Skip to main content

नमस्कार !!

लेखक पल्लवी यांनी शुक्रवार, 09/05/2008 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! मी पल्लवी.. मिपाचं सदस्यत्व घेउन २-३ आठवडे झालेत आणि ह्या दिवसांत इथे मनसोक्त भटकंती केली आणि हापिसातली टाळकी माझ्यावर हसेपर्यंत खो खो खिदळून घेतलं.. :) म्हटलं आज औपचारिक राम-राम करुनच टाकावा.. खरंच, इथे आल्यापासुन ते आत्तापर्यंत त्रयस्थपणा कधी वाटलाच नाही. काय मनमुराद दंगा घालता तुम्ही सगळे.. लै आवडलं आपल्याला.. :) आता इथे हिंडताना भेटलेल्या आणि आवडलेल्या (;)) लोकांबद्दल. सुरुवात कुठुन करावी ह्या विचारात असताना, आधी डोक्यात आला धमुदादा.. ("दादा" म्हणताना म'णा'ला काय वेद'णा' होतात. : पण काय करणार ? धमुदादाचं लग्न (३ भागांत) उरकलंनीत की तुम्ही..

शेतकर्‍याची कर्जमाफि !

लेखक विजय भांबेरे यांनी गुरुवार, 08/05/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच केन्द्र सरकारने शेतकर्‍याना कर्जमाफि दिली परन्तु हि कर्जमाफि विदर्भच्या शेतकर्‍यासाठी कितपत फायदेशिर ठरलि या विशयावर चर्चा व्हावी ! आपली मते मांडा !

राजू परूळेकरांची मतं

लेखक रम्या यांनी गुरुवार, 08/05/2008 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
राजू परूळेकरांचा लोकप्रभामधील लेख वाचून फार बरं वाटलं. पण राजू परूळेकरांचा या विषयावरील हा एकमेव लेख नाही असं लक्षात आलं. राजू परुळेकरांनी एक वर्षापुर्वी हीच भूमिका मांडली होती. हे लेख मिपाच्या वाचकांपर्यंत पोहोचावेत असं वाटलं. या लेखांचे दुवे खालील प्रमाणे. http://www.loksatta.com/lokprabha/20070216/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20070323/good.htm पण तात्या एकाच प्रकारचे लिखाण म्हणून हे उडवू नयेत ही विनंती. :)

मराठी शिकलेला नवरा नको गं बाई....

लेखक कलंत्री यांनी गुरुवार, 08/05/2008 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
(या मेच्या सुट्टीमध्ये गावाकडे गेलो असताना हा किस्सा घडला. ) आमच्या गावाकडे असणाऱ्या एका मित्राच्या बायकोने तिच्या उपवर आणि सुशिक्षित मुलीसाठी काही मुले पाहण्यासाठी मला सांगितले, त्याप्रमाणे मी तिला तसे आश्वासन दिले आणि ही गोष्ट अश्याच गप्पागोष्टीत माझ्या एका मित्राला सांगितली. माझ्या त्या मित्राने मला विचारले की तुला त्या मुलीबद्दल काय माहीत आहे, यावर मी नकारार्थी उत्तर दिले. त्याने दुसरा प्रश्न विचारला की आपल्या गावामध्ये अश्या कामासाठी मदत करणारे असतील का नसतील.

आधुनिक कृष्ण

लेखक काळा_पहाड यांनी गुरुवार, 08/05/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माचे भोग भोगांसाठी जन्म आईच्या दुधातुन भोगांकडे स्त्रवणे मातेची ममता अन् बापाचा धाक पाळणाघरातल्या कृष्णाला यशोदेची हाक दिवसा यशोदा अन् रात्री देवकी वसुदेव की नंद सगळाच आनंद रंगतो रोजच कृष्ण-देवकी भेटीचा प्रयोग सुटीच्या दिवशी यशोदेला वियोग ना झोपेला अंगाई ना भुकेला लोणी जन्मला कृष्ण गातो नर्सरीची गाणी वाघीणीच्या दुधावर गोमुत्राची शिंपवणी कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी जग एक बाजार बाजारात कृष्ण 'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न यशोदेला सोडुन कृष्ण मथुरेला येई देवकीला विसरुन कंसाचा होई कंस आणि कृष
Taxonomy upgrade extras

ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का?

लेखक ऋचा यांनी गुरुवार, 08/05/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफीस मध्ये दुपारचे जेवण झाले की झोप न यायचे काही उपाय ... (बाहेर जायचा उपाय सांगू नका खुप ऊन असतं.. (खुप झोप अलेली मी) I)

धोतर (हे लिखाण काढून टाकण्यात आले आहे.)

लेखक कैलासराजा यांनी गुरुवार, 08/05/2008 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मि.पा.वर लेखन करण्यापूर्वी 'हे वाचा', अशी स्पष्ट सूचना देऊनही विषयाचा आगापीछा नसलेले आणि मि.पा.च्या रसिकांचा अपमान होईल असे वाह्यात लिखाण येथून काढून टाकण्यात आले आहे.

व्योमक्षेमं वहाम्यहम्

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 08/05/2008 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे. आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!