Skip to main content

हाऊ टू लीव अँड डाय : खुशवंत सिंग !

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 07/05/2017 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
खुशवंत, सिंग वन-शॉर्ट-ऑफ अ सेंश्युरी वर बाद झाले. त्यांनी आनंदानं जगायला (आणि मरायला) नक्की काय लागतं याची १० सूत्रं मांडली. मध्यंतरी याचा एक वॉटस-अ‍ॅप फॉरवर्ड पण फिरत होता. तरीही ही सूत्रं वाचून आंमलात आणण्याजोगी नक्कीच आहेत, त्या निमित्तानं हा लेखनप्रपंच ! खुशवंत म्हणतात, मी अनेकदा सुख नक्की कशात आहे, माणसाला सुखानं जगायला नक्की काय करायला हवं याचा विचार केलायं. १) तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शरीरस्वास्थ्य ! जर शरीरस्वास्थ्य नसेल तर माणूस सुखी होऊ शकत नाही. साधीशी का असेना, एखादी जरी व्याधी असेल तर ती जगण्याचं सुख कमी करते. २) दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिकस्वास्थ्य !

लोकलट्रेन प्रवाशाच्या रोजनिशीतील एक पान.

लेखक सचिन काळे यांनी शनिवार, 06/05/2017 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं.

काही किस्से असे तसे !!! भाग १

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 06/05/2017 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी आम्हाला ड्रायविंग ची फार हौस होती . म्हणजे गुजरात , कर्नाटक ,मध्य प्रदेश अश्या ठिकाणी कामासाठी जायचं असेल तर अगदी विमानाचं तिकीट कॅन्सल करून पेट्रोल च्या पैश्यात ते ऍडजेस्ट करून निवांत गाडी चालवत जायचो . (मित्र असताना तर लडाख पर्यंत पण गेलोय )हे एकटा असतानाचं सांगतोय. बाकी खर्च स्वतःचा गाडी चालवताना .पण मजा यायची निरीक्षण करत चालवायला .हॉटेल वैगरे बुक असायचीच कंपनी कडून . तर एकदा चंद्रपूर च्या पॉवर प्लांट साठी माझ्यावर जबाबदारी आली . म्हणजे बाहेर जायचं परदेशात परत यायचं आठवड्याभरात मग चंद्रपूर ला जायचं .१-२ वेळा नागपूर ला विमानातून उतरून गेलो चंद्रपूर ला .

कथुकल्या ६ (गूढ, रहस्य विशेष)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 06/05/2017 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
१. शेरलॉक अन फाशीचा दोर टॉक... टॉक… टॉक… टॉक काळ क्षणाक्षणाला पुढे सरकत होता, मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येत होता. सेकंदकाटा आपल्या काळजावर आघात करतोय असं शेरलॉकला वाटत होतं. अर्थात याची त्याला सवय होती. स्कॉटलंड यार्ड त्याला बऱ्याचदा उशीराच बोलवायची. कित्येक केसेस त्याने शेवटच्या काही क्षणांत सोडवल्या होत्या. आजही तसं होऊ शकलं असतं. त्याने डोळे उघडून समोर पाहिलं. पंचवीस वर्षांचा तरुण मुलगा त्याच्याकडे आशेने बघत होता. त्याच्या डोक्यावर फाशीचा दोर लटकत होता. कसायाने त्याचे दोन्ही हात समोर घेऊन चामड्याच्या पट्ट्याने बांधायला सुरुवात केली.

ये कश्मीर है - दिवस चौथा - १२ मे

लेखक एक_वात्रट यांनी शनिवार, 06/05/2017 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी उठलो आणि नेहमीच्या सवयीने खिडकीबाहेर एक नजर टाकली.बाहेरचे दृश्य फारसे उत्साहवर्धक नव्हते. आकाशात ढग दाटून आले होते आणि हवा पावसाळी होती. मी खोलीबाहेर पडलो आणि हाऊसबोटीत एक फेरी मारली.

संध्याराणी

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी शनिवार, 06/05/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
निष्पाप कळी तुटताना गहिवरली संध्याराणी हलक्याच प्रकाशामध्ये डोळ्यांतुन झरले पाणी पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या फुललेली हजार पुष्पे आक्रंदती मुक बिचारी नटलेल्या वनराईच्या ही कशी अवकळा दारी विणलेली अपार स्वप्ने संध्येने कळीच्याभवती दुष्टांच्या पुरवित मोहा नियतीला पर्वा नव्हती गतिमान परि काळाची अविरत धावती चाके सारुन पुन्हा तिमिराला तेजोमय प्रकाश फाके संध्येची बनली रजनी उधळीत तमाच्
काव्यरस

"जलजीवा" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 06/05/2017 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपणास माहीतच आहे की 1 Jan 2011 ते 19 Feb 2011 या कालावधीत मी "जलजीवा" ही सायन्स फिक्शन, थ्रिलर/फँटसी कादंबरी लिहिली होती. ती मायबोली आणि मिसळपाव या वेबसाईटस वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती आणि जगभरातील अनेक मराठी वाचकांना ती आवडली होती आणि तशा प्रतिक्रियासुद्धा मला आल्या होत्या आणि अजूनही येत असतात. 2016 साली ती बुकस्ट्रकने ती प्रकाशित केली आणि त्यापाठोपाठ ईसाहित्य.डॉटकॉम तसेच डेलीहंटने पण ती प्रकाशित केली. तसेच गुगल प्लेस्टोर वर सुद्धा ती उपलब्ध आहे.

अनवट किल्ले ६: तुंगारेश्वराच्या वनात ,कामणदुर्ग (Kamandurg )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 05/05/2017 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
वसई शहराच्या पुर्वेला सरासरी २१०० फुट उंचीची सदाहरीत जंगलाने वेढलेली एक डोंगररांग आहे. हि आहे तुंगारेश्वर रांग. याच डोंगररांगेत आहेत वनदुर्ग म्हणावे असे दोन कस पाहणारे किल्ले, कामणदुर्ग व गुमतारा. यातल्या कामणदुर्गाला आज भेट द्यायची आहे.

मी, माझी बायको आणि बायकोच्या ३ सवती

लेखक OBAMA80 यांनी शुक्रवार, 05/05/2017 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी, माझी बायको आणि बायकोच्या ३ सवती ------------------------------------------------------------------------------ काहीही हं… भाऊजी!!! करमणूक या नावाखाली असली काही नावे निवडली की आपण वाचकांची करमणूक करतो आहोत असे वाटते का तुला?? इश्श... भाऊजी, तुम्ही पण??? या काय गोष्टी आहेत का, चार लोकांत बोलण्या आणि लिहिण्याच्या. हे विषय घरातल्या घरात मिटवायचे असतात. माझ्या या लेखाचे शीर्षक वाचून, सज्जन व्यक्तिमत्व म्हणून मला जवळून ओळखणारे नक्कीच अशा काही टिप्पणी करतील.

मेंदू, भावना व वर्तणूक (२)

लेखक मंजूताई यांनी शुक्रवार, 05/05/2017 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आधी म्टहल्याप्रमाणे आपला मेंदू एक सामाजिक संस्था आहे. प्रत्येक सेल्सची जागा ठरलेली आहे, अचूक कामाची विभागणी, कामाच्या स्वरूपानुरूप कर्मचाऱ्यांची संख्या असते. गंमत म्हणजे त्यांच्यात ना स्पर्धा असते ना भांडणं ! निमूटपणे आपआपलं स्वशिस्तीत काम करत असतात. असा हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव ‘मेंदू’ म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. अमेरिकन न्युरॉलॉजिस्ट ऑलीव्हर सॅक्स ह्यांनी ‘न्युरॉलॉजी ऑफ आयडेंटिटी’ संकल्पना मांडली आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत व त्या पुस्तकांवरून सिनेमेही बनवल्या गेलेत.