्या साहित्यिक कारकिर्दीतले त्याचं (बहुधा) हे शेवटचं नाटक. त्याच्या इतर प्रत्येक कलाकृती सारखंच - मानवी जीवनाची व्यामिश्रता अन सद्-असद भाव-भावनांचे कंगोरे अलगद उलगडून दाखवणारं. त्याची प्रत्येक कलाकृती त्रिपुरीच्या दीपमाळेसारखी उजळलेली,भुरळ घालणारी. त्या दीपमाळेतला मला भुरळ घालणारा एक छोटासा दीप म्हणजे हे “यक्ष”गान. या नाटकात “एरियल” नावाचा एक यक्ष आहे. समुद्री झंजावातात नष्ट झालेल्या जहाजात आपला पिता मृत्यू पावलाय अशी समजूत झालेल्या नेपल्सच्या राजपुत्राचे सांत्वन करताना हा यक्ष ही कविता म्हणतो. ही कविता म्हणजे केवळ सांत्वन नाही.

जन पळभर करतिल हाय हाय

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 27/04/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
भा रा ताम्ब्यान्ची क्षमा मागून _/\_ जन पळभर करतिल हाय हाय (एका मुम्बई लोकल मध्ये ऑफीस गर्दीच्या वेळी प्रवास करणार्‍या चाकरमान्याच्या मनस्थितीचे वर्णन) (डब्यात चढण्या पूर्वीच्या स्थितीचे वर्णन) जन पळभर करतिल, 'हाय हाय !' (कुणी उद्धरतील हे आय माय) डब्या शिरता खन्त काय ? (डब्याच्या पॅसेज मधल्या स्थितीचे वर्णन) कुणी ढकलतील, कूणी सरकतिल; सारे अपुला मार्ग आचरतिल, तसेच सारे खडे राहतिल, असेच पन्खे बन्द राहतिल ? लोक भान्डतिल, कर्ण पिकतिल, रागाने या शिव्या वाहतिल पुन्हा विजारी डाग उमटतिल, पुन्हा पायावर हेच पाय ? (आसनस्थ झाल्या नन्तरच्या स्थितीचे वर्णन) सखेसोयरे घर्म पुसतिल, स्कन्धी कुणीतरी (अपुले
काव्यरस

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |३|

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 26/04/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
इतकी प्रदीर्घ शेरोशायरी आजपावेतो कोणत्याही गज़ल पूर्वी झालेली नाही. पण हीच फैझची ख़ासियत आहे. त्याच्या सृजनात्मकतेचा ठाव घेता येत नाही. प्रत्येक ओळीगणिक तो आणखी जादूमय होत जातो आणि नशेची खुमारी वाढत जाते. कल जो पी थी अजी, ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही | प्रियकर प्रेयसीला समजावतोयं, मला जी नशा आहे ती कालच्या दारुची आहे. आज, तुझी शपथ, मी प्यालेलो नाही ! ________________ आज कुछ तो नशा, आपकी बात का है, और थोडा नशा, धिमी बरसात का है, हमें आप यूं ही, शराबी न कही ये, ये दिलपे असर, तो मुलाक़ात का, ...

मनाची मनोगते

लेखक चंद्रकांत यांनी बुधवार, 26/04/2017 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातील कुणीही मी: तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील अक्षरे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडाशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात आपल्यापर्यंत, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विरलेले अध्याय नव्याने वाचले जातात आणि आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात.

एक भटकंती रानवाटांची...

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 26/04/2017 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, आज गोष्ट सांगणार आहे माझ्या लोहोपे तलाव भेटीची. तर झाले असे कि, 50x7 हे आव्हान तीळसे येथील शिवमंदिराला भेट देऊन पूर्ण केल्यानंतर अस्मादिकांनी तानसा जलाशयावर स्वारी नेण्याचे आयोजिले होते मागच्या रविवारी. परंतु ऐन वेळी आमचे सहप्रवासी घोडेस्वार परगावी गेल्यामुळे तानसा अभयारण्य आणि प्रचंड जलाशयाला एकट्याने भेट द्यायचे धाडस होईना म्हणून आम्ही वेळेवर पंचक्रोशीतील गणेशपुरी-वज्रेश्वरी-अकलोली हि गरम पाण्याच्या कुंडांसाठी प्रसिद्ध तीर्थस्थळे पाहण्याचे योजिले.