Skip to main content

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 13/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील? आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका. लेक लाडकी मोठ्या घरची होणार सुन मी अंबाणीची मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला अनंतरावांसारखा जोडीदार भेटला लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड स्वप्नातला राजकूमार पाहीला होता सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.

( )129210... अङ्कानां वामतो गति।।

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 12/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
स्वगतः १.मला मॉडर्न्स सायन्स/ मॅथेमॅटिक्स मधील संकल्पना आपल्या तत्वज्ञानाशी जोडायला फार आवडते. एस.क्यु.एल मध्ये इंडेक्सिंग हा प्रकार असतो प्रत्येक रो ला एक इंडेक्स लावली की सगळे सॉर्ट, फिल्टर वगैरे ऑपरेशन्स सुपरफास्ट होतात. किंवा गुगलने सर्वच इंटरर्नेटवर जे केले आहे तसे इंडेक्सिन्ग. म्हणजे कसं की गोष्टी शोधणे सोपे होते. किंवा अजुन सोपे उदाहरण म्हणजे आता आपल्या पयथॉन मध्ये डिक्शनरी डेटा टाईप असतो ज्यात key : value अशा पेयर असल्याने कोणतेही सर्च ऑपरेशन सोप्पे होउन जाते. तसे आपल्या तत्वज्ञानाच्या बाबतीत करता आलं तर मजा येईल.

कुठे हरवली टूथपावडर ?

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 11/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
Porter’s five forces analysis चे स्टडी नोट्स वाचत असताना असाच आमच्या काळातलं एक प्रोडक्ट आठवलं. दात घासण्यासाठी शुभ्र सफेद गोडसर चवीची टूथ पावडर टीनच्या डब्यात यायची. आता केवळ Online विक्रीस उपलब्ध असलेली टूथ पावडर अस्तंगत कधी आणि का झाली? मीठ, खडू किंवा बेकिंग सोडा असलेले घरगुती आणि उत्पादित टूथ पावडर 19 व्या शतकात त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. टूथ पावडरची उत्पत्ती हजारो वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.

मिपा कला संग्रहालय - २.निसर्गचित्रण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 11/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! ह्या लेखमालिकेतील हा तिसरा धागा - निसर्ग चित्रण . प्रत्येक देशात, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या निसर्गचित्रणाच्या शैली विकसीत झाल्या. ह्या धाग्यावर आपण आपल्याला आवडलेल्या निसर्ग चित्रांचा संग्रह करुयात. चला तर मग !

द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प आता 'रखडणार' कि 'साकारणार'?

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 10/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.

१७ जून २०२४ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संपर्क) आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश ह्यांनी जारी केलेल्या निवेदनात 'ग्रेट निकोबार' येथील प्रकल्पांसाठी दिलेल्या सर्व मंजुरी तात्काळ स्थगित करण्याची आणि संबंधित संसदीय समित्यांकडून छाननीसह प्रस्तावित प्रकल्पाचा सखोल आढावा घेण्याची मागणी केल्यावर भारताचा 'द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प' हा अति

गझल

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 08/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
गझल संध्याकाळची वेळ . मोठं रोमँटिक वातावरण ! बाहेर मुसळधार पाऊस. धरतीशी लडिवाळ नाही तर जोरकस सलगी करणाऱ्या आषाढसरी ! त्या सभागृहात कार्यक्रम रंगात आला होता . गझलांचा कार्यक्रम. शांतपणे ,आतल्या अगदी आतल्या जखमा कुरवाळणारा . तुडुंब गर्दी होती. त्यातही तरुणाईची खरी गर्दी . बाकी थोडीफार पिकली पानं होती ; पण ती घरी वेळ जात नाही म्हणून आलेली . कारण तसंच होतं ना. कार्यक्रम शामकुमारचा होता . तरुण , राजबिंडा ,नवोदित गझल गायक . पण तयारी अशी की पार बुजुर्ग वाटावा . त्यामुळेच तर गर्दी होती आणि तरुण मुलांची जास्त अन हो मुलींचीही . असतं वय एखाद्यावर जीव टाकायचं . येड लागायचं .

मिपा कला संग्रहालय - १. पुराणकथांचे चित्रण

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 08/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर हो! मिपा कला संग्रहालय - ०. प्रस्तावना ह्या प्रस्तावनेच्या लेखात म्हणल्याप्रमाणे हे मिपावरील कलासंग्रहालय सुरु करत आहोत. हा धागा पुराणकथांचे चित्रण ह्या विषयाला धरुन आहे. इथे कोणत्याही पौराणिक कथांशी संबंधित जसे की ग्रीक-रोमन पुराणकथा, उत्तर युरोपच्या पुराणकथा, कृष्णलीला, रामायण - महाभारत, देवी देवतांचि चित्रे, आफ्रिकन, चिनी वगैरे वर आधारित असलेली चित्रे देता येतील.

मिपा कला संग्रहालय - ०. प्रस्तावना

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 08/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
रसिक मिपाकरहो, आपले सर्वांचे लाडके आणि आदरणीय मिपाकर चित्रगुप्त अर्थात शरद सोवनी यांच्या सोबत झालेल्या कित्येक चर्चांमधुन मिपावर दर्जेदार कलाकृती, वास्तुकला इत्यादिंविषयी विविध लेखमाला सुरू कराव्यात अशी कल्पना सुचली . ह्या संग्रहालयात वेळोवेळी रसिक मिपाकरांनी आपापली भर घालत राहून कलाविषयक संदर्भांचा एक मोठा खजिना निर्माण करावा, या हेतुने हा प्ररंभिक लेख सादर करत आहोत. भुमिका : नुकतेच आषाढ शुक्ल प्रतिपदेला आपण "कविकुलगुरु कालिदास दिन" साजरा केला.

केरळ कन्याकुमारी लेखमाला: दिवस पहिला- कलाडी ते मुन्नार

लेखक श्वेता२४ यांनी सोमवार, 08/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग 1)पूर्वतयारी

     सहलीचा पहिला दिवस उजाडला. आज आम्हाला कलाडी या आद्य शंकराचार्यांच्या जन्मगावी भेट देऊन पुढे मुन्नारला पोहोचायचे होते. सकाळी आम्ही लवकर उठून आंघोळी करून आठ वाजेपर्यंत तयार झालो. हॉटेल मालकांनी अर्धा तासात ऑर्डर प्रमाणे नाश्ता बनवून देण्यात येईल म्हणून सांगितले. तथापि आम्हाला तेवढा वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही चहा मागवला. नुकतीच दिवाळी झाल्यामुळे तसेच सासूबाईंना सकाळची गोळी घ्यायची असल्यामुळे फराळ सोबत ठेवला होता. आम्ही चहा व फराळ करून घेतला.

"प्रेतात्म्यांची जत्रा" पुढे चालू.

लेखक भागो यांनी सोमवार, 08/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
अरे हा एक गोष्ट सांगायची राहून गेली. नायिकेची भूमिका –मेरीची- करणाऱ्या Candace Hilligoss ह्या अभिनेत्रीला ह्या भूमिकेसाठी मेहेनताना म्हणून २००० डॉलर्स फी देण्यात आली. त्या फी वर ती प्रचंड खुश झाली. तिचा नवरा हॉटेलमधे वेटरचे काम करत होता. त्याने तत्काळ नोकरी सोडून दिली. त्याला अभिनेता म्हणून करिअर करायचे होते. त्याला लगेच ब्रॉडवे वर संधी पण मिळाली. हार्वेने चित्रपट पूर्ण तर केला. हार्वेसाठी हा तसा सोप्पा भाग होता. पण आता वितरकाला पकडायचे होते. अश्या “बी-ग्रेड” सिनेमा वितरणाची जबाबदारी कोण घेणार? अखेर तोही मिळाला. हर्ट्झ-लायन नावाच्या कंपनीने ही जबाबदारी अंगावर घेतली.