Skip to main content

बॉबकॅट येऊन गेला/गेली!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 28/02/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.

काल रात्री मॅसाच्युसेट्समधे पुन्हा हलकीशी हिमवृष्टी झाली. आज सकाळी गाडीवरचे बर्फ साफ करायला बाहेर पडलो, बरोबर चिरंजीवही होते (वय वर्षे ६ ), आणि बर्फात पायांचे ठसे दिसले, बॉबकॅटच्या! (हा प्राणी बॉबकॅटच असणार कारण मागच्याच आठवड्यात आमच्या निवासी संकुलाच्या आसपास तो दिसल्याबद्दलची भित्तिपत्रके लावली होती!).
मी सावध होऊन मुलाला मागेच थांबवले!

मला आलेले एक स्वारस्यपूर्ण अग्रप्रेषित (Forward)

लेखक शरुबाबा यांनी गुरुवार, 28/02/2008 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
सभी बेवडों को समर्पीत... बेवडे जमीन पर

मै कभी बतलाता नहीं
बार मे जात हूं मै मा...
युं तो मै दिखलाता नहीं
दारू पीकर रोज़ आता हूं मै मा....
तुझे सब है पता, है ना मा...
तुझे सब है पात, मेरी मा...

ठेके पे युं ना छोडो मुझे,
घर लौट के भी आ ना पाऊं मै मा...
पौआ लेने भेज ना इतना दूर मुझको तू,
घर भी भूल जाउं मै मा...

क्य इतना बूरा हूं मै मा...
क्य इतना बूरा...मेरी मा..

दारू मै इतना पीता नहीं,
पर मै सहम जाता हूं मा...
चेहरे पे आने देता नहीं
लेकिन मै लुडक जात हूं मा...

तुझे सब है पता... है ना मा...

केमिकल लोच्या

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 28/02/2008 17:24 या दिवशी प्रकाशित केले.

संपतराव नुकतेच उठून मागल्या दारी मशेरी लावत बसले होते, तोच रंग्या तिरमिरत, धडपडत संपतरावांच्या नावानं बोंबलत तिथं आला.

(ताळमेळ)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 28/02/2008 11:49 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा अदितीताईंची सुंदर कविता ताळमेळ

काव्य हे जुळे कधी कधी उगाच शब्दभेळ
हा जमायचा तुला न "केशवा" कधीच खेळ

सभ्य वाटतो जरी, कळा अनेक अंतरात
ही विडंबने तुझी कुणी अता न वाचतात
ऐकवे कुणा न हा तुझा टुकार वाद्यमेळ ॥

बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री

लेखक प्रा सुरेश खेडकर यांनी गुरुवार, 28/02/2008 01:24 या दिवशी प्रकाशित केले.

भारतीय क्रिकेट चमुस हार्दिक शुभेच्छा.

=====================
ऑफिसच्या रीक्रीएशन रूममधील एका संभाव्य चित्र "रेशमाच्या रेघानी"च्या धमाल चालीवर.
(आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले" परंपरेतील व माझ्या "एप्रिल फुले" ह्या धमाल कार्यक्रमातील एक स्वरचित ताजे विडंबन गीत)
======================
अहो येता जाता सट्टा का हो लावता,
अन क्रिकेटच्या खेळाला बट्टा का हो लावता.

बॉस आज सुट्टीवरी, त्यात क्रीकेट कॉमेंट्री
चंगळच चंगळ करूनी घ्या हो,
हात नका लावू कुणी कामाला

नवा कोरा टीव्ही लाख मोलाचा,

"स्वयेश्री प्रोफेसर पाहती" स्वरचित विडंबन गीत

लेखक प्रा सुरेश खेडकर यांनी गुरुवार, 28/02/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
परीक्षा सुरू होत आहेत,त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा.कविवर्य गदिमांची क्षमा मागून एक स्वरचित विडंबन गीत सादर करित आहे.
(टीप:ह्यातील कॉलेज माझे व युनिव्हरसिटी माझी नसून तुमची ही नाही.)

स्वयेश्री प्रोफेसर पाहती,परीक्षेत मुले कॉपी करिती.

सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे
समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.

सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे
अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.

कांही भित्रे त्या वर्गातील,कैसे वाटती आज सुशील
प्रश्न तयांचे कैसे सुटतील,ग्लास पाण्याचे ते ढोसती.

राजा भोज याने कालिदासाला दिलेली समस्या

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 28/02/2008 00:28 या दिवशी प्रकाशित केले.

भोज राजाने फक्त दोन ओळी दिल्या आणि कालिदासाला श्लोक पूर्ण करण्यास सांगितले - काय आहेत त्या दोन ओळी?

--- -- --- ---
--- -- --- ---
सिंदूर बिंदू विधवा ललाटे
ते पाहुनी विस्मय फार वाटे

(उत्तर माहीत असेल तर व्य. नी. तून कळवावे - शुक्रवारी मी अचूक ओळखणार्‍यांच्या नावासह इथे देईन.)