मिपा संपादकीय...! जाहीर आवाहन..
सर्व मायबाप मिपाकरांना माझा दंडवत...!
राम राम मंडळी,
मिपा हे एक साप्तहिक आहे किंवा पाक्षिक आहे असे मानून 'मिपा संपादकीय...' हे एक सदर दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला सुरू करावे असे मनात आहे. आपल्याकडे सामाजिक, राजकीय भान असणारे, वाचन असणारे, उत्तम विचार असणारे बरेच जण आहेत. या मंडळींचे वृतपत्रीय/आंतरजालीय वाचनही चौरस असते असे माझ्या निदर्शनास आले आहे. या मंडळींनी 'मिपा संपादकीय' या सदरात दर सप्ताहात/पाक्षिकात एक अग्रलेख लिहावा असे वाटते. हा अग्रलेख बहुतकरून भारतातील किंवा भारताबहेरील राजकीय, सामाजिक विषयांवर, ताज्या घडामोडींवरच असेल. त्यातली मते अर्थातच संपूर्णपणे त्या संपादकाचीच असतील.
मिसळपाव