सुरती लोचो/चाट
नमस्कार मंडळी,
मागे सुरती लोचो ची पाकृ टाकली आणि सर्वरचाच लोच्या झाला की राव!!! तेव्हापासून पाकृ टाकायला जरा बिचकतच होतो. पण आता सुरवात म्हणून हिच पाकृ परत टंकत आहे ती गोड मानून घ्यावी. लवकरच नविन पाकृहि पेश करीन.
सुरती लोचो.... गुजराथ चे फास्ट फूड, स्ट्रीट फुड. बेसन हा मुख्य घटक. तसं बघायला गेलं तर हा ढोकळ्याचाच भाउबंद पण ढोकळ्याचे जसे साचेबद्ध तुकडे असतात तसं ह्या लोच्याचं नसतं.
मिसळपाव