Skip to main content

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 2

लेखक नयना माबदी यांनी शुक्रवार, 25/09/2020 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
22 जुन 2012 गाडीने वेग पकडला व आम्ही जम्मु कडे प्रस्थान केले. मुंबई ते जम्मु हे अंतर 1950 कि.मी आहे ते पार करण्यासाठी स्वराज एक्सप्रेस 30 तास घेते. आम्ही पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास करत होतो. मजा येत होती. 22 जुन चा संपूर्ण दिवस गाडीमधेच गेला. मुंबई-सुरत-रतलाम-कोटा-मथुरा-दिल्ली-अंबाला-जालंधर-पठानकोट असे करत आम्ही 23 जुन ला दुपारी 3 वाजता जम्मु ला पोहोचलो. 23 जुन 2012 काश्मीरला जातोय म्ह्टल्यावर डोळ्यासमोर येतात बर्फाच्छदीत डोंगर , खुप थंडी. आम्हाला ही असेच वाटले होते पण जम्मुला उतरताच आमची भ्रमनिराशा झाली. जुन महीना असल्याकारणाने जम्मुला खुप उकडत होते.

लघुसिद्धान्तकौमुदी

लेखक साहना यांनी शुक्रवार, 25/09/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत भाषेच्या अभ्यासाच्या निमित्ताने `लघुसिद्धान्तकौमुदी` ह्या पुस्तकाची ओळख झाली. इथे ओळख ह्या शब्दाचा अर्थ अक्षरशः मी पुस्तकाचे फक्त बाह्यपृष्ठ आणि प्रथम पान पहिले असा होतो. भाषाशास्त्राची मला फार आवड आणि त्यातल्या त्यांत शब्दांचे इतिहास जाणून घ्यायची फार इच्छा. पुस्तक उघडून ते वाचण्याआधी मी आधी लघुसिद्धान्तकौमुदी ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेतला. लघुसिद्धान्तकौमुदी हे पुस्तक पाणिनी महर्षींच्या अष्ठाध्यायी ह्या पुस्तकाचे एक छोटे स्वरूप आहे.

दौलतगड उर्फ दासगावचा किल्ला

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 25/09/2020 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. इतिहासकाळी महाड, खेड, गोवळकोट, चिपळूण ही नामांकित बंदरे होती. अरब, रूमशान, ग्रीस इथपासूनचा माल चौल, दाभोळ आणि नालासोपारा अश्या मोठ्या बंदरात यायचा. या मोठ्या बंदरातून मग तो माल छोट्या गलबतामधून महाडसारख्या आतल्या बंदरात आणला जायचा. सावित्री नदीच्या मार्गाने महाड परिसरात मालाची आवक-जावक होत असे.

परतीचे प्रवास

लेखक मका म्हणे यांनी शुक्रवार, 25/09/2020 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
म्हातारी माणसे एकटीच बसून अश्रू ढाळतात. कधी सहजच पाणी येते त्यांच्या डोळ्यातून उगाच. अचानक विकल होतात ती मागचे काहीबाहि आठवून. सैरभैर होतात माना हलवत चेहेऱ्यावर अपराधी भाव घेऊन... काय बर होत असेल त्यांना ? कोण आठवतय आता या वयात ? कशाने असे बावरले जात असतील ? कसल्या वेदना पाझरताहेत मनातून? आता खूप दूर निघून गेलेल्या माणसांना काही सांगायचे असेल, का आता जवळ असलेल्यांना काहीच सांगता येत नसेल? भोगलेल्या वेदनाचे माप ओतायचय त्यांना कोणाकोणाच्या पदरात की दिलेल्या दुखांच्या डागण्या पुसायच्यात कापऱ्या हातांनि? खोटे मुखवटे ओरबाडायचेत उरल्या सुरल्या ताकतीने का पडलेले चेहेरे पुन्हा एकवार ठाकठीक करायचेत

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?

लेखक ताजे प्रेत यांनी गुरुवार, 24/09/2020 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे तर हे नक्की पैसे बनवतात कसे ? मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते. तर यांचे 4जी हे hyper efficient network आहे, म्हणजे फोन चार्ज करायला खरे तर जवळपास एक तृतीयांश ( खरे तर 31.7595 %) वीज लागते. आता कोणाचे वीज बिल यांचे नेटवर्क वापरत असल्याने कमी झाले आहे का ?

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सायकल राईड, २५ ऑगस्ट, २०२०

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी गुरुवार, 24/09/2020 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सायकल राईड २५ ऑगस्ट, २०२० 500 दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्यावर गेलो होतो, तेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प खाडीच्या पलीकडे दिसत होता. या प्रकल्प परिसराला भेट देण्याचे तेव्हाच नक्की केले होते. आज सायकलिंग करत जैतापूरला जाण्यामुळे माझ्या बकेटलिस्ट मधील एक इच्छा पूर्ण होणार होती. सकाळीच राजापुरातील वाल्ये गावातून सुरुवात करून कोंडये घाटी रस्ता निवडला.

राधा

लेखक सरीवर सरी यांनी गुरुवार, 24/09/2020 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
वारा घोंघावत अवती गिरकी देहाभोवती कानात फुलांचे डूल केसात माळत रानभूल गीत गुंजन श्वासभर पैजण नाद नभभर .....कृष्णाची राधा डोलती...

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 1

लेखक नयना माबदी यांनी गुरुवार, 24/09/2020 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मिपावर पहिल्यांदाच माझे प्रवासाचे अनुभव लिहित आहे. सांभाळुन घ्यावे. गेल्या 7-8 वर्षात उत्तर भारतात खुप वेळा फ़िरणे झाले. पण जिथुन या प्रवासांची सुरुवात झाली तो सर्वात पहिला अनुभव इथे लिहीत आहे. 2010 साली आमच्या शेजारचे वैष्णोदेवी यात्रेसाठी चालले होते तेव्हा माझ्या मनातही आले कि आपणही जावे पण त्यावर्षी काही कारणांमुळे नाही जाता आले. घरातील देवीसमोर नेहमी हात जोडुन प्रार्थना करायचे की माता राणी आम्हाला ही बोलव तुझ्या दर्शनाला. शेवटी 2012 साली हा योग जुळुन आला.

शिवप्रतापाची झुंज ( भाग ५)

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 23/09/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता शिवप्रतापाची झुंज ( भाग १) शिवप्रतापाची झुंज ( भाग २) शिवप्रतापाची झुंज ( भाग ३) शिवप्रतापाची झुंज ( भाग ४) टेहळणी बुरुजावर उभे राहून राजे उगवतीला महाबळेश्वराचा डोंगर निरखत होते.

आठवण

लेखक Prajakta Sarwade यांनी बुधवार, 23/09/2020 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ -प्राजक्ता