डावचीच्चाक.. अर्थात कच्चा चिवडा..
तर मंडळी .. हा पदार्थ संध्याकाळी 'काहीतरी खावंसं वाटतंय पण काय ते कळत नै' अशा वेळेला करायचा. आमच्या घरी 5-6 च्या दरम्यान नुसती आई म्हणून हाक मारली तरी मातोश्री विचारतात.. 'हं, मग काय करून देऊ?' 'ते नै माहीत. पण दे काहीतरी करून.' इति आम्ही.. आणि मग कच्च्या चिवड्याचा बेत ठरतो..
सर्वप्रथम पातळ पोहे आणि मुरमुरे एकत्र करून घ्यावे. त्यात बाजूने कांदा आणि कोथिंबीर टाकायची.
सर्वप्रथम पातळ पोहे आणि मुरमुरे एकत्र करून घ्यावे. त्यात बाजूने कांदा आणि कोथिंबीर टाकायची.अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग १
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह!! बंगालच्या उपसागरात असणारी भारताची पाचूची बेटं!! निळाशार समुद्र, गर्द वृक्षराजी , अफाट सागरी संपत्ती आणि निसर्ग हेच डोळ्यांसमोर येतं. याच्या जोडीने सेल्युलर जेल आणि सावरकरांमुळेही आपण या बेटांशी जोडलो गेलो असतो. मलाही सावरकर आणि इतर राजबंदी , त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा या सगळ्यामुळे अंदमान ची पहिली ओळख झाली होती. आणि तेव्हापासुनच या जागेला भेट द्यायची इच्छा होती. तो योग या महिन्यात आला.
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाबद्दल जालावर अनेकांनी लिहिलय.
किस्सा-ए-कोकण रेल्वे
चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे, मँगलोर एक्स्प्रेस ने मी ठाण्याहुन कणकवली ला निघालो होतो. आयत्या वेळी बेत ठरल्या मुळे, रेइजर्वेशन कन्फ़र्म होणे शक्य नव्हते, म्हणुन टाईम्स ऑफ़ वींडीया घेत्ल आणि. निघलो. S ३ च्या दारत शिरलो. टीसी महाशयांना सीट साठी हटकल तर साहेबनि असा काय लूक दीला कि त्यांच्याशी सोयरिकच करायला मागत होतो. मग सोबत घेतलेल टाईम्स ऑफ़ वींडीया दारा कडे अंथरला आणि बैठक जमवली.
गाडी १०.३० च्या सुमारास ठाण्याहुन सुटली, दोन तीन प्रवासी सामान घेउन धावाधाव करत होते. गाडी पारसीक बोगद्याच्या बाहेर पडल्यावर माझ्या शेजरी अजुन एक जण पेपर टाकुन बसला.
शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ५
दिवस पाचवा ...
"पहाटे जर का मोबाईलच्या गजराने दोघांनाही जाग आली नाही तर परत फियास्को" हे स्वतः च्या मनाला व आमच्या मुलींच्या ममाला दोघानाही बजावले. आमची तिकिटे " नो चेंज -नो कॅन्सलेशन" अशी होती. आम्हाला फ्लॅरेन्सला नेणारी गाडी रोमवरून सुटणारी नव्हती. ही शामभट्टाची गाडी नेपल्स वरून येऊन मिलान ला जाणारी नाईट (नोट्टे) ट्रेन होती. पहाटे पाचला उठून मेट्रो स्टेशन गाठले.रोमची मेट्रो सेवा सकाळी ०५३० वाजता सुरू होते. पहिलीच ट्रेन मिळाली.
अनवट किल्ले १०: गगनगिरी महाराजांचा गगनगड ( Gagangad)
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. तपस्येच्या काळात संसारीक अडचणी नकोत व साधनेत कुणाचा व्यत्यय नको यासाठी बर्याच संतानी गिरीशिखरांचा किंवा कुहरांचा आश्रय घेतलेला दिसतो. योगी चांगदेवानी हरिश्चंद्रगडावर तप केले, एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार होते, गोरखनाथांनी गोरखगडावर तप केले असे मानले जाते, तुकारामांनी भंडारा डोंगरावर तप केले, तर रामदासांच्या निरनिराळ्या घळी प्रसिध्द आहेतच, पण त्यांनी समाधीही सज्जनगडावर घेतली.
पैलवान-२
पैलवान-१
"ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू...
'संगीतज्ञानी इळैयाराजा'
ते ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत.
BBC ने घेतलेल्या सर्वेक्षणात ते भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले.त्यांच्या 'दलपति' या सिनेमातलं 'रक्कम्मा कय्य थट्टू' हे जगातलं ૪ थ्या क्रमांकाचं सार्वकालीन पसंती दिलेलं गीत!
६००० पेक्षा अधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.१००० पेक्षा अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं.एस.जानकी,के.जे.येसुदास,चित्रा,एस पी बालसुब्रह्मण्यम् हे त्यांचे आवडते गायक.यांच्यासोबत सर्वाधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत!
तमिळ लोकसंगीत यांनी जागतिक पातळीवर नेलं.पारंपारीक तमिळ वाद्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाद्येही फार सुंदर पध्दती
झिन झनन निनादत होते
शब्दांचे इमले रचता
रचता मी इथवर आलो
पण वीट वीट कोसळता
नि:शब्द, खोल मी उरलो
त्यावेळी जखमी अवघे
भवताल सोबती होते
विझत्या शब्दांच्या संगे
झिन झनन निनादत होते
शब्दांच्या विझत्या ज्योती
उतरती गडद डोहात
तरि नाद कुठुन हे येती
जणु पैंजण रुणझुणतात
-मी काठावर, की मीच खोल डोहात?
-की रुणझुणतो मी, पैंजण होऊन त्यात?
काव्यरस
ऊन
दिवसाचा ताप संपला
कि ऊन उदास होऊन
कोपऱ्यात एकटे बसते.
आपण कुणासाठी सावली
झालो नाही म्हणून
हुरहुरते, हळहळते.
अंधारात गडप होऊन
पाण्यापलीकडचे मृगजळ
शोधू लागते.
-शिवकन्या
काव्यरस
मिसळपाव