Skip to main content

२६ जुलै २००५ एक अनुभव !!

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 26/05/2008 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
आता काही दिवसात पाऊस चालु होईल. पावसाळा हा सर्वांना आवडतो. माझ्यासकट सर्वांच्या रम्य आठवणी पावसाशी निगडीत असतात मग ते पावसात मनसोक्त भिजणे असो वा केलेला एखादा सुंदर प्रवास असो. २६ जुलै २००५ पासुन मात्र मुंबईकरांना पाऊस म्हणले की एक प्रकारची सुप्त भीती वाटू लागली आहे. 'न भुतो न भविष्यती!' अशा प्रकारचा झालेला पाऊस जो मी अनुभवला तो शेअर करण्याचा एक प्रयत्न .

गुलाबाचा सण

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 26/05/2008 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष एक झाल सखे गुलाबाचा सण होता दोन मने जोड्णारा एक वेडा क्षण होता फुललेल्या गुलाबाला एक फुल दिल होत लाजुनिया फुल वेड बावरुन गेल होत मनामध्ये होती भीती काटे त्याचे बोचतिल नकाराचे शब्द तिचे कायमचे टोचतील पण माझ्या गुलाबाला नव्हतेच मुळी काटे डोळ्यांनीच बोलणारे होते वेडे फुल माझे वर्ष एक गेल कस कळलच नाही काही गुलाबाच्या गंधातच गुंतुनिया मन राही
Taxonomy upgrade extras

मयत (२) --- करीअर गायडंस वर्ग

लेखक आंबोळी यांनी सोमवार, 26/05/2008 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली एखादा प्रकार हीट झाला की लगेच त्याच्या आवृत्त्या काढायची फ्याशन येते. एखादा पिक्चर हीट झाला की लगेच त्या थीमच्या 3-4 आवृत्या निघतात. हा प्रकार इथे मिसळपाववर नवीन नाही. एक खायाली पुलाव फेमस झाल्यावर लगेच तो प्रकार 5-6 जणानी वापरला. एक रेखाटन प्रसिध्ध झाल्याझाल्या लोकानी लगीच आपापली बरीच वर्ष कपाटात असलेली, घड्या, डाग पडलेली रेखाटने काढून मिपावर डकवली. सांगायचा उद्देश एवढाच की एखाद्या प्रकाराला प्रसिध्धी मिळती आहे म्हणल्यावर वाहत्या गंगेत बरेच जण हात धुवून घेताना दिसतात. भडकमकरांचे गायडंस वर्ग तुफान चालतायत बघून आम्हीही या गंगेत हात धुवायचे ठरवले.

मुंबई ते मैसूर

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 26/05/2008 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतः हे सुंदर शहर पाहण्यासाठी किंवा दुस-या कुणाला दाखवायच्या निमित्याने ते पुनः पाहण्यासाठी मी पूर्वी तीन चार वेळा मैसूरला एक पर्यटक म्हणून येऊन गेलो होतो. त्यातल्या प्रत्येक वेळी इथली प्रेक्षणीय स्थळे एकामागून एक पाहून पुढचे ठिकाण गांठण्यात थोडी घाईगर्दीच झाली होती. त्यासाठी इकडून तिकडे फिरतांना शहराचा जेवढा भाग दिसला होता तेवढा पाहूनच हे गांव माझ्या मनात भरले होते. कधी काळी आपण इथे रहायला येऊ शकू अशी शक्यता त्या वेळेस स्वप्नातसुध्दा दिसत नव्हती त्यामुळे इथल्या रहिवाशांचा थोडा हेवाच वाटला होता.

बोगदा

लेखक हेरंब यांनी रविवार, 25/05/2008 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
परवा पुण्याहून मुंबईला येत होतो. बरेचवेळा वाचलेली पाटीच परत वाचली. ' बोगदा पुढे आहे.' नेहमीप्रमाणेच खटकले, असं का लिहिलाय ? 'पुढे बोगदा आहे' असं का नाही ? मग आठवलं, दादांच्या 'पांडू हवालदार' च्या टायटल्स् दाखवताना अशीच मजा केली होती. पांडू हलवादार - दांडू हलवापार वगैरे वगैरे. म्हणून या वाक्याचं पण असेच करुन पहावे असं मनांत आलं. बोगदा पुढे आहे. बोगदा आहे पुढे. पुढे बोगदा आहे . पुढे आहे बोगदा. आहे पुढे ,बोगदा! आहे बोगदा पुढे. सरकारी खात्यातल्या लोकांना कुठला पर्याय योग्य वाटेल ?

कधी सांज ढळत असताना...

लेखक फटू यांनी शनिवार, 24/05/2008 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. करणिकांचं फिजीओलॉजीचं शेवटचं लेकचर संपलं. सेकंड एम बी बी एस च्या वर्गातून पांढरा शुभ्र एप्रन घातलेली भावी डॉक्टर मंडळी भराभर बाहेर पडली. अविनाशसुद्धा घाई करत वाचनालयाच्या दिशेने निघाला. आज काहीही करून ग्रे चं anatomy चं पुस्तक मिळायला हवं याच विचारात तो चालला होता. तो जिना चढून दुस~या मजल्यावर आला. त्याच्या मागोमाग मोठ्याने चपलांचा आवाज करत कुणीतरी येत असल्याचं त्याला जाणवलं. ''असेल कुणी सीनियर किंवा स्टाफ मेम्बर", तो स्वताशीच पुट पुटला. "ए स्कॉलर", मागून आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं.