Skip to main content

उद्या संत तात्याबा पुण्यात!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 11/06/2008 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, उद्या आम्ही काही महत्वाच्या कामाकरता पुण्यात येत आहोत. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी आम्हाला थोडी सवड मिळेल. तेव्हा मिसळपाव डॉट कॉमचे तंत्रविभाग प्रमूख नीलकांत यांची भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे आमचे काही मित्र धमाल मुलगा, डॉ दाढे, आनंदयात्री, पेठकरशेठ, इनोबा यांचीही भेट घ्यायची आमची इच्छा आहे. अर्थात, सदर मंडळींना आपापले उद्योगधंदे आहेत याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे कुणावरही सक्ति नाही. 'पुरेपूर कोल्हापूर' या नावाचे एक हॉटेल पुण्यात आहे. संध्याकाळचे भोजन आम्ही त्या हॉटेलात घेऊ. वरील मंडळींनी आम्हाला तेथे जेवायची कंपनी दिली तर आम्हाला आनंद होईल...!

संडे स्पेशल (खव्याच्या पोळ्या)

लेखक स्वाती राजेश यांनी बुधवार, 11/06/2008 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
खव्याच्या पोळ्या साहित्यः १/२ किलो खवा २ वाट्या कणिक, कणिक भाजायला ३ टे.स्पून तूप २ मोठे चमचे खसखस ७-८ वेलदोड्याची पूड ४ वाट्या पिठीसाखर ४ वाट्या कणिक, १ चिमूट मीठ १ वाटी मैदा १ वाटी बारीक रवा १२ टे.स्पून तेल तांदुळाची पिठी १.प्रथम कढईत खवा गुलाबी रंगावर भाजावा. २.२ वाट्या कणिक तुपावर खमंग भाजावी. ३.खसखस भाजून कुटून घ्यावी. ४.वरील सर्व,पिठीसाखर,वेलदोडा पूड घालून चांगले मळावे. ५.कणिक, मैदा,बारीक रवा तेलाचे कडकडीत मोहन घालून भिजवणे,(फार घट्ट नको).

मनोगत

लेखक काळा_पहाड यांनी बुधवार, 11/06/2008 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
;) X( याहू ! याहू मिपावरचे माझे खाते पुन्हा उघडले. आनंद अत्यानंद आणि काय काय ते!!!! मिपाचा विरह! संपुर्ण महिन्यासाठी !!! जसा धरित्रीला वरूणराजाचा अमावस्येला चांदण्यांना चंद्राचा ग्रीष्मात वृक्षांना पानांचा आणि नद्यांना पाण्याचा. लिहायला मिळत नाही. लिहायचं मरू द्यात पण प्रतिक्रिया द्यायचही लायकी नाही. छ्या ह्या जगण्याला काय अर्थ ?????? फार सहन केले. आता पुन्हा नको ते दीनवाणेपण. सर्वांना सहर्ष नमस्कार.

पुपुर्झा

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 11/06/2008 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच ठाउक नाही ,मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ शकेलच अस नाही, हरकत नाही काही तरी अपेक्षा ठेउन का होइना देत जाव्,समोरच्या कडून अपेक्षा भंगही होइल, पण कदाचित तो पर्यंत देण्याची सवय लागलेली असेल.

या वाटेवर

लेखक रामराजे यांनी बुधवार, 11/06/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
दिप मिळाले जे मजला, आकांक्षाची होळी करुनी राख राख चेतवुन मी, तेच जाळिले रस्त्यांवरुनी इथे घाव माझेच पुराने, या वाटेवर ना कुठे चांदणे नको रुसु त्या बहरांवरती, फसवुन ज्यांनी ग्रीष्मात नेले वळणावरती होउ वेगळे, घेउन हिस्से आपआपुले इथे प्रेम ही केविलवाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे मळभ उरातील नैराश्येचे, माथ्यावरती आले भरुनी धुळीत मिळुनी स्वप्नफुले ती, वेड्यावानी गेली विरुनी इथे दु:खाचे झुलती पाळणे, या वाटेवर ना कुठे चांदणे जिथे कोसळे वीज अचानक, त्याच कातळी आपुले निशान तिथे बहरत्या वसंतातही, उमलुन येई काट्यांचे रान इथे फक्त फसवे बहाणे, या वाटेवर ना कुठे चांदणे कृपया

गळू.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 11/06/2008 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
यमक जुळवत विनोद साधण्याचा एक प्रयत्न.....