Skip to main content

भारतीय भाषांनी इंग्रजीला उधार दिलेले शब्द

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 27/08/2017 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मुलगी शाळेत जाऊ लागल्या पासून तिची मराठी फार बदलली. म्हणजे खराब झाली असे नाही तर मराठी शारदेने तिच्या जिभेवर बहुधा “नाच क्लास” ( हा तिचाच शब्द ) काढला आहे आणि तो सध्या जोरात सुरु आहे त्यामुळे हिडसवून-तिडसवून (म्हणजे तुम्हाला वाटेल ‘हिडीस फिडीस करून’ नाही ह्याचा अर्थ आहे जोर जोरात हलवून दोन किंवा दोन पेक्षा अधिक गोष्टी एकमेकात “मिक्षळणे”), पाडवणे, मस्करी खाणेअसले शब्द तिच्या टाकसाळीत प्रत्यही तयार होत असतात.

बाप्पाचा नैवेद्यः काजू मोदक आणि काजूकतली

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 27/08/2017 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
काजू मोदक गणपतीसाठी खास सोपी आवडती झटपट आणि घरी केल्यामुळे खूपच स्वस्त अशी रेसिपी! साहित्य: एक वाटी काजूगर, अर्धी वाटी साखर, पाव वाटी पाणी, वेलची पावडर, अर्धा चमचा तूप, मोदक साचा कृती: काजूगर मिक्सरला थांबून थांबून फिरवावे, आणि पावडर करावी. सलग फिरवले तर तेल सुटेल पण पावडर बारीक होणार नाही. कढईत अर्धा चमचा तूप घ्यावे. गॅस मंद ठेवावा. आता त्यात साखर आणि पाव वाटी पाणी घालून साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे. साखर पूर्ण विरघळली की काजू पावडर मिसळावी. पाच मिनिटे शिजवावे. वेलची पावडर घालावी. गोळा होऊ लागला की खाली उतरून घोटावे.

ऑल इस वेल बाप्पा~~~~

लेखक Swapnaa यांनी शनिवार, 26/08/2017 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
ऑल इस वेल बाप्पा~~~~ बस थोडीशी माणुसकी, आपलेपणा, वेळ, दक्षता कमी पडतोय.... शहरांतल्या सगळ्यांसाठी : "काँक्रिटच्या जंगलात कमी झाली निसर्गाची छाया, २,३ बीएचके च्या भिंतींत आटली नात्यांची माया" , खेडे गांवातल्या सगळ्यांसाठी : "घरांत हवं AC, दारापुढें चार चाकी स्वछता गृहाशी, त्यांना घेणं देणं च नाही" , सध्याच्या युवांसाठी : "सगळ्यांच्या नजरेत आम्ही दोघं राजाराणी, मात्र आमच्या खोलीत रमतो स्वतःच्या च भ्रमणध्वनीत" , बालवर्गासाठी : "पटांगणावरचे नको खेळ चायनीज वस्तूंचे वेड, सणावारांना खायला भेळ कसलाच नाही ताळमेळ" , तरीही बाप्पा तू आलास की, सगळे एकदम सेंड कर
काव्यरस

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक १ : माझा मी जन्मलो फिरुनी!

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 26/08/2017 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मी जन्मलो फिरुनी! लेखक : माम्लेदारचा पन्खा नमस्कार मंडळी... श्रीगणेश लेखमालेचा हा विषय तसा वेगळाच असल्यामुळे आपल्यापैकी अनेकांनी त्याला नापसंती दर्शवली होती. पण माझं मन मात्र तो वाचून पुन्हा एकदा नकोशा वाटणाऱ्या भूतकाळात गेले, कारण विषयाचं नाव माझ्या ह्या घटनेला अगदी यथायोग्यच आहे म्हणून हा लेखनप्रपंच... फार मागे नाही जायला लागणार आपल्याला... याच वर्षीचा जानेवारी महिना! घरात नवीन पाहुणा येणार म्हणून बायकोच्या डोहाळेजेवणाची जवळपास सगळी तयारी होत आली होती. सातवा महिना लागल्यावर कार्यक्रम करायचा, हे नक्की ठरवलं होतं.

समाप्त - सायकलवरून पूर्व युरोप - by मिपाकर दो-पहिया.

लेखक मोदक यांनी शनिवार, 26/08/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपाकर दो-पहिया आज दिनांक २६ ऑगस्ट पासून १२ दिवसांच्या पूर्व युरोप सायकल दौर्‍यावर आहेत. त्यांच्या प्रवासाची लाईव्ह दैनंदिनी करण्याचा हा प्रयोग. त्यांच्याकडून रोज मिळणारे प्रवासवर्णन आणि फोटो त्यांच्याच शब्दात येथे अपडेट केले जातील... (सायकलप्रेमी) मोदक. ************************* मी सायकलिंग करायला सुरुवात केल्यापासून, सायकलवरून शहराबाहेरची निसर्गरम्य ठिकाणे शोधायचा मला छंदच लागला. सुदैवाने पुण्यात रहात असल्या मुळे, फिरायला बरेच पर्याय उपलब्ध होते.

बाप्पाचा नैवेद्यः ऋषिपंचमीची भाजी (ऋषीची भाजी)

लेखक पूर्वाविवेक यांनी शनिवार, 26/08/2017 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस भाद्रपद शु. पंचमि म्हणजे ऋषिपंचमी. या दिवशी करण्यात येणारी मिक्स भाजी किंवा मिसळीची भाजी म्हणजेच ऋषीची भाजी. पण हि आपली नेहमीची मिक्स भाजी नाही. या भाजीची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. या भाज्या पिकवण्यासाठी बैलाचे कष्ट (आणि आजच्या युगात यंत्राचे) नकोत. फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरायच्या. या भाजीत फळ भाज्या, पाले भाज्या आणि कंदमुळे अश्या प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. या भाजीत अजिबात तेल-तूप वापरले जात नाही. शिवाय या भाजीत मिरची पूड आणि कुठल्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाहीत, तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात.

बाप्पाचा नैवेद्यः बेसनाच्या वड्या

लेखक रेवती यांनी शनिवार, 26/08/2017 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- दोन मेजरिंग कप्स बेसन, एक मेजरिंग कप साखर, साखरेच्या अर्धे पाणी, पाऊण मेजरिंग कप साजूक तूप, अर्धा मेजरिंग कप दूध, आवडीप्रमाणे बदामकाप, काजूचे काप, वेलचीपूड एक टीस्पून. कृती- प्रथम ४ टेबलस्पून तूप व सर्व दूध घालून बेसनाला दोन्ही हातांच्या तळव्यांनी चोळून घेणे. हे मिश्रण जाड चाळणीने चाळून घेणे. जड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत उरलेले तूप घालून बेसन परतण्यास सुरुवात करावी. सतत हलवत रहावे नाहीतर तळात बेसन करपेल. आंच मध्यम ठेवावी. मी लहान बर्नरवर मध्यम आंच ठेवली होती.