Skip to main content

किंमत

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी रविवार, 04/05/2008 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
कारणे होती तशी जागायला चांदण्या मज यायच्या भेटायला प्रश्न हा साधाच होता पण तरी लागली ती कारणे शोधायला मी जरी आता सुखी दिसतो तुला खूप किंमत लागली मोजायला काळजी माझी नका इतकी करू काळजी लागेल ही बोचायला बंद मी केले इथे उमलायचे आणि ती आली फुले मागायला हो मला म्हटलेस तू कविते जसे मी खुळ्यागत लागलो वागायला भाव मी दुखःस या थोडा दिला आसवे ही लागली माजायला माणसे येतील ही रस्त्यावरी भूक आहे लागली बोलायला

प्रेमाची गोष्ट

लेखक हेरंब यांनी शनिवार, 03/05/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
कांही वर्षांपूर्वी "प्रेमाची गोष्ट" हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! पण कसलं काय हो, अजून कोणी भेटलं नाही. तर वाचाच त्याबद्दल...... प्रेमाची गोष्ट म्हणजे कॉय ? के.बी. साठे, बी.सी. साठे आणि तात्या पाटील हे तिघे कॉलेजातले जिवलग मित्र. नाटकांत अभिप्रेत असलेल्या काळात, कोणालाच आपल्या जातीची लाज वाटत नसावी, किंवा ते तिघे खिलाडु वृत्तीचे असावेत.

भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभेच्छा

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 03/05/2008 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो , शके १९३० सालची भगवान श्री परशुराम जयंती वैशाख शुद्ध तृतीया दिनांक ०७ मे २००८ रोजी आहे. हा दिवस अक्षय्य तृतीयेचा. समस्त मिसळपावकरांना भगवान श्री परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भगवान परशुरामांना त्रिवार वंदन. अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरंधनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि॥ आपला, (परशुरामभक्त) धोंडोपंत

(एका 'बैलाचे' मनोगत (गजल))

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 03/05/2008 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अजब यांचे 'एका फुलाचे मनोगत (गजल)' कधी तरी मी 'फुगलो' होतो, अता जरी मी 'सुकलो' आहे कधी तरी 'दरवळलो' होतो, अता जरी 'मावळलो' आहे... गुरगुरणारा 'वारा सरला' तेव्हा माझी कळीच खुलली हावरून मी खातच सुटलो; सुस्तच आता पडलो आहे... मला न होते काही वावडे, 'बर्गर' 'पिझ्झा' चाले सगळे 'कोक' पिताना लोक म्हणाले, जिथेतिथे मी सुजलो आहे... अंग बदलले, पोटच सुटले, 'शेप'हीन मी आता उरलो विशाल माझा देह पसरुनी मंचकावरी पडलो आहे... उसंत आली माझ्या नशिबी तीही केवळ काहि क्षणांची शीतकपाटी 'केक' आठवुन त्यातच मी तरि रमलो आहे!... चतुरंग
Taxonomy upgrade extras

आता बोला...

लेखक उदय ४२ यांनी शुक्रवार, 02/05/2008 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुकेश अंबानी यांच्या घराचे वैशिष्ट्य - ४ , ५३२.३९ चौ.

पक्षी निरीक्षण - एक सुन्न अनुभव

लेखक नारदाचार्य यांनी शुक्रवार, 02/05/2008 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांच्या प्रांतामध्ये सांप्रती अनेक नवनव्या आविष्कारांचा वर्षाव होतो आहे. समाजातील जगण्याच्या रीतीमध्ये झालेल्या बदलांचे प्रतिबिंब घेऊन येणाऱ्या या कविता वाचकाला वेगवेगळया पातळ्यांवरचा अनुभव देतच असतात. 'पक्षी निरीक्षण' ही कविता याच मालिकेत जाऊन बसणारी आहे हे निर्विवाद आहे. चेतन या 'नव'कवीची ही कविता कवीने विडंबन म्हणून वाचकांच्या समोर ठेवली असली तरी, तिच्यात मूळ प्रतिभेचे अंकूर पुरेसे दिसतात हे स्पष्ट आहे. मुख्य म्हणजे अनुभवाचा सच्चेपणा आणि ते नेमक्या, मोजक्या शब्दांमध्ये मांडण्याची कवीची हातोटी या गोष्टी याच कवितेच्या नव्हे तर या कवीच्या भावी रचनांचेही बलस्थान ठराव्यात.

पक्षी निरीक्षण

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 02/05/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजु ताइंच्या कवितेवर माझे एक विडंबन भंकस ही करता करता, मन माझे गुंतले मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले... आळसावलेले पाय हे, पसरुन कट्ट्यावरी इकडुन तिकडे फिरवी, ही मुंडी वरचेवरी आज त्याचे ध्यान का, एकीवरचं थांबले मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले... टक लावुन पाहताना, तोंड का वेडावले वळुन मागे पाहताना, मन का पस्तावले नेहमीच्या या खेळामधले, नाविन्य का हे संपले मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले... नजरेत भरता शिल्प हे, हा सांड कोठून उपटला घाम फुटुन सर्वांगाला, कंप का हा भरला जवळ येताना पहून तो, पाय लावून पळाले मस्त पोरी टा

आरक्षण!

लेखक अजिंक्य यांनी शुक्रवार, 02/05/2008 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्षण! अतिशय ज्वलंत विषय!! तसं आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं. पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर..... माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली. त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही. माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. पण, हे कितपत योग्य आहे? शैक्षणिक बाबतीत, प्रवेशाच्या वेळी, गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं. आरक्षण असायला काहीच हरकत नाही.

समर्पण..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 02/05/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिया तुझ्या प्रितीमध्ये हृदय माझे गुंफले, रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी आज तिचे देहभान, सागरातच गुंतले.. रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली, त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... - प्राजु