Skip to main content

मराठी माणसा झोपलाच राहा

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी शनिवार, 08/07/2017 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसा झोपलाच राहा पॅसे मिळविण्या मात्र तत्पर राहा घरिदारी अन बाजारीही जातीपातीचे राजकारण करी नको तेथे अध्यात्म लावुनी विसरुनी जा तू दिव्य लक्ष्मी हरलास जरी जीवनी तू अध्यात्माचे धडे गिरवी तू वास्तवाचे भान सोडुनी नवा मार्ग शोधू नको तू मिळणाऱ्याचा द्वेष करी तू बाणा आपुला सोडू नको तू बदलू अथवा पेटू नको तू आस प्रगतीची ठेवू नको तू जुने सारे संत पकडुनी कीर्तन भंडारे करी तू मंदिरांपुढे रांग लावुनी वेळ आपुला व्यर्थ दवडी तू वाद घाल तू जयंत्यांवरी शासकीय तिथी दिनांकांवरी इतिहासाच्या मंथनातले शोध कधीही सहन न करी महापुरुषांचे कार्य विसरुनी जीवन त्यांचे उघड करी चविष्ट चर्चा अन संघटना निर्माण करी
काव्यरस

(ए, बैठ ना जरासा)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 08/07/2017 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा ए, बैठ ना जरासा, मीठी मीठी करेंगे बाते, अभी तू आता नई रे, पहेले इधरीच गुजारता राते, वो पक्या गया कल, मेरेको बहोत बेइज्जत करके, दिखा दो सालेको औकात, दो चार फटके मारके, समझताहै मुझको भी, बहोत देर हो गयी है, चलना भुर्जीपाव खायेंगे, बहोतही भुख लगी है, पैले बोतता था, रानी तूम रोज मेरे ख्वाब मे आती हो, लेकीन आजकल तो तुम, किसी और पास ही जाते हो, चौराहेपे खडे रहे रहे के, गुजर जाती है सारी सारी रात, आजकल सब दूर से जाते है, कोई लगाता नही मेरेको हाथ, मेरेको अभी बी याद है, तेरे सीने के वो घने काले बाल, एक बार सर रखना है मुझे उनमे
काव्यरस

अजून एक कप, 'हमेशा तुमको चहा'

लेखक सरनौबत यांनी शनिवार, 08/07/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्मार्टफोन वर लांबलचक पोस्ट्स लोकं वाचत नाहीत. म्हणून 'हमेशा तुमको चहा' मध्ये मोजक्याच गोष्टी लिहिल्या. जिव्हाळ्याचा विषय असल्याने लेखाबद्दल बरेच अभिप्राय आले. ‘आधण शिल्लक आहे आणि गॅस गरम आहे’ तोवर अजून एक कप टाकू म्हणून हा 'दुसरा कप'

बायकोशी भांडण झालेल्या नवरोबांसाठी खास आणि सोप्पी डिश

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी शुक्रवार, 07/07/2017 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
कुठलेही कडधान्य (आपल्या आवडीप्रमाणे ) भिजत घाला ... त्याला चांगले मोड येऊ द्यात .. हे मोड आलेले कडधान्य ,थोडे मीठ , तिखट, हळद (चवीपुरतं) टाकून मस्तपैकी हलवा ... गरम तव्यावर थोडे तेल टाका आणि पद्धतशीर परतून घ्या .. डिश तय्यार ... दही असेल सोबतीला तर अजून खाण्यास मजा येते ... करून बघा ..करून बघा .. एकदा बायकोशी भांडून बघा .... तिला पहिलं खायला द्या ...नंतर स्वतः खाल्लंत तरी चालेल

पुणे ते कन्याकुमारी बाईकवरून

लेखक राहुल करंजे यांनी शुक्रवार, 07/07/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी आत्ताच यामाहा FZ नवी गाडी घेतली आहे, आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पुणे-रामेश्वरम-कन्याकुमारी असा फिरण्याचा मानस आहे,, पण मी एकटाच आहे, त्यामुळे मला काय काय खबरदारी घ्यायला लागेल? काय अडचणी येऊ शकतात? आपल्यापैकी जर कुणी जाऊन आले असेल तर सांगा... मला चांगला प्लॅन करता येईल..

महिला क्रिकेट वर्ल्ड कप - २०१७

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 07/07/2017 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : खालील लेखातील काही टीका-टिप्पणी ही माझी वैयक्तिक मते आहेत.अशा लेखात "मी आणि माझी मते", होणे स्वाभाविकच आहे.तस्मात माझ्या ह्या मतांकडे दूर्लक्ष करावे, ही विनंती. कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण..... एक श्रीलंकेविरूद्धचा सामना सोडला तर आजपर्यंत तरी भारतीय महिलांनी ह्या वेळी चांगली कामगिरी केली आहे. मिताली राज स्वतः एक अप्रतिम फलंदाज आणि एक उत्तम संघनायक तर आहेच पण ह्यावेळी स्मृती मंधाना आणि पूनम राऊत ह्यांच्यामुळे एक उत्तम ओपनिंग पण मिळत आहेच.

II नऊची ती बस खास होती II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी शुक्रवार, 07/07/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
नऊची ती बस खास होती आतुर व्हायचो उठताक्षणी कधी एकदा गाठतो नटून थटून आलेली महाराणी लगबग चालू असे नेहमी आईची ती सारखी बडबड आताच लागला कामाला तर एवढी तुझी फडफड जणू गावात लग्न अन कुत्र्याची हडबड II तुका झाला होता तिच्यासाठी जीव माझा ज्ञानेश्वर सोपान अंतरी ते कपाळी सदैव तिच्या नावाचा टिळा होता II लाली पावडर लावून रोज धावायचो बघायचे राहून गेलेच तर रिक्षातल्या आरशात थोबाड बघायचो दोन रुमाल नेहमी खिशात सदैव दिमतीला असायचे ती येण्यापूर्वी एक थोबाड पुसण्यास अन नाही आली तर दुसऱ्यानं डोळे पुसायचे II दिवस असेच ढकलत होतो तिकिटावर तिकीट काढत होतो प्रवा

आळशांची कहाणी (अंतिम भाग )

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी शुक्रवार, 07/07/2017 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
उद्घाटनाच्या दिवशीचा कार्यक्रम खालील प्रमाणे होता. :- १) दरवाजावरची फीत कापणे. २)राजेसाहेबांचे स्वागत व सत्कार ३)राजेसाहेबांचे भाषण ४)पदवीदान समारंभ प्रथम मुख्य शृंगारलेल्या दरवाजाला लावलेली फीत राजेसाहेबांनी कात्रीने कापून विद्यालयाचे उद्घाटन झाल्याचे स्वतः जाहीर केले. मग राजेसाहेबांचा थोडक्यात परिचय प्राचार्यांनी करून दिला. तेच कसे योग्य राजे आहेत हेही विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवले. इतर विद्यार्थी व पदवीची अपेक्षा करणारे विद्यार्थी आपापल्या बिछान्यांना व्हील चेअर सारखी चाके बसवून , ते ढकलत तिथे आलेले होते.

पन्हाळगड ते विशाळगड, एक स्मरणयात्रा (Panhalgad to Vishalgad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 07/07/2017 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
स्वराज्यावर चालून आलेल्या बत्तीस दाताचा बोकड, अफजलखानाला फाडून शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुलुख ताब्यात घेण्याची मोहिम आखली. नेताजी पालकरांना त्यांनी सातारा,कराड्,सांगली परिसरातील किल्ले ताब्यात घेण्यास पाठ्विले. नेताजीनी बराच मुलुख तातडीने मारला, पण मिरजेचा भुईकोट काही त्यांच्यासमोर झुकेना. नेताजीला मोकळे करण्यासाठी स्वता महाराजांनी मिरजेला वेढा घातला. ईकडे अफजलखाना पाठोपाठ फाजलखान आणि रुस्तमेज्मान यांचाही पराभव झाल्याने आदिलशहा व बडी बेगम यांनी कर्नलचा सुभेदार "सिध्दी जोहर" याला महाराजांवर पाठ्विले.

तव्या वरून डायरेक्ट ताटात

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/07/2017 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
एम आय डी सी ला असताना माझा एक मारवाडी उद्योजक मित्र होता … एकदा गप्पात विषय निघाला अन तो म्हणाला "आमच्या कडे सकाळ संध्याकाळ गरम पोळ्या लागतात सर्वाना..