मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा कला संग्रहालय - १. पुराणकथांचे चित्रण

प्रसाद गोडबोले · · मिपा कलादालन
नमस्कार मिपाकर हो! मिपा कला संग्रहालय - ०. प्रस्तावना ह्या प्रस्तावनेच्या लेखात म्हणल्याप्रमाणे हे मिपावरील कलासंग्रहालय सुरु करत आहोत. हा धागा पुराणकथांचे चित्रण ह्या विषयाला धरुन आहे. इथे कोणत्याही पौराणिक कथांशी संबंधित जसे की ग्रीक-रोमन पुराणकथा, उत्तर युरोपच्या पुराणकथा, कृष्णलीला, रामायण - महाभारत, देवी देवतांचि चित्रे, आफ्रिकन, चिनी वगैरे वर आधारित असलेली चित्रे देता येतील. चित्रे देताना खालील टेम्प्लेटचा वापर केल्यास धागा दर्जेदार राहील आणि भविष्यात चित्रे शोधण्यास मदतही होईल. प्रतिसाद शीर्षक : चित्राचे नाव प्रतिसाद : चित्राचे नाव चित्रकाराचे नाव (कालखंड) चित्रशैली इंटरनेटवरील लिंक पर्यायी लिंक सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक चित्र (शक्यतो फुल्ल साईझ) टिप्पण्णी : हे चित्र तुम्हाला का आवडते किंव्वा तुमची चित्राविषयी काही मते असल्यास. उपप्रतिसादात - सदर चित्राशी निगडीत चित्रे असावीत. सदरहु चित्रकाराची सर्वच्या सर्व चित्रे उपलब्द असल्यास ती देऊ नयेत , केवळ त्यांची लिंक द्यावी. अर्थात चित्रकाराचे अजुन काही प्रसिध्द चित्र असल्यास ते स्वतंत्र प्रतिसादात जरुर द्यावे. आपल्या सुचनांचे स्वागत आहेच !

वाचन 5826 प्रतिक्रिया 0