Skip to main content

शेअरबाजार :Tips Are for Waiters, Not Traders..

लेखक प्रसाद भागवत यांनी सोमवार, 04/09/2017 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे एक उत्साही क्लायंट श्री प्रतिक यांना ना एक सवय आहे..त्यांना मिळ्णाऱ्या धमाका, शुअरशॉट, मल्टीबॅगर्स.....कॅटेगरीतील 'टीप्स' लोककल्याणाच्या भावनेने 'फॉरवर्ड' करण्याची. परवाच गणपतीकरिता गावाला गेलेला मी सुहृदांच्या भेटीगाठी, गप्पाटप्पा आणि उत्सवांत मग्न असतानाच यांची एकापेक्षा एक जॅकपॉट कॉल्सची पकाऊ ढकलपंची अव्याहत चालुच होती.

जा बाहेर जाऊन खेळ

लेखक हेमंत ववले यांनी सोमवार, 04/09/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक समस्यांचे एक समाधान – जा बाहेर जाऊन खेळ जा बाहेर जाऊन खेळ हे आपल्या आई वडीलांचे वाक्य आपल्यापैकी अनेकांना नक्कीच आठवत असेल. आता एक पालक या नात्याने तुम्ही तुमच्या मुलांना वरील जादुई आज्ञा दिल्याचे तुम्हाला आठवते आहे का? अनेक जण सांगतात देखील असे अजुनही, पण बाहेर म्हणजे कुठे? असा मोठा प्रश्न पालक आणि पाल्य दोघांच्या पुढे असतो. पुर्वी आता जेवढी आहे तेवढी वाहनांची वरदळ नव्हती, पुर्वी आता जेवढ्या आहेत तेवढ्या मोठमोठ्या इमारती नव्हत्या.

बाप्पाचा नैवेद्यः अ‍ॅपल पाय

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 04/09/2017 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅपल पाय बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगळे काय करता येईल हा नेहमीच विचार असतो. प्रसादासाठी म्हणून खूप फळे येतात, तेव्हा एकदा फ्रुट सॅलेड होतेच. तरीही बरेचदा उरलेल्या सफरचंदांचे काय करायचे हा प्रश्न असतो.असेच मनात आले की अ‍ॅपल पाय केला प्रसादाला तर काय हरकत आहे? मागच्या वर्षी नाही का बाप्पाला बर्लिनर आवडले होते, तर ह्या वर्षी अ‍ॅपल पाय खायला घालू या. तसे अ‍ॅपलपायचे खूप प्रकार आहेत पण अगदी सोपा, पटकन होणारा मार्सेलाच्या रेसिपीने केलेला हा अ‍ॅपल पाय गरम,गार,कोमट कसाही खाता येतो.

तातडीची मदत हवी आहे - लेह येथे चारचाकीच्या अननोन इश्यू संदर्भात..

लेखक मोदक यांनी सोमवार, 04/09/2017 02:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपाकर अभिजीत अवलिया २४ ऑगस्ट पासून स्वतःच्या चारचाकीने पुणे-लेह-पुणे दौर्‍यावर आहेत. (गाडी - फोर्ड फिगो - डिझेल) काल दिनांक ३ सप्टेंबरला सकाळी लेह ते खार्दुंगला या रूटवरती साऊथ पुलू नंतर तीन किमी अंतरावर गाडीचा Malfunction Indicator (MAL) पिवळा झाला. तेथून ते परत फिरले आणि थोडे अंतर लेहच्या दिशेने उतरले. मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर फोर्डच्या टेक्नीकल कॉल सेंटरला फोन केला. त्यांनी सांगितले की हा इंडीकेटर पिवळा झाला तर कांही अडचण नाही मात्र इंडिकेटर लाल झाला तर प्रॉब्लेम असतो.

तंत्रज्ञान आणि पेटंट चे महत्व

लेखक आपला निखिल यांनी रविवार, 03/09/2017 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
Intellectual Property Rights (IPR) अर्थात बौद्धिक संपदा, इतर सर्व संपतीं प्रमाणेच माणसाची बौद्धिक, वैचारिक क्षमता किंवा कलात्मकता हि देेखील एक प्रकारची संपत्तीच आसून प्रत्येक माणसाने आपली बुद्धिमत्ता आणि कलात्मकता वापरून तयार केलेल्या प्रत्येक कृती वर त्याचा अधिकार आहे. ह्याच भावने मधून बौद्धिक संमपदेचा अर्थात IPR चा उगम झाला. IPR मागचा प्रमुख हेतू हा प्रत्येक व्यक्ती ला त्याच्या बौद्धिक कार्यावर अधिकार मिळवून देणे आणि इतर लोकांकडून त्या कार्याचा unauthorized वापर थांबवणे हा आहे. IPR चे बरेच प्रकार असले तरी मुखात्वे तीन प्रकार आहेत: 1.

प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बिचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 03/09/2017 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
डूआयडीचे आठवावे लेख । डूआयडीचा आठवावा ताप । डूआयडीचा आठवावा प्रतिसाद । मिपामंडळी ।।१।। डूआयडीचे कैसें लिहिणें । डूआयडीचे कैसें पिंकणें । डूआयडीचे काडी टाकणे । कैसें असे ।।२।। मुळायडीचा केला त्याग । म्हणोनि साधिजें ट्यार्पीचा योग । जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।। वापरावे विविध आयपी । तेव्हा मिळे डूआयडी । वापरावे फेक आयडी । पाडण्या जिल्बी ।।४।। सकल डूआयडी आठवावे । फेकायडी डिलीटवत् मानावे । आंजालोकी मिपालोकी उरावे । पिंकरूपें ।।५।। प्रतिसादांचा महामेरू । सकल फेक-आयडीस आधारू । अखंड जिल्बीचा निर्धारु । श्रीमंत डूआयडी ।।६।।

माझं मला

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 03/09/2017 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझं मला खूप जगले तुमच्यासाठी आता माझं मला जगायचंय आभाळाचं निळं पाखरू उरात भरून घ्यायचंय धुंद अवखळ झऱ्या काठी तृप्त पाणी प्यायचंय हसऱ्या वेड्या तृणफुलातून बेभान होऊन धावायचंय खोल शांत सागराच्या कुशीत थोडं निजायचंय ईश चरण स्पर्शणाऱ्या हिमशिखरात विरघळायचंय त्याच्या अस्तित्वाच्या खुणांत स्वतःलाच शोधायचंय खूप जगले तुमच्यासाठी आता माझं मला शोधायचंय
काव्यरस

आवाज

लेखक तिमा यांनी रविवार, 03/09/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर रावांची अपॉइंटमेंट संध्याकाळी सहाची होती. पण वाटेत ट्रॅफिक जॅम असण्याची दाट शक्यता असल्याने, अर्धा तास लवकरच निघालो. डॉ. राव, कान, नाक, घशाचे तज्ञ होतेच, पण त्यांनी बहिर्‍या लोकांसाठी एक औषध तयार केले होते. त्यामुळे कदाचित, त्यांना नोबेल देखील मिळण्याची शक्यता होती. त्यांच्या औषधाने बहिर्‍या लोकांच्या श्रवणक्षमतेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे रिपोर्ट होते. अशा लोकांची, महागड्या श्रवणयंत्रापासून मुक्तता झाली होती. अनेक लोकांना चांगला अनुभव आल्याने, त्यांची भेट घेणं, म्हणजे मोठे दिव्य होते. दोन महिन्याच्या प्रतीक्षायादीला सामोरे जावे लागे.

"पप्पूलीची पिन्नी - पिन्नीचा पप्पूली"

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 03/09/2017 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
"पप्पूलीची पिन्नी - पिन्नीचा पप्पूली" हे ऐकायला वेगळ वाटत असल तरी थोडस वेगळ आहे. पप्पूली शिवाय पिन्नी अपूर्ण आहे का माहीत नाही पण पिन्नी शिवाय पप्पूली अगदीच अपूर्ण आहे. पिन्नी आणि पप्पूली चे नाते बाप-लेकाचे आहे कदाचित त्यापेक्षाही अधिक आहे. विठ्ठल कामतान्चे एक वाक्य आहे " अ चाईल्ड गिव्ज बर्थ टू अ मदर" त्याचेच थोडा बदल करून मी म्हणेन " अ चाईल्ड गिव्ज लाईफ टू अ फादर" पप्पूली कधी कधी पिन्नीचा अभ्यास घेतो. अभ्यास करताना पिन्नी खुप गमतीदार दिसते. छोट्याश्या टेबलावर पूर्ण अन्ग झोकून देऊन अक्षर आकडे गिरवायला घेते. दोन अक्षर काढल्यावर हळूच पप्पूली कडे बघते. पिन्नी ला पाणि हव असत.

स्वप्नातील शर्ट

लेखक Sanjay Uwach यांनी रविवार, 03/09/2017 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नातील शर्ट आज सुटीचा दिवस .मनात सहज विचार आला ,चला आज आपले कपड्याचे कपाट साफ सफाई करून आवरावे . कपाटातील सर्व कपडे मी हळू हळू बाहेर काढण्यास सुरवात केली. हे सर्व करत असताना अचानक माझी नजर त्यातील कांही तिन चार नवीन शर्ट्स वर पडली. ते अजून त्या पारदर्शक वेष्ठनातून बाहेर देखील काढले गेले नव्हते.