Skip to main content

अनुदिनींच्या शोधात...

लेखक वडापाव यांनी सोमवार, 10/03/2008 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या-नव्या, माहितीचे वाटप करणा-या, गंमतीशीर अशा अनुदिनी असतात. या अनुदिनींवरील माहिती, काव्ये, अनुभव, विनोद, यांनी समाधानकारक असे मनोरंजन होते. अशाच नव्या अनुदिनींच्या शोधात........ (उदा. blogspot.com, wordpress.com, अथवा अजून एखादी)

क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले - पुण्यतिथी

लेखक शेखर यांनी सोमवार, 10/03/2008 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिनी विनम्र अभिवादन. थोडक्यात जीवनपट...... जन्म - ३ जानेवारी १८३१ लग्न - १८४० शिक्षणाची सुरवात - १८४१ मराठवाड्यात शाळेची स्थापना - १८४७ पुण्यात मुलींची पहिली शाळेची स्थापना - १ जानेवारी १९४८ प्रौढांसाठी शाळा चालू - १८४९ निधन - १० मार्च १८९७ - (नतमस्तक) शेखर

मंगेश पाडगांवकरांची गीते

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 10/03/2008 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक दृष्टी दिली. त्यांच्या या कवितांनी दिलेला संदेश पहा. माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे !

धारावी दर्शन सोहळा...

लेखक सृष्टीलावण्या यांनी सोमवार, 10/03/2008 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपण मुंबईत गाडीतून जाताना महालक्ष्मी पुलावर बरेचदा परदेशी पर्यटकांचा थवा दिसतो. तो महालक्ष्मीचा धोबीघाट पाहायला जमलेला असतो जे तद्दन बकवास ठिकाण आहे. आपली भारतीय मार्गदर्शक मंडळी (Tourist Guide) असली ठिकाणे दाखवून भारताची नक्की कुठली प्रतिमा दाखवू पाहतात देव जाणे. माझे तर मत आहे की अश्या मार्गदर्शक मंडळींना हिरव्या सोललेल्या फोकाने बडवले पाहिजे. अशीच मध्ये एकदा झोपडपट्टी पर्यटन (Slum Tourism) / धारावी दर्शन सोहळा अशी टूम निघाली होती.

धान्दल.. गडबड ......आणि सुटका (भाग १ ??)

लेखक आपला आभि यांनी सोमवार, 10/03/2008 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
१४ सप्टेबर २००२ ..महाविद्यालयीन जीवनातिल दुसर वर्ष.. (वेळ आणि वर्ष दिल्यामुले लेखास भारदस्त पणा येतो .. तुम्ही टेन्स होऊ नका ..वाचा .वाचा ) आम्हि नेहमीप्रमाने काही बोधपर (? जाणकार लोकास अधिक सान्गणे नलगे..)चित्रपट पहात आमच्या सन्गनकासमोर बसलो होतो. चित्रपट अगदी रन्गात (अनुस्वार कसा द्यायचा हो ? ) आला होता. आमच्या काहि मित्रानि चित्रपटापासुन प्रेरित होऊन सुचक हालचालि चालु केल्या होत्या. आत आत शिरणार्‍या गुदगुल गप्पा चालू होत्या.. सर्वजन आपापले ज्ञान भाण्डार उघडून बसला होते. (काय ज्ञान असत एकेकाच हो ..

दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला द्यावा?

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 09/03/2008 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मते प्रख्यात खलनायक व बुजुर्ग चरित्र अभिनेता 'प्राण' या॑ना 'फाळके' पुरस्काराने सन्मानित करावे..इतर मिपाकरा॑ना काय वाटते..?

स्ट्रिकर्स - नग्नधुमकेतू

लेखक व्यंकट यांनी रविवार, 09/03/2008 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांत भारताच्या विजयापेक्षा अधिक प्रकर्षाने जी बातमी झळकली ती म्हणजे एक प्रेक्षक नग्नावस्थेत मैदानावर ऍन्ड्रू सायमंड्स च्या दिशेने धावत गेला आणि सायमंड्सने त्याला धक्का मारून पाडल्याची. अश्या नागव्याने धावण्याच्या कृत्यास पश्चिमी सभ्यतेत (?) 'स्ट्रिकींग' असे संबोधतात. विकीपिडीयानुसार स्ट्रिकींगचा शब्दशः अर्थ वेगाने जाणे असा होतो. स्ट्रिकींगचा अर्थ रहदारीच्या ठिकाणी नागव्याने ( धावत ) जाणे असा कधी झाला ते विकीपिडीयावरच वाचता येईल. अर्थात धावत जाणं महत्त्वाच नाही. काही संथपणे निर्विकार चेहर्‍यानी चालणारे सुद्धा असतात.

सारण की पुरण??

लेखक धनाधीश यांनी रविवार, 09/03/2008 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
करंज्यांमध्ये जे भरतात, त्याला आम्ही सारण म्हणतो. पण आमच्या शेजारी-पाजारी राहणा-या बहुजन समाजातील कुटुंबांमध्ये यालाच पुरण म्हणतात. माझ्या माहितीनुसार पुरणपोळीत जे असते, त्याला पुरण म्हणतात. मिपावरील खवय्ये याबाबतीत अधिक मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा.
Taxonomy upgrade extras

गोळी

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 09/03/2008 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आमच प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता खुळी उगाच चरले काल रातरी काहीबाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... अंतरातली उलथापालथ मी बावरते बंद पाहूनी दार जराशी मी घाबरते तो थांबून देतो धक्का तेव्हा दारालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... ............ अन मी निघून जाता तोही