Skip to main content

आमचे बालपण

लेखक ऋतु हिरवा यांनी बुधवार, 19/07/2017 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांच्या परीक्षा होत आल्या आहेत. पालक आपापल्या मुलांना वेगवेगळ्या शिबिरात पाठवण्याच्या खटपटीत आहेत. जर बाहेर पडलं तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या शिबिरांच्या जाहिराती लागलेल्या दिसत आहेत. दिवसभर मुले घरात.. त्यामुळे आया...'आता बघायला नको..दोन महिने नुसता धुडगूस...'असे बोलत आहेत. शेजारीही मुलांच्या आवाजामुळे त्रस्त आहेत. अशावेळी मला माझे बालपण आठवते. आमच्या लहानपणी मे महिन्यात आमचा एकच कार्यक्रम असायचा..तो म्हणजे दापोली तालुक्यातील कोळथरे या आमच्या गावी जाणे. माझे काका व त्यांचे कुटुंबीय तेथे राहत असत. समुद्रकिनारी वसलेलं आमचं छोटंसं गाव.

प्रेषीडेन्ट...(गब्ब्या इज बॅक!)

लेखक चिनार यांनी बुधवार, 19/07/2017 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
"बबन्या.....", "काय बे गब्ब्या?" "हा प्रेषीडेन्ट कोन असते?" "कोन?" "प्रेषीडेन्ट बे...पेपर नाय वाचत का तू? इलेक्शन हाय म्हन्ते ना प्रेषीडेन्टचं.", गब्ब्या म्हणाला. "हा वाचलं ना..प्रेषीडेन्ट म्हंजे राष्ट्रपती. हे बी माहित नाही का तुले ?" "नाही बा..कोन असते थो?" "थोचं तं सगळ्यात मेन राह्यते..बाकी सारे त्याच्या हाताखाली राह्यते.." "सारे म्हंजे?" "म्हणजे संसद-गिन्सद वाले, पंतप्रधान..सारे वचकून ऱ्हायतेत त्याले.", बबन्यानं माहिती पुरवली. "बाप्पा बाप्पा..पंतप्रधानपन त्येच्या हाताखाली म्हंजे लयचं झालं." "मंग!

तो (भाग 3) (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 19/07/2017 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: http://www.misalpav.com/node/40321 भाग २: http://www.misalpav.com/node/40328 तो (भाग ३) काकुंच बोलण ऐकून काका काकूंच्या जवळ आले आणि म्हणाले,"मी त्या अशोककडे जात नाही किंवा अजून कोणाकडे मदतीसाठी जात नाही. मला काहीतरी दुसरं सुचलं आहे. जमल तर ते काम करून येतो. हा गेलो आणि हा आलो. तू माझी काळजी करू नकोस. आणि काहीही झालं तरी त्या घराकडे फिरकू नकोस. अशोक किंवा त्याची बायको कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेऊन आहे. मी इथेच झोपाळ्यावर बसलो आहे.

शेंगदाणे कुटातली मिरची

लेखक त्रिवेणी यांनी बुधवार, 19/07/2017 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- १०-१२हिरवी मिरची, लसून -७ ते ८ पाकळ्या, भाजलेले शेंगदाणे -१ मोठा बाउल, तेल फोडणीसाठी जरा जास्तच, हळद, जिर, मोहरी, धने जिरे पूड एक चमचा, पाणी - १ ग्लास, मीठ साहित्य --- प्रथम शेंगदाणे भाजून त्याचा लसूण घालून थोडा जाडसर कूट करून घ्यावा.मिरच्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून जिर,मोहरी,हळद घालून चांगल परतवून घ्यावे आणि कापलेल्या मिरच्या घालून पाच मिनिटं तेलात मस्त परतवून घ्याव्यात. आता त्यात गरम पाणी घालून एक उकळी आली की दाण्याचा कूट घालावा.

पुस्तक परिचय : वनवास, शारदा संगीत, पंखा

लेखक अश्विनी वैद्य यांनी बुधवार, 19/07/2017 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही गोष्ट पहिली, ऐकली, वाचली, जाणवली कि त्यावर विचार करून मनात उमटलेली प्रतिक्रिया इतरांसमोर मांडणे ही एक नैसर्गिक गरज असावी, मग ती समोरच्याला रुचणारी असो अथवा नसो पण तरी ती इतरांबरोबर share करणं मला तरी आवडतं. त्यावरची इतरांची मतंही माहिती होतात, विचारांच्या नवीन वाटा मिळतात म्हणून खरंतर हे सगळं असं लिहिण्याचा हा खटाटोप. पुस्तक परिचय लिहिण्याचा माझा हा पहिलाच अनुभव...

काय हवंय?

लेखक अमलताश_ यांनी मंगळवार, 18/07/2017 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
एका मैत्रिणीची २५ अपेक्षांची चेकलिस्ट होती. लग्न झाल्यावर म्हणाली कि " हि इज एन आन्सर टू माय प्रेयर्स" . मजाच वाटली मला. म्हणजे यार माझी काही चेकलिस्ट च नाहीये ना ! आयुष्यात चांगला घडावं एवढी अपेक्षा आहे. नेहमी चांगलंच घडणार नाही हेही माहित आहे. पण त्या भविष्याच्या "सरप्राईज एलिमेंट" मध्ये एक थ्रिल वाटतं. म्हणूनच ज्योतिष वगैरे मध्ये कधी रस वाटला नाही. माणसाचं असणं हे भावनेशी जुळलेलं आहे. म्हणून दुःख सुद्धा आपण माणूस असण्याचा भाग आहे. खरं तर प्रेमात पुन्हा पुन्हा पडून दुःख करायची नशा अनुभवलेल्या माणसाला दुःख म्हणजे पुन्हा प्रेमात पडायचं निमित्त वाटतं असतं. मग नेमकं काय हवं असतं?

स्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी मंगळवार, 18/07/2017 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नात एकदा चार सिंव्ह मारले अरे लेकानो मारले कसले चांगले उभे आडवे हाणले पुढे गेलो तर काय ? जंगली हत्तींचा कळप चालून आला बाह्या सरसावून ठोकून काढला एकेकाला भिरकावून दिले गगनात सारे अजुनी आहेत ते बनुनी गगनी तारे याच तार्यांचे पाठ गिरविता तुम्हासी न ठावे असे मीच करविता मखलाशी चालू असे मनाशी बहुत लढे उशी घेऊन उशाशी लढता लढता लाथ पसारे बायको उठुनी झाडू मारे स्वप्न मोडिता सत्य अवतरे मारलीस का कधी खरी कबुतरे ? सिद्धेश्वर विलास पाटणकर C

पालक पुरी.

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 18/07/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी , "पालक" हा बहुतेक लोकांना आवडत नाही त्यात मी पण एक प्राणी :) पण हळू हळू मिहि खायला शिकतेय. असा नाही तर तसा पालक पोटात जायला हवा म्हणून काहीतरी वेगळं न चवीला पण बर अस करावं म्हणून आंजावर शोध शोध शोधून माझ्या मैत्रिणीचं डोकं खाऊन "पालक पुरी"बनवण्याचा घाट घातला न तो पहिल्या प्रयत्नातच इकडच्या स्वारीला न मला पसंत पडला ;)तर मंडळी घ्या साहित्य.

भुकेले आणि माजलेले

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 18/07/2017 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला : परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले. पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील.