Skip to main content

विकलांची गोळाबेरीज: हे n व त्यांची पिल्लावळ कुठून पैदा झाली? (Importance of ‘n’ in integration)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शनिवार, 09/09/2017 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रम राजा नेहमी प्रमाणेच एकांतात तजविजा करीत वेताळाच्या स्थानाकडे निघाला होता. दर अमावास्येच्या रात्रीचा प्रहर आता महालात बसून सारीपाट खेळण्या ऐवजी काही मननात, विचारात जात होता. त्यातही पदार्थविज्ञानाविषयीच्या विचारांमध्ये व त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोगांविषयीच्या चर्चेत तर वेताळ फारच रस दाखवत होता. पण विक्रमाचे दीर्घविचारी मन प्रजाजनांना केवळ एक संख्या म्हणून मानत नव्हते. उलटपक्षी प्रत्येक प्रजाजनाच्या मनात आनंद असला तर राज्य ही आनंदी होईल या विचाराने तो सतत कार्यमग्न होता.

विचारांतील सातत्य

लेखक सर टोबी यांनी शनिवार, 09/09/2017 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
हे आताशा नेहेमीचेच झाले आहे. गणेशोत्सवाच्या अगोदर अगदी मधाळ लेखणीने लिहिल्यासारखे काही ठराविक वर्तमानपत्रातून येणारे लेख. सुख आणि मांगल्याचे प्रतीक असणारा उत्सव. उत्सवाच्या अगोदर बाजारपेठेचा कानोसा. मागील वर्षापेक्षा १० ते १५% भाववाढ. रोषणाईचे कोणते नवे प्रकार बाजारात आले आहेत त्याची माहिती. प्रतिष्ठित मंडळांच्या आरशींची माहिती आणि पदाधिकारांच्या मुलाखती. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी एखाद्या सुखी आणि चौकोनी कुटुंबाचा, गणेशाची मूर्ती घेऊन येतानाच फोटो आणि त्याचे विलक्षण निरागसतेने आणि कौतुकाने केलेले वर्णन.

पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 09/09/2017 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०१ पासून पुढे..... ( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली ) मयुरी : आता? राघव : निघुया? संकेत : हो. मयुरी : काय हो?. राघव, काय प्लॅन आहे? राघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ. मयुरी : म्हणजे? राघव : अग "डर के आगे जीत है" मयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय? राघव : आपल्या मैत्रीची जीत. संकेत : नीघुया का? मयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची! राघव : ए.. चला बस आली निघुया आता. ( सकाळचे ९:५५ झाले होते. तिघही पाटलाच्या वाड्यावर पोहोचले ) मयुरी : आलो तर खरं.

मिक्सर वापरताना

लेखक इलेक्ट्रॉनिक्स यांनी शुक्रवार, 08/09/2017 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
मागे व्हॅट सॅप वर एक पोस्ट वाचली तुम्ही कितीही मोठे इंजिनियर असले तरी घरचा मिक्सर दुरुस्त करता आला नाही तर तुमच्या आई च्या दृष्टीनें तुम्ही डोबल्याचे इंजिनियर मिसळ पाव साठी लिखाण करताना पहिले लिखाण एखादी तंत्र वर करावे अशी ईच्या झाली . मिक्सर गृहिणीस लागणारी गरजेची वस्तू ते जर बंद असल्यास तुमचे पाकीट बरेच खाली होऊ शकते काळजी कशी घ्यावी १ मिक्सर चालू करताना मिक्सर वरचे बटन बंद असल्याची खात्री करा २ मिक्सरची पिन सॉकेट मध्ये टाकताना बोर्डावरचे स्वीच बंद असल्या ची खात्री करा .

हाफ चड्डी गँग (पार्ट -१)

लेखक बाजीप्रभू यांनी शुक्रवार, 08/09/2017 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
पोर्तुगीज भाषेत एक म्हण आहे "ए ओकासीआओ फाज ओ लाडराओ" आपल्या मराठीत त्याचा अर्थ होतो कि, "चोर संधी निर्माण करतो आणि संधी सापडली तर सगळेच चोर होतात" याच भाषेत अजून एक म्हण आहे, ती अशी कि "क्यूएम कॉन्टा उम कॉण्टो, आऊमेन्टा उम पोण्टो" अर्थात, गोष्ट सांगणारा आपली भर घालतोच, आपल्या पदरचं, आपल्या बाजूनेच सांगतो.

पाटलाची मुलगी.. – भाग १

लेखक दिपक लोखंडे यांनी शुक्रवार, 08/09/2017 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो..

मोडीची_गोडी

लेखक vcdatrange यांनी शुक्रवार, 08/09/2017 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
फारा वर्षाच्या अंतराने पुन्हा विद्यार्थी दशेत गेलो, ते ब्राह्मि अन् मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने.

भेट पावसाची..

लेखक दिपक लोखंडे यांनी शुक्रवार, 08/09/2017 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
भेट तुझी माझी पावसाची आठवण आहे बावऱ्या मनाची.. तु सजली आहेस लावून गजरा सह मोहक सुगंध देई मोगरा भुलून गेलो आहे सजनी प्रीत रंग पसरला गगणी ऐकुनी हे बोल तुझे वाटे मज वाजे बासुरी.. बघुनिया रूप तुझे घाव झाला हृदयावरी चंद्र ही निरखून पाही भेट तुझी माझी पावसाची.. – दिपक.
काव्यरस