Skip to main content

लोकमित्र मंडळ - शिक्षणात्मक लेख लोकांत पोचवण्याचा प्रकल्प

लेखक धनंजय यांनी सोमवार, 24/03/2008 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
तीन महिन्यांपूर्वी यनावाला यांनी (अन्यत्र) चालू केलेल्या विषयावर पुढे विचार येथे देत आहे. गेल्या तीन महिन्यात लोकमित्र प्रतिष्ठान नावाची एक विश्वस्त संस्था मी फोंडा, गोवा, येथे पंजीकृत केली आहे. या संस्थेची कागदपत्रे विश्वस्तांच्या हातात रजिस्ट्रार कडून आता प्राप्त झालेली आहेत (विश्वस्त तसेच संस्थेसाठी मी दिलेल्या पैशांचा करण्यास समर्थ म्हणून माझे काही नातेवाईक योजले आहेत. मंडळ कार्यरत झाल्यावर यांच्या हातून जबाबदारी आणि सूत्रे काढून टाकावीत अशी माझी इच्छा आहे.) काम एक कार्यकारी मंडळ करेल.

कविवर्य सुरेश भट स्मृती मुशायरा

लेखक चित्तरंजन भट यांनी रविवार, 23/03/2008 21:16 या दिवशी प्रकाशित केले.



दिनांक १८ एप्रिल २००८ रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.
ह्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना सुरेशभट.इनतर्फे आग्रहाचे आमंत्रण आहे.


मुशायऱ्याचे स्थान:
भरत नाट्य मंदिर, पुणे

७-८-९

लेखक पुष्कर यांनी रविवार, 23/03/2008 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
सृष्टीलावण्याचं चांदण्यात रात्र रात्र वाचलं आणि डोक्यात अगदी भिकार सावकार पासून ते मुंगूस, चॅलेंज, बदाम सात, ५-३-२, ७-८, बेरीज झब्बू, गुलाम चोर, लॅडीज, मेंढीकोट, नॉट ऍट होम, जजमेंट/बिस्मार्क, कॅनस, ३०४, २८, रम्मी, तीन पानी पर्यंत खेळांची गर्दी झाली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळ्याने एकच खेळ सारखा डोकं वर काढत होता, तो म्हणजे ७-८-९. हा एक नव्यानेच कळलेला खेळ (तरी मला तो शिकून ७-८ वर्षं झाली असतील). "शॉर्ट अँड स्वीट" अश्या शब्दात वर्णन करावं असा हा खेळ आहे. पण तरीसुद्धा हा खेळ त्याचं व्यसन लावू शकतो. मग कितीही झालं तरी डाव संपवावासा वाटत नाही.

मृत्यु आणि मृत्युंजय

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 23/03/2008 16:17 या दिवशी प्रकाशित केले.

आज दिनांक २३ मार्च, आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ७७ वा हौतात्म्यदिन. ध्येयाप्रत समर्पित जीवन आणि हौतात्म्य याचा एक नवा आदर्श या त्रिमूर्तीने निर्माण केला. bhagatsingh

raj sukhdev

मिसळ पाव कट्टा, पुणे

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 23/03/2008 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, काल आम्ही पुण्यातले मिसळ-पाव.कॉम प्रेमी एकत्र जमलो होतो..मजा आली. सविस्तर वृत्ता॑त विजुभाऊ लिहितच आहेत, तोपर्य॑त हे फोटो पाहा..

शिक्षण-प्रयोग-स्वप्ननगरीच्या धरतीवर, स्वप्न साकार होई पर्यंत

लेखक संजीव नाईक यांनी रविवार, 23/03/2008 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
भावधारा अकॅडमी शिक्षण-प्रयोग-क्रेन्द्र स्वप्ननगरीच्या धरतीवर, स्वप्न साकार होई पर्यंत जो जीवन-सुखाच्या शोधात आहे. ज्याला दु:ख नकोय. जीवन जन्मतः पराश्रित आहे, म्हणून सुखी कसं व्हायचं आणि दु:खाला बाजूस कसं सारायचं -- जाणता, अजाणता प्रत्येकाच्या जीवनाचे सतत हेच चिंतन किंवा प्रयत्न सुरू आहेत. शिक्षण हेच जीवनाला सशक्त करते. त्याला पराधीनते पासून मुक्त करून स्वाधीन बनविते. नंतरच एक सार्थक तसेच सुखी जीवन अस्तित्वात येते. शिक्षण म्हणजे काय? प्रत्यक्ष किंवा परोक्ष रूपाने कला संपादन करणे हेच शिक्षण होय.

मिपाचे धोरण..

लेखक सरपंच यांनी शनिवार, 22/03/2008 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिसळपाव ह्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! :) आपल्याला कोणतीही अडचण आल्यास ती कृपया या पत्त्यावर लिहून कळवावी. अडचण कळवण्यापूर्वी कृपया हे एकदा वाचून पाहावे. येथे लेखन करण्यापूर्वी मिसळपावचे (मिपाचे) खालील धोरण ध्यानात घ्यावे व सहकार्य करावे, ही नम्र विनंती..
  1. लिहिणार्‍या प्रत्येक माणसाबद्दल व त्याच्या लेखनाबद्दल मिपाला अत्यंत आदर आहे परंतु मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे.