काही ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे!
II स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मंडळी,
आज मी थोडं तात्विक चित्रविवेचन करणार आहे!
खालील चित्रांत मला काही राग दिसले. या चित्रांना आपण 'ऍब्स्ट्रॅक्ट रागचित्रे' असं म्हणू. आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातली 'राग', ही पूर्णत: भावनांशी निगडीत असलेली संकल्पना आहे. एकच राग प्रत्येकाला तसाच दिसेल असं नव्हे. रागदारी संगीत किंवा एकंदरीतच कुठलीही कला, ही अनुभवायची गोष्ट आहे.
मिसळपाव