Skip to main content

ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का?

लेखक ऋचा यांनी गुरुवार, 08/05/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफीस मध्ये दुपारचे जेवण झाले की झोप न यायचे काही उपाय ... (बाहेर जायचा उपाय सांगू नका खुप ऊन असतं.. (खुप झोप अलेली मी) I)

वाचने 19872
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

खरं सांगू का? कुठलाही उपाय न करता झोपुन जायचे. :) -- ध्रुव

कळफलक दूर सारून मेजावर प्रकल्पासंबंधीचे बाड ठेवा. हाताचे कोपर मेजावर टेकवा. तळहातावर हनुवटी टेकवून गंभीर पणे प्रकल्पासंबंधीचे कागद वाचत आहात असा आभास निर्माण करा. आणि मग हळूच डुलकी काढा. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पण हळू हळू सवयीने जमून जाईल. मी असेच करतो ...

मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल

In reply to by अन्जलि

हे तर लै भारी.... अंजली ताईंचे नेहेमीचे प्रतिसाद वाचा. अंजली ताईंच्या खरडवहीत काहीतरी खरडा , त्यावर त्यांचे प्रतिसाद येतील , ते ही वाचा ... अक्षरे जुळवता जुळवता झोप उडून जाईल.... मात्र ते प्रतिसाद घरी गेल्यावर अजिबात आठवू नका , नाही तर घरी देखील रात्री झोप येणार नाही ... अंजली ताईं : ह. घ्या.

In reply to by कुंदन

जुलव्ता जुलव्ता झोप उदुन जईल असे शुद्ध पाहिजे. सुधीर कांदळकर.

In reply to by अन्जलि

माझी झोप पार उडाली. कसे काय विचारताय? हे जे लिहिले आहे ते वाचून त्यातील शब्द समजून घेऊन आणि मग त्यांचा अर्थ समजून घेऊन...

In reply to by अन्जलि

मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल असेच मनतो. मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं. :) अवांतर : संस्कृत भाषेला घरघर लागल्यावर 'प्राकृत' बोली अशीच असेल असे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं. सर कय राव गरिभाचि घेतय... बकि म्हल पन हे वचुण असच लै येद्यासारख वातत... प्राकॄत बोलीवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

१.कंपनी सोडणारा पुढला कोण? ह्य प्रश्नाच उत्तर शोधण्यासठी एक गुप्त हेर एजन्सी सुरु करा. २. तुमच्या बॉस ला "ब्लँक कॉल" करा. ३.तुम्ही बसता तिथले फर्निचर पार हल्वुन सोडा. शेजार्‍याच्या खुर्चिशी तो पार चवताळॅ पर्यंत काड्या करा. ४.कंटाळा येइस्तोवर, हाता पायाची बोटे आधि सरळ आणि मग उलट क्रमाने मोजा. ५.मीटिंग मध्ये फालतु प्रश्न विचारुन त्या लांबवा. ६.लोकांचे काम करतान्चे विचित्र हाव भावाचे निरिक्षण करुन, स्वतः ही तस्सेच करण्याचा प्रयत्न करा. ७.शिट्ट्या मारत सुटा. ८.कॉफी कप बरोअबर कचरापेटीत फेकायचा सराव करा. ९. तुमचा पी सी एका वेळेस किती जास्तित जास्त किती ऍप्लिकशन उघडु शकतो हे शोधा.(खुप सार्‍याअ विंडोज् उघडुन) १०.एखाद्या कडे पाहुन कल्पना करा:- हे कार्ट ५ वर्षाचं असताना कसं असेल? लग्नाच्या वेळेस कसं वेंधळेपणा करेल(केलेला असेल)? ११. चाहाच्या वेळेतुन "वर्क ब्रेक्स" घ्या! १२.लोकंचे डोके खात चला. म्हंजे टेंशन त्यांना.आपल्याला नाही. आणि हो. बालिके, हे सर्व करताना काही क्षुद्र तथाकथित "मॅच्युअर्ड" लोक विचित्र पाहतील्.तिकडे साफ दुर्लक्ष कर.शेवटी आपला दिवस चांगला जाने महत्वाचे. काय? :-) :-)) ;-० ;-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

अहो अंजली देवी. काय आहे हे??? वाचता येइल अस खरडा की काहीतरी ~X( डोळे फुटले की अक्षर जुळवुन जुळवुन

In reply to by ऋचा

"तुम्हाला फार सवय आहे का?" कुणासाठी आहे प्रश्न? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

ऋचाताई, तुमच्यासाहेबाचा इमेल आयडी द्या B) .. मग बघू कशी झोप येते :W (साहेब)केशवसुमार स्वगतः- हिचा साहेब माझ्या सारखा झोपणारा (|: असला तर काय करवे ?? :\

उगाच काहितरी... म्हणे ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का? कशाला?मला तर अजिबात जमणार नाही. X( कारण, अलिकडेच डॉक्टरांनी मला दुपारचे जागरण बंद करायला सांगितले आहे. :D अबब

In reply to by केशवसुमार

एकदम सही .... माझेही हेच मत आहे. विकांताला घरची कामे उरकल्यावर श्रमपरिहार ऑफिसमधे नाही करणार तर कुठे करणार. शिवाय घरी असताना भार नियमनामुळे पंखा नाही चालत , मग झोप नाही होत बा नीट आपली. =))

केशव्कुमार अगदि बरोबर. मि किति बरोबर लिहिलेय न? बाल हलुहलु शिक्तेय चुकाचि मफि असवि

ते बरोबर आहे पण मी जेंव्हा झोपते तेव्हाच नेमका येतो हो तो ~X( झोप डोळ्यात असते आणि तो काय बोलत असतो ते शुंभा सारख ऐकाव लागतं.. डोक्यात काही शीरत नाही :(

जी संस्था आपल्याला कामा साठी पैसे देते , त्या पैश्याला जागुन काम करा. म्हणजे झोप येणार नाही. - (कामसु) शेखर

In reply to by शेखर

मॅनेजर झाले की झोप उडते.. स्वःता झोपत नाहीत आणि दुसर्‍याला पण झोपू देत नाहीत..पुढच्या जन्मी अजगर व्हाल.. ह. घ्या.. मी झोपेत आहे.

हे बाकी खरे आहे. मी हा उपाय करून बघितला : सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार हा व्यायाम करतो. ऑफिसला येण्यापूर्वीच सकाळी (७:३० ला) घरून जेवणच करून येतो. दुपारचे जेवणाला सुट्टी. दुपारी एखादे सफरचंद खातो. झोप येत नाही. -- ( काम असेल तेव्हां २४ * ७ काम करणारा ) कुंदन

In reply to by ऋचा

मग अवघड आहे बा ... आयला ... आमरस चापायचा , ए. सी. मध्ये बसायचे मग झोप येणार नाही तर काय होणार ... जरा २ घास कमी जेवा ,

काम असताना कुणीही काम करेल. काम नसताना कुणीही आराम करेल. त्यात काय एवढं? खरी मजा ह्यातच की, काम भरपूर आहे,भन्नाट लोड ने सगळ्यांनी हाय खाल्ल्लीए,आणि आपण मात्र तरीही संतांच्या शिकवणीनुसार स्थित्प्रज्ञ राहुन आराम करतोय. समर्थ म्हणतातः- "दास डोंगरी राहतो उत्सव रामाचा पाहतो." तर तात्पर्य हेच की:- तुम्ही मनाए एखाद्या हिल स्तेशन ला जा.(डोंगरावर) आणि रामाचा उत्सव पहा.(ही सृष्ती,त्यात होणारे बदल्,पाउस्,वर्षा ,वसंत्,सारं सारं काही) पहा प्रसन्न वाटतं की नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

ही तर माझ्या वर निघाली..झकास गं रूचा....मी नुसताच टाईमपास करते ही तर झोपतेच..... :D

In reply to by वरदा

आयुर्वेदात दुपारी झोप येवू नये यासाटी "निद्रानाशान्तक" गोल्या हायेत झ्वापातून उटण्यापूरवी दोन अन् झ्वाप लागल्यावर् चार पाटणकराच्या काड्यात घे पोरी आयूरवैदू..........कैलासराजा

हम्म् , झोप न येण्याचा उपाय !!! आत्ता लगेच सांगायला हवा का ? सध्या मला अंमळ कंटाळा येऊन झोप येते आहे ... तेवढी क्षणिक डूलकी झाली की सांगतो ... पण समजा ऑफीसमध्ये झोपले नाही तर करणार काय ८-१० तास ? त्या "डॉर्मेट्रीत" काय "मधमाश्यापालनकेंद्र" उघडायचे काय ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अग ऋचा, ऑफीस मध्ये झोप येते म्हणजे रात्री तुला पुरेशी झोप मिळत नसावी . रात्री ही मीपावरच पडी क असते का? रोज सलग ७ ते ८ तास झोप उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक असते. झोपेचे नीट नियोजन कर म्हणजे ऑफीस मध्ये झोप येणार नाही. ईश्वरी

दिवसा ऑफीस ...रात्री मीपा झोप काढणार कधी? त्यासाठी एक काम करा... रात्री झोपत जा. आणि ऑफीस मध्ये मीपा वाचत जा. नाहीतरी तुम्ही ऑफीस मध्ये झोपतातच . मग मीपा वाचत जा. झोपलेले दिसण्यापेक्षा atleast काहीतरी काम करीत आहात असे तरी boss ला वाटेल. -- वेलदोडा

:) अरे दादा... काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते...

अरे दादा... काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते... मग एक काम करा ताई...रात्री व्यवस्थित झोप काढा. (झोप की मीपा ह्यात कशाला प्राधान्य दयायचे ते ठरवा.)

In reply to by चिन्मय

फ्लोपी डिस्क ला केळ लाउन कन्पुटर मधे टाका .. परत बाहेर काढुन हेल्प देस्क ला फोन करा . ...