Skip to main content

मनोज दाणींच्या पुस्तकातील मागच्या कव्हरवरील चित्रातील तपशील

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 31/01/2021 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
aa श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर. बेगम सामरू (Joanna Nobilis Sombre (ca 1753– 27 January 1836) किंवा सुमरु या साडे चार फुटी टिल्लू बाईंचे बडे प्रस्थ असले पाहिजे.

पतंग....!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 29/01/2021 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
पतंग...!! नऊ वाजले तसं भिकूशेठनं दुकान उघडलं. त्या छोट्याशा जागेत, एकदम प्रकाश पसरला. अरेच्च्या, सकाळ झाली वाटतं.. पण आळोखेपिळोखे द्यायची इथे सोयच नाही. खालच्या वरच्यांच्या हातापायांचे धक्के खात नुसतं दाटीवाटीनं महिनोन् महिने बसून रहायचं.... काय हे आपलं जीवन...!! तेवढ्यात कोणातरी गि-हाइकाची चाहूल लागली. "शेठ पतंग आहे का हो तुमच्याकडे...?" माझे कान टवकारले. मनात गुदगुल्या झाल्या. चला जागा तरी बदलेल आज माझी... भिकूशेठ रॅकपाशी आले आणि पतंगाचा गठ्ठा टेबलावर गेला. थोडं पाहून झाल्यावर मुलाचे बाबा म्हणाले, "गोलू, तुला कोणता पतंग आवडला..?" अं..अं.. बाबा, मला लाल पतंग हवाय.. "लाल"....??

wacom cinteq pro 13 ड्रॉइंग टॅब

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 29/01/2021 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलीने wacom cinteq pro 13 हा ड्रॉंईंग टॅब तिच्या मैत्रिणीकडून ५० हजाराला विकत घेतला. मैत्रिणीकडे तो मॅक वर चालू होता असे तिने सांगितले. मुलगी पंजाबमधे होती. मी तो आणून दिलेला टॅब तसाच पॅक मधे असल्याने जसाच्या तसा पाठवला. मला त्यातील तांत्रिक ज्ञान नसल्याने मी चेक केला नाही. मुलीकडे डेल चा विंडोज चा लॅपटॉप आहे. त्यावर विंडोज १० आहे. तिला वाटले हा जोडला कि लगेच चालू होईल. पण तसे झाले नाही. नेटवरुन माहिती घेतल्यावर त्याप्रमाणे इन्स्टॉलेशन केले. पण डिस्प्ले कॉंपिटिबिलिटी इश्यु येत आहे. ड्रायव्हरही अपडेट केलेत. पण कॉंपेटॅबिलिटी इश्यू येत आहे.