Skip to main content

उद्धवा! अजब तुझे सरकार

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 24/06/2008 03:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस उजाडूनी होतो सुरू होतात अवहेलना अन तक्रारी त्याही पेक्षा ती रात्र बरी उजळणी होते रात्रीची स्मरूनी बाचाबाची सकाळची तू तू अन मी मी ची अन खऱ्या खोट्याची उद्धवा! अजब तुझे सरकार जनार्धनाची हीच तक्रार तुझ्याच दारी न्यायमंदिरी खोटे बोलणे झाले असुनी खरे मानण्याची कसली जबरी सत्तेची ही कसली खूमखूमी श्रीकृष्ण सामंत

दाखविली मातेची व्यथा कौतुके

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 23/06/2008 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू जन्मी येता देवून प्रचंड वेदना न्याहळते ती तुला घेवून गोड चुंबना घेई तुला ती माऊली पोटाशी रडून मात्र तू जग डोक्यावर घेशी वेळी अवेळी जवळ घेवूनी पाजिते ती तुला घेवूनी पदराशी दुदु पिताना तू मात्र तिला लाथेने धुसक्या मारिशी शिकविले चालण्या जिने तुला हांक मारता दूर धावशी सोडून तिला तुला खेळण्या आणे ती खेळणी एक एक करूनी टाकशी तू मोडूनी गोड खाऊ करूनी देते तुला बशी जमिनीवर तू खाऊ तुझा उडवून देशी छान छान कपडे तुला तिने आणिले खेळुनी मातीत तु ते सर्व मळविले शिकवीण्या शाळेमधे घेवून गेली तुला न जाण्याचा रडूनी गोंधळ तू घातला संगीत शिकण्या दाखल केले शाळेला रियाज करण्याचा सराव तू सोडुनी दिला मित्रासंगे

कहाणी अक्कलदाढेची: भाग दोन

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी सोमवार, 23/06/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
".. पण डॉक्टर अक्कलदाढ येता॑ना माझा गाल का सुजलाय.. असह्य दुखत॑य..दोन दिवस झोप नाहिये.. सेशनल्स तो॑डावर आल्यात आणि ही दाढ मला हातात पुस्तक घेऊन देत नाहिये.." मेघनाच्या डोळ्यात पाणी आल॑ होत॑. अक्कलदाढ तो॑डात उगवण्याचा प्रयत्न करीत असेल तर पुष्कळदा शेजारच्या दाढेच्या मुळा॑वर खूप दाब पडतो व त्यामुळे वेदना होतात. सामान्यतः दाताच्या वेदना फक्त एकाच जागी जाणवत नाहीत (लोकलाईझ होत नाही) तर जबड्याची ती बाजू व आसपासचे अवयवसुद्धा (कान, डोके इ.) ठणकतात. (पेन रेडिएट होते). क्वचित प्रस॑गी कानात वेग-वेगळे आवाजही येतात (टिनिटस).

MANGO- LASSI

लेखक राधा यांनी सोमवार, 23/06/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- एक वाटी आंबट दही, एक वाटी आंब्याचा रस किंवा चिरलेला आंबा, चवीला साखर , वेलची पुड क्रुती :- १) दही रवीने व्यवस्थीत घुसळून घ्यावे २)आता त्यात आंब्याचा रस, साखर व वेलची पुद घालावी ३)थोडे पाणी घालुन पुना चांगले घुसलावे ही लस्सी फ्रीज मधे थंड करावी किंवा बर्फ टाकुन प्यायला द्यावी.

आम्‍ही आणि आम्‍ही लावलेले दिवे

लेखक विकी शिरपूरकर यांनी सोमवार, 23/06/2008 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
संकलनः विकास शिरपूरकर फिल्मोग्राफी 1. आमिर खान बॉलीवूड मध्ये ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमीर खान चित्रपटांमध्ये चॉकलेटी हिरोच्या रूपात स्थिरावला. प्रत्येक चित्रपट करताना त्याबद़दल प्रचंड 'चुझी' असलेल्या आमीरने आपल्या अनेक वर्षांच्या कारकीर्दीत खूप कमी चित्रपट केले. एरवी कोणत्याही पुरस्कार व प्रसिद्धीपासून दूर राहणारा आमीर सध्या आपला ब्लॉग लिहायला लागल्यापासून बराच चर्चेत आला आहे.

तुला समजलो, आणि समजली तुझी स्वच्छता

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 23/06/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा कविवर्य अनंत ढवळे यांची नितांत सुंदर, अप्रतिम गझल तुला समजलो, कुठे समजली तुझी सहजता

श्वास श्वास मळमळून यावा तुला बिलगता
खूप दूरवर दिसते आहे तुझी मलिनता

वासाभवती फिरत राहिलो खूपवेळ मी
तुला समजलो,  आणि समजली तुझी स्वच्छता

किती दूरवर आल्यावरती बरे वाटते?
मैलभराचा प्रवास निघतो मोजू बघता..

तुझ्याप्रमाणे जगेन मी ही, तुझ्या सवे पण
खरेच का येईल मला हे स्वच्छ राहता..?

विचार करतो कुठे कुठे बदलेन शब्द मी
विडंबनासाठी एखादे काव्य निवडता.....!

केशवसुमार

माझी चतुर्थी

लेखक ऋचा यांनी सोमवार, 23/06/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मी घरी (खालापूर येथे) गेलेले. माझ्या घरातुन महड येथे जाण्यास १५ मिनिटे लागलात. काल मी विचार केला घरी बसण्यापे़क्षा जरा मढास जाऊन यावे. ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . (मी नास्तिक असल्याने देवळात जात नाही. पण देवळात जी शांतता असते त्याला तोड नाही.) गाडी काढली आणि निघाले.जरा लवकरच निघालेले कारण चतुर्थी,अंगारकी,एकादशी.. अशा दिवशी भक्तगणांचा उत्साह ऊतु जात असतो. पण माझा इतका विरस झाला ..... तिथे जाऊन मला असे दिसले की महड फाट्याचे तोंड वाहनतळ झाले आहे. त्याच्या समोर "हाळ" नावाचे गाव आहे तिथे बस स्टँड झाला आहे.

बरक्या फणसाचे गरे

लेखक हर्षद बर्वे यांनी सोमवार, 23/06/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
ओळ्खीच्या खात्रीलायक कोकणातल्या आंबेवाल्यांकडून किंवा आपले कोणी कोकणात असेल तर त्यांच्याकडे सांगून एक छानसा कलींगडाच्या आकाराचा "बरका फणस" कच्चा असताना घरी आणावा. कच्चा असताना अशासाठी कारण ह पिकला की अतिशय मऊ होतो.आणि लगेच फोडावा लागतो.

'सनई चौघडे '( चित्रपट ) एक फसलेला रिऍलीटी शो......

लेखक प्रगती यांनी सोमवार, 23/06/2008 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट : " सनई चौघडे "( कांदे पोहे ) रविवार लोकसत्ता मधील चांगले परीक्षण ( कुणीही चुकवू नये असा चित्रपट ) वाचून चित्रपट बघायला गेले आणि पदरी घोर निराशा आली या चित्रपटामध्ये कुठ्ल्या गोष्टीला मेळ्च बसत नाही अशा अतार्किक घटनांची संगती आहे. या चित्रपटाद्वारे नक्की काय सांगायचं आहे त्यांनाच समजलं नाही त्यामुळे आपल्याला पण काहीच समजत नाही :( सनई चौघडे या नावामुळे आपल्याला वाटतं की लग्नामधील किंवा लग्नापुर्वी होणार्‍या गमती जमती यावर हा चित्रपट आहे, पण असं नसून "कांदे पोहे" नावाचं एक वधु - वर सुचक केंद्र असतं आणि ते मुला मुलींच्या ह्जारो अर्जामधून एकमेकांना अनुरूप अशा पाच जोड्या निवडतात, आणि त्

(दिवस असे हे ढकलायचे __)

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 23/06/2008 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
(दिवस असे हे ढकलायचे रडत रखडत जगायचे !!) चालः दिवस तुझे हे फुलायचे ! झोपाळ्यावांचून झुलायचे !! --------------------------------------------------------------------------- दिवस असे हे ढकलायचे! रडत रखडत जगायचे !! ऑफिसला रोज जाणे ! करता रोजची कामे ! बॉसला पुरुन उरायचे !! जळणे शेजार्‍या वर! सोसेना कलिगचे काम घरातले प्रोब्लेम सोडायचे !! होता पहाट वेळी! उरकावी कामांची यादी !! मनात उत्साह भरायचे !! स्वप्नांच्या या खिडकीपाशी ! घे तू श्वास जराशी ! उद्याच्या आशेवर भुलायचे ! दिवस मजेत जगायचे !! दिवस मजेत जगायचे !!
Taxonomy upgrade extras