मराठी शिकलेला नवरा नको गं बाई....
(या मेच्या सुट्टीमध्ये गावाकडे गेलो असताना हा किस्सा घडला. )
आमच्या गावाकडे असणाऱ्या एका मित्राच्या बायकोने तिच्या उपवर आणि सुशिक्षित मुलीसाठी काही मुले पाहण्यासाठी मला सांगितले, त्याप्रमाणे मी तिला तसे आश्वासन दिले आणि ही गोष्ट अश्याच गप्पागोष्टीत माझ्या एका मित्राला सांगितली. माझ्या त्या मित्राने मला विचारले की तुला त्या मुलीबद्दल काय माहीत आहे, यावर मी नकारार्थी उत्तर दिले. त्याने दुसरा प्रश्न विचारला की आपल्या गावामध्ये अश्या कामासाठी मदत करणारे असतील का नसतील. मी त्यावर उत्तर दिले की अर्थातच आपले गाव छोटे आहे आणि त्यामुळे कोणी मदत करणार नाही असा विचारही माझ्या मनात येत नाही.
मग त्याने एक उसासा घेतला आणि सांगितले," अरे, ती मुलगी फारच अगोचर आहे. तिला आम्ही काही स्थळे दाखविली, परंतु तिने काही चांगल्या स्थळांना तिने सरळ सरळ नकार दिला, कारण माहीत आहे, की मुलगा मराठी माध्यमात शिकलेला आहे. आता मला सांग तिच्या साठी आम्ही काय इंग्लंडहून नवरा शोधायचा का?, मराठी माध्यमाच्या मुलांना काय धाड भरली आहे? दुर्दैवाने तिची आई पण तिला भरीस टाकत असते." मी जास्त न बोलता अल्पोपहार आणि चहा घेऊन गाशा गुंडाळला.
घरी आलो आणि खरेच मी विचारमग्न झालो. लग्नाच्या मुली शक्यतो खेडे टाळतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच, पण आता मराठी शिकलेला नवरा नको असे म्हणणे म्हणजे फारच झाले, बरे इंग्रजीमध्ये शिकलेला नवरा काय आणि मराठीमध्ये शिकलेला नवरा काय? शेवटी संसार करताना तडजोडीची भाषाच शिकावे लागते.
कदाचित त्या मुलीला आणि त्याही पलिकडे तिच्या आईला आयुष्याच्या शाळेत बरेच शिकायचे आहे हेच खरे.
वाचने
18473
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
दुर्दैव....
In reply to दुर्दैव.... by प्रभाकर पेठकर
हेच..
नकार
In reply to नकार by मनस्वी
खेड्याचे मानसशास्त्र.
In reply to खेड्याचे मानसशास्त्र. by कलंत्री
हा मुलगा
In reply to हा मुलगा by प्रभाकर पेठकर
मुलीबद्दलच लिहिले आहे.
In reply to मुलीबद्दलच लिहिले आहे. by कलंत्री
धन्यवाद..
In reply to खेड्याचे मानसशास्त्र. by कलंत्री
वार्ता खरी असेल तर
In reply to वार्ता खरी असेल तर by मनस्वी
मग असा मुलगा खेड्यातील मुलीला पसंत करेल काय?
In reply to मग असा मुलगा खेड्यातील मुलीला पसंत करेल काय? by खरा डॉन
अवघड प्रश्न.
दुर्दैवच
In reply to दुर्दैवच by प्रियाली
न्यूनगंड!
ती मुलगी आणि तिची आई (मम्मी)
उथळपणा , प्रबोधन , इ. इ.
In reply to उथळपणा , प्रबोधन , इ. इ. by मुक्तसुनीत
मनातलं बोललात...
अशी
अंतिम ध्येय...
In reply to अंतिम ध्येय... by प्रभाकर पेठकर
गैरसमज क्र.२
In reply to गैरसमज क्र.२ by रविराज
बर्याच अंशी सहमत.
In reply to गैरसमज क्र.२ by रविराज
माफ करा
In reply to माफ करा by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)
बिलकुल...
In reply to माफ करा by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)
माझेही
In reply to माझेही by llपुण्याचे पेशवेll
बस येकच ष्टेप मागे हाये
In reply to माफ करा by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)
स्वयंभू
In reply to स्वयंभू by रविराज
इंग्रजी किंवा कोणतीही भाषा सुधारण्यासाठी
In reply to इंग्रजी किंवा कोणतीही भाषा सुधारण्यासाठी by चतुरंग
धन्यवाद
In reply to माफ करा by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)
१०० % सहमत...
फार मोठी व्याप्ती असलेल्या विषयाची ही फक्त एक चुणूक आहे!
इथे
वेगळा विचार
In reply to वेगळा विचार by प्रियाली
अधिक विचार
In reply to अधिक विचार by भडकमकर मास्तर
चुकीचं एक्सटेंशन
In reply to चुकीचं एक्सटेंशन by प्रियाली
+१
In reply to चुकीचं एक्सटेंशन by प्रियाली
कारण लग्न
मराठी माध्यम आणि ईन्ग्लिश
येक शंका..........
त्या
प्रियालीत
ह्याचा
आशिच एक गोष्ट
In reply to आशिच एक गोष्ट by नेत्रेश
छान गोष्ट
नेत्रेश च्या लेखामुळे नेत्र उघडायला मदत होइल.