Skip to main content

मांजर (रेखाटन)

लेखक वर्षा यांनी शुक्रवार, 16/11/2007 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, हे मी काढलेलं एका मांजराचं रेखाटन. (मिसळपाववर मी पहिल्यांदाच माझं रेखाटन देतेय... इतके दिवस रीड ओन्ली मोड मध्ये होते :)) वास्तविक पक्ष्या-प्राण्यांचे मऊ केस,पिसं वगैरे तंतोतंत कागदावर उतरवणे मला नीटसं जमत नाही ..कोणी स्केच आर्टिस्ट असतील इथे तर मला जरा सूचना द्या :)) -वर्षा
Taxonomy upgrade extras

एक पी. जे.

लेखक प्रशांतकवळे यांनी गुरुवार, 15/11/2007 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक माणुस एका सान्तासिन्गच्या कानात काहीतरी बोलतो, सान्तासिन्ग लगेच मरतो, आता सान्गा की तो माणुस सान्तासिन्गच्या कानात काय बोलतो? . . . . . . . . . . . . . . . . ढिश्क्यऊ

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 15/11/2007 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

कोल्हापुरि मिसळ

लेखक झकासराव यांनी बुधवार, 14/11/2007 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापुरला गेलो होतो दिवाळीच्या सुट्टीत. नवीन घेतलेल्या कॅमेर्‍यामुळे डोचक्यात फोटो च भुत भिनलय. आणि मावसभावाने नवीन दुचाकी घेतली आहे. मग काय सगळीकडे घुमत होतो. मग अशीच एक दिवस आठवण आली मिसळीची मग मनात ठरवल की कोल्हापुरातली फेमस मिसळ खाल्लीच नाय. मग दुसर्‍याला सजेस्ट करण म्हणजे काठावर उभ राहुन पोहायला शिकवण्यासारखं. :) मग गेलो उद्यमनगरात "फडतरे" मिसळ खायला. हीच ती कोल्हापुरात फार फेमस असलेली आणि वेगवेगळ्या चॅनेल्सनी पण दखल घेतलेली मिसळ. तिकडे बाहेर १५ मिनिट वाट पहावी लागली एवढी गर्दी होती. अगदी लग्नाच्या पंगतीसारखाच प्रकार होता तो. एक छोटी टपरी असावी आधी.

हिवाळ्यात व्हेगस

लेखक कोलबेर यांनी बुधवार, 14/11/2007 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी ह्या नाताळच्या सुट्टीमध्ये आम्ही लास व्हेगस आणि ग्रँड कॅन्यन असा दौरा करायचे ठरवले आहे. ह्यावरील मिसळपाव सदस्या 'प्रियाली' ह्यांच्या उपक्रमावरील लेखातुन बरीच माहिती मिळाली (किंबहुना तेव्हापासुनच व्हेगसचा किडा वळवळू लागला होता!) ती माहिती आणि जालावरचा शोध ह्यांची मदत घेउन फ्लाईट आणि स्ट्रीप वरील हॉटेलचे बुकींग केले. पण ग्रँड कॅन्यन येथील नॅशनल पार्क मधील विश्रामगृह बुक करताना व्हेगसहून ग्रॅंड कॅन्यनला जाणारे रस्ते हिवाळ्यात बर्फ पडल्यास कधी कधी बंद असतात अशी माहिती मिळाली. आमचा वेगसहून कॅन्यनला स्वतः ड्राइव्ह करून जाण्याचा विचार असल्याने मनात शंकेची पाल चुकचुकली.

हेच तंत्र, हाच मंत्र

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 14/11/2007 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची असे सव्यसाची झाले बहू मागून लपुनी ध्येयास गाठावे भीष्मांना पाडावे धारातीर्थी इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी धरोनी हाताशी गीता सार माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे चाळे माकडाचे का रे बाबा? दुसर्‍याच्या जागी स्वतःला ठेवावे जगाला बघावे मग जरा हे एवढे कष्ट जो कोणी घेईल तयाचा जाईल वेळ फार म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र हेच ए
Taxonomy upgrade extras

मुलाखत..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 14/11/2007 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
मुलुंडचे पं. अरूण कशाळकर हे अमेरिकेत आले असताना, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. "स्वरअर्चना" या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या बंदिशी संग्रहित आहेत. संगीतातील त्यांचे अनुभव, त्यांचे बालपण, त्यांचे शिष्य.. या विषयी सुंदर माहिती त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितली आहे. मिसळपाववरील समस्त संगीतवेड्या लोकांनी ही मुलाखत ऐकावी ही विनंती. वेळ : पॅसिफिक वेळ सकाळी ७.०० भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८.३० वार : शुक्रवार. दि. १६ नोव्हें.

बॉलिवूडचे दोन (पडू) कोण ?!

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 14/11/2007 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
दैनिक पुढारीवर विश्वसंचारात ही माहिती मिळाली. हे बॉलिवूडमधले पहिले पडूकोण.(इथे पहा.) आणि या दुसर्‍या पडूकोण.

अशी बातमी हवी

लेखक जुना अभिजित यांनी बुधवार, 14/11/2007 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस बीपीओ मधल्या मुलीच्या बलात्कार आणि खुनाची बातमी मनात घर करून होती. आज ही बातमी वाचली आणि आनंद झाला http://www.esakal.com/esakal/11142007/PuneCA817C583D.htm वाचा आणि सर्वाना कळवा.

सेमीकंडक्टर

लेखक पुरणपोळी यांनी बुधवार, 14/11/2007 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझा नवरा नुकताच एम एस झाला आहे. आम्ही त्याच्या साठि सेमीकंडक्टर कंपनी मध्ये नोकरि शोधत आहोत. फिजिक्स व मटेरियल्स सायन्स अशी बॅकग्राउन्ड आहे. माहितगार लो़कांकडून सल्ला, माहिती आणि मदत मिळाली तर फार छान होइल. -पुरणपोळी