Skip to main content

पक्षी निरीक्षण

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 02/05/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजु ताइंच्या कवितेवर माझे एक विडंबन भंकस ही करता करता, मन माझे गुंतले मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले... आळसावलेले पाय हे, पसरुन कट्ट्यावरी इकडुन तिकडे फिरवी, ही मुंडी वरचेवरी आज त्याचे ध्यान का, एकीवरचं थांबले मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले... टक लावुन पाहताना, तोंड का वेडावले वळुन मागे पाहताना, मन का पस्तावले नेहमीच्या या खेळामधले, नाविन्य का हे संपले मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले... नजरेत भरता शिल्प हे, हा सांड कोठून उपटला घाम फुटुन सर्वांगाला, कंप का हा भरला जवळ येताना पहून तो, पाय लावून पळाले मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले... चेतन अवांतरः घुसखोरिबद्दल क्षमस्वः (केशवसुमार आणि प्राजु करिता)
लेखनविषय:

वाचने 3243
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

चालू द्या. अवांतर : प्राजू कधी विडंबन करतात का? केशवसुमारांना स्पर्धक?

आळसावलेले पाय हे, पसरुन कट्ट्यावरी इकडुन तिकडे फिरवी, ही मुंडी वरचेवरी आज त्याचे ध्यान का, एकीवरचं थांबले मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले... टक लावुन पाहताना, तोंड का वेडावले वळुन मागे पाहताना, मन का पस्तावले नजरेत भरता शिल्प हे, हा सांड कोठून उपटला घाम फुटुन सर्वांगाला, कंप का हा भरला
:)) :)) :)) चलने दो...एकदम चलनी दिसताय शेठ!!! (ह.घ्या.)