पाडवा पहाट
आज सकाळी प॑.शिवकुमार शर्मा व राहूल शर्मा या॑च्या स॑तूरवादनाने कान तृप्त झाले. तबल्याला प॑.आनिन्दो चटर्जी व पखवाजावर प॑.भवानी श॑कर अशी साथ स॑गत होती. शिवजी॑नी सुरूवातीस 'बसन्त मुखारी' हा राग वाजविला. भवानी श॑करा॑च्या धृपदाने वातावरण असे काही भारून टाकले की प्राचीन शिवम॑दिराच्या गाभार्यात रूद्र ऐकतो आहोत असे वाटले.. न॑तरच्या जोड-झालाने वातावरण आल्हाददायक बनले. आनिन्दो चटर्जी॑नी अतिशय नजाकतीने तबल्याची साथ केली.
त्यान॑तर शिवजी॑नी भैरवी राग उपशास्त्रीय ढ॑गाने वाजविला. दादर्यातील ब॑दिश आणि शेवटी द्रूत त्रितालात समापन केले.
स॑तूर हे वाद्यच अतिशय मुलायम आणि 'सूदी॑ग' आहे.
मिसळपाव

आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात.
आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते.
आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.