!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!
मि पा पुणे पहीला कट्टा सहसंवादः
मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तः
आभासी दुनेयेतून खर्या दुनियेत येवुन भेटायचे म्हणोन मिपा सदस्याना एक्दम उत्साह आला होता.
ति.छोटा डॉन यानी काडी फेकण्याचे उत्तम काम केले आणि मिपा सदस्य पुणे पहीला कट्टा सहसंवाद याची आग भडको लागली;
तेणेकरून धमाल मुलाने जोरात फुंकर( कशाची विचारु नका) मारुन आगोटी जीवित ठेवली.यात तेल तूप लाकडे देण्याची जबाबदारी सगळ्या मिपा पूणे सदस्यानी घेतली.
तेणेकरोन मिपा सदस्य पुणे पहीला कट्टा सहसंवाद याच्या तारखा मुक्रर झाल्या. हुताशनी पौर्णीमा नन्तर ची वैशाख शुद्ध प्रतिपदा धूलीवन्दण इसवी शके २००८ त्रुतीय मासाच्या २२व्या दिनी हा कट्टा पुण्यपत नगरीस्थित कात्रज स्थळी सगळे सदस्यभेटणार असे ठरले.(कोण रे तो खवट ....सदस्यांचा कात्रज होइल म्हणणारा) ईनोबा ; धमाल आदी सरदारानी आपली कामगिरी चोख बजावली. काही सदस्यानी त्याना आडुन स्थळ बदला असे सांगुन पाहीले.पण स्थळ प्रेमामुळे सरदार धमाल आपल्या भूमीकेवर अविचल राहीले.( थोरले आबासाहेब जसे प्रतापगड च्या लढ्यावेळी राहीले होते तसे) त्यानी सगळा बंदोबस्त पक्का ठेवला होत. सगळ्या वाटा डोळ्यात गोडे तेल घालुन राखल्या होत्या.
सर्व सरदाराना निमन्त्रणे चांदीच्या ई मेल द्वारे पोहोच झाल्या. तसेच भ्रमण ध्वनी द्वारेही नीरोप पोहोचवण्यात आले होते. येणे कारणे
तन्त्रज्ञानाचे सर्व प्रकार वापरून खातरजमा करुन घेतली.
ठरलेल्या वेळी एक एक सरदार घोड्यावरून / रथातुन येवु लागली.घोड्याची पागा वगैरेंचा ही बन्दोबस्त होताच त्यामुळे घोडी वाहतूक त्रास निर्मुलन सैन्याने जब्त करण्याची वेळ आली नाही.
सरदार धमाल त्यांच्या कर्यस्थळाहून (मुम्बै) अगोदरच प्रातः प्रहरी पुण्यपतनास विवक्षीत स्थळी जाण्यासठी पोहोचले होते.
सरदार इनोबा , भुईनळा( आतिष्बाजी स्पेष्यालीस्ट्),चित्तर,ॐकार, बिनीचे सरदार विडंबक केशव्सुमार.विवेकग ,आणि सक्षात छत्रपती सह सरदार ठीक गोरज मुहूर्तावर गडावर पोहोचले
सरदार विजुभाऊ अजून पोहोचले नव्हते..चौकशी अन्ती असे कळाले की त्यांना ऑफीस सारख्याबीन महत्वाच्या कार्यात थोडावेळ वरीष्ठ मुकादम असल्यामुळे ममुख्यालयातहजेरी देण्याचे आदेश आले होते.त्या कामातून मिकळे झाल्यावर सर्दार धमाल याना त्याने त्यांच्या फौजा मार्गस्थ झालेल्या आसोन थोड्या विलंबाने का होइना ते गडावर पोहोचत होते.
या अश्वासनानुसार सर्व सरदारनी आपपल्या ओळखी करुन घेण्यास सुरुवात केली.
सर्वांचे स्वभाव तर सर्व जाणून होतेच. फक्तचेहरे परिचयाचे नव्हते.
ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात ( हा बखरी तला चौक आहे...प्रस्तुत लेखकाने हा शब्द फकस्त पवाड्यातच ऐकला आहे..वाद नको)
म्हणे शाहीर विजुभाऊ सर्वांस जी र जी र जी र जी जी जी जी
( मि पा पुणे पहीला कट्टा सहसंवादःचर्चा ठराव्....बखरीच्या पूढील भूर्जपत्रावर)
वाचने
13823
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
वार॑ माज्या वाघरा..
हा
ऊत्तम
बखर..
:)
विजुभाऊ....
सुरुवात
सरदार विजयराव यांसी,
In reply to सरदार विजयराव यांसी, by चतुरंग
लेखनसीमा.
"लेखनसीमा"
येऊद्या
.
!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक २
In reply to !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक २ by विजुभाऊ
वा!
वाह!
वाहवा!
क्या बात है..
देखोन बहुत आनंद जाहला!
वा विजुभौ :)
ईर्षाद....एक
भाषा वाचोन ........
मिपाची जुनी पाने चाळताना हे
व्वा, भारी !