Skip to main content

अरुणाचल बद्दल माहिती हवी आहे..

लेखक कबीरा यांनी सोमवार, 11/09/2017 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, यंदा दिवाळी मध्ये आई आणि दोन आज्या ह्यांना घेऊन एखाद्या धार्मिक स्थळी अथवा अशी एखादी जागा जिथे शांतपणे ध्यानधारणा करता येईल, राहायची व खायची सोय योग्य असेल, आणि जिथे शांतपणा अनुभवता येईल अशा ठिकाणी जायचा मानस आहे. साधारण ५-६ दिवस हाताशी आहेत. शक्यतो जिथे खूपच गर्दी असेल ती ठिकाणे टाळायची आहेत (अर्थात दिवाळी सुट्ट्यांमुळे हे कितपत शक्य आहे माहित नाही ). गोंदवल्याला आणि निंबाळ ला साधारण वर्षातून ४-५ वेळा जाणे होते त्यामुळे ह्यावेळेस नवीन ठिकाणी जायचा विचार आहे.

अमर फोटो स्टुडियो

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 11/09/2017 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच मराठी नाटकांत दोन सत्रात , वर्तमानकाळ - भूतकाळ - भविष्यकाळ आणि डबल रोल ला फोडणी दिलेलं एक नाटक ज्यात "प्रेम" नाही. होय "प्रेम" हा मुख्य विषय नसूनही मनाला स्पर्श करत अप्रतिमरित्या जमून आलेलं एक नाटक म्हणजे "अमर फोटो स्टुडिओ" 'दिल दोस्ती दुनियादारी" या गाजलेल्या मराठी मालिकेची टीम म्हणजेच अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि सिद्धेश पूरकर आणि लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांचे नवीन नाटक म्हणजे अमर फोटो स्टुडिओ. मनस्विनी लता रवींद्र म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांच्या लेखीका आणि नुकत्याच गाजलेल्या "ती सध्या काय करते" च्या पटकथा लेखिका.

नेत्र न कोई

लेखक दिपक लोखंडे यांनी सोमवार, 11/09/2017 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
दुःख दर्शविण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई शोभून दिसते सुंदरी अन् सुगंध देते मोगरी फरक इतकाच सखे भार तुच्छ हा उरावरी टकटक आवाज करती चाले गुलाबी परी मधुर सुगंध तिचा वाटे नभाची सरी हे दृश्य पाहण्या मझला दुजा मार्ग नाही रंग हजारो माझे पाहण्या नेत्र न कोई
काव्यरस

१/१/२१०२, स.न.वि.वि.

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 11/09/2017 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
बापरे ! काय धूळ पडली आहे या पेटीवर. सुमारे एक चौरस फूट आकारमान असलेली ही लोखंडी पेटी मागच्या शतकात कधी तरी या भिंतीत ठोकून बसवली होती. आता ती प्रचंड गंजली आहे आणि तिला बरीच भोकेही पडली आहेत. ती कुलूपबंद आहे खरी पण तिच्या किल्लीने ती उघडेल की नाही याची शंका आहे. एके काळी तिच्यावर तिच्या घरमालकाचे नाव रंगवलेले होते. आता ते नाव वाचण्यालायक राहिलेले नाही. कित्येक महिने घरातले कोणी तिला उघडून बघायच्या फंदात सुद्धा पडत नाही. ही पेटी एखाद्या नव्वदी उलटलेल्या जराजर्जर म्हाताऱ्याप्रमाणे तिचे उरलेसुरले आयुष्य कंठीत आहे.

हंपी: भाग ४ - दिवस पहिला - दारोजी अस्वल अभयारण्य

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 11/09/2017 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
हंपी: भाग १ - दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं हंपी: भाग २ - दिवस पहिला- राजवाडा परिसर- भाग २ हंपी: भाग ३ - दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार .........हजारराम मंदिर बघून होईता दुपारचे जवळपास अडीच तीन वाजले होते. आता जेवण करुन जायचे होते ते हंपीपासूनच जवळच असलेले एक अनोखे आकर्षण बघायला. ते म्हणजे भारतातील एकमेव असलेले अस्वल अभयारण्य.

अशी पाककृती केली तर चालेल का?

लेखक दीपक११७७ यांनी सोमवार, 11/09/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
बंधु आणि भगिनिंनो माझा असा विचार आहे की खालील प्रमाणे पिठ वापरुन पराठे बनवावे, कृपया मला सांगा की यात काही अजुन करता येईल का, कींवा यात काय चुकीच आहे पिठ :- गहु १ किलो, १०० ग्रा. सोयाबिन, १०० ग्रा. बदाम एकत्र दळुन तयार केलेल पिठ यामुळे पिठातील प्रोटिन प्रमाण वाढेल का? , माझे काही चुकत आहे का? किंवा अजुन काही घटक वाढवावे का? यानंतर नेहमी प्रमाणे, पालक किंवा मेथी किंवा धनिया टाकुन पराठा बनवणे.

दिवाळी अंक २०१७ - दृकश्राव्य विभाग - आवाहन

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी सोमवार, 11/09/2017 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! "गोष्ट तशी छोटी.." आणि मिपा दिवाळी अंकाचे काही तरी ऋणानुबंध असले पाहिजेत. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात "गोष्ट.."ची घोषणा झाली होती. यंदा सुद्धा दिवाळी अंकासाठी सासं आणि "गोष्ट ..." टीम पुन्हा एकत्र आले आहेत. आजकालच्या डिजिटल युगात लेखनासोबतच व्हिडीओ ब्लॉगिंग आणि पॉडकास्ट सारखे उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत चालले आहेत. मिपानेही मागच्या दिवाळीत आपले यू ट्युब चॅनल सुरू करून नव्या अभिव्यक्तीची दारे उघडली होती. यंदाच्या दिवाळी अंकात आपण एक संपूर्ण विभाग दृकश्राव्य माध्यमाकरिता राखून ठेवत आहोत.

हाफ चड्डी गँग (पार्ट -२)

लेखक बाजीप्रभू यांनी रविवार, 10/09/2017 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हाफ चड्डी गँग (पार्ट -१) संध्याकाळचे सात-साडेसात झाले असतील. देवापुढे दिवा लावून आज दिवसभरात लावलेल्या दिव्यांची उजळणी करत होतो. मला अगदी स्पष्ट आठवतंय शुभंकरोतीच्या एकूण शृंखलेतील शेवटचा श्लोक गात(वाचा रेकत) होतो. मी म्हणत होतो की, "सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो" पुढला कलंक लागण्याआधीच आयमीन ऊच्चारण्याआधीच एका सृजनाचं वाक्य कानी पडलं. माझा सख्खाशेजारी 'राजेश' होता तो. ये बाजी!! कुणीतरी तुला शोधतंय बहुतेक. ते ऐकून माझ्या काळजात धस्स-बिस्स अजिबात झालं नाही कारण एव्हाना माझा गजनी झाला होता.

माझे पहिले (आणि दुसरे) अँड्रॉइड अँप..

लेखक अज्ञात यांनी रविवार, 10/09/2017 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
दोन महिन्यांआधी अनेक वेळा अर्ध्यात सोडलेला प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले. प्रकल्प होता स्वतःचा अँड्रॉइड अँप तयार करणे. अनेक वेळा इन्स्टॉल करतांना आलेल्या अडचणी सुदैवाने यावेळी आल्या नाहीत आणि एकदाचा अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल झाला. सगळीकडे एक्लीप्स वापरतात पण माझ्याकडून ते इन्स्टॉल करणे नाही जमले त्यामुळे जे होईल ते पाहून घेऊ म्हणत सरळ उडी टाकली. एखादी गोष्ट अडली कि तुनळी वर पाहायची, नाही जमले तर दुसरी गोष्ट करून बघायची असे करत करत गणनाकार, टिक टाक टो असे साधे अँप बनवले आणि काही मोठे करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यातून आठवले, एकदा पुण्यात बस पकडताना कसा ताप आला होता ते...