Skip to main content

सहज आठवलं म्हणून...

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 01/07/2008 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
"मौम, मैं जरा फटाकसे जाके ये डॉक्युमेंटसकी फोटोकॉपी करके आती हूं। मिनव्हाईल अगर प्रसाद मुझे ढुंढता है तो उसे बोल देना की ऑफिसका झेरॉक्समशीन ठीक करवाए। इंकमटॅक्स सबमिशनके लिये वो फायनान्सवाले सिरपे बैठे है और ये नामाकुल मशीनभी अभी बंद पडना था। उसे बोल देना.. ठीक है? " मौमिता माझी प्रोजेक्टमधली खासंखास दोस्त. दोघी एकमेकींना विश्वासात घेऊन मदत करत पुढे जाणाऱ्या. प्रसाद माझा पीएल ! "ठीक है। लेकीन तू जल्दी आ। हमेशा देर होती है खाना खानेको तेरीवजहसे.. " "हां हां..

पारिजात

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 01/07/2008 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
नव्हती कधीच अपेक्शा सख्ये तुझ्या समागमाची भेटीस हाय का मग आली माझ्या ही रात्र आसवाची केले किती बहाणे मी तुज दुर सारण्याचे ओठात हाय का मग आले हे तराणे तुझ्या स्मरणाचे दुरस्थ मी जरासा होतो रणान्गणाहुनि जखम हि अशी या अश्वथाची हाय का आली मग नशिबी आता कुठेशी होती झाली जगण्यास सुरुवात माझ्या हे घाव का मग बान्धिलेस तु ललाटीस माझ्या गुन्फले तुज मी स्वप्नात माझ्या, श्वासात माझ्या चान्दण्याचे शाप का मग निद्रेस माझ्या नव्हती कधीच अपेक्शा ना मोगरयाची ना चाफेकळीची गजरा काट्यान्चा हाय का मग असा हा नशिबी माझ्या वेचिल्या तुझ्यचसाठी मी तारकान्च्या दीपमाळा माझ्याच आसमन्ती हाय का मग उल्केचा हा रोष
Taxonomy upgrade extras

ईश्वर!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 01/07/2008 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या अनंत पसार्‍यात मी एकटाच बसलोय! नेहमीप्रमांणे कृतकॄत्य न वाटता आज मन अगदी क्षुब्ध झालंय!! राहून राहून माझी नजर त्या गोलकावर जात्येय...... तसं मी हे सर्वच विश्व जन्माला घातलं..... पण मी अतिशय हौसेनं ज्ञन्माला घातलेला तो गोलक........ पाण्याच्या प्रभावाने टचटचीत फुगलेला तो गोलक.... त्याची किती निगराणी केली होती मी..... किती जोपासना केली....... वेळोवेळी काळजी घेतली घेतली, आवश्यक ती उपाययोजना केली........ अनेक आजारांतून त्याला वाचवला........ आणि अखेरीस तो अगदी परिपक्व केला.... मलाच केव्हढा अभिमान वाटला होता स्वतःचा त्यावे़ळेस........ रसरशीत आणि टचटचीत....... सर्व योग्य परिस्थिती मी निर्माण

सांदण

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी मंगळवार, 01/07/2008 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, साहित्य : १ वाटी तांदूळ ; २ वाट्या बरक्या फणसाचा रस ; गूळ ; वेलची पावडर. कॄति : प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून २ तास वाळवून घ्या.मग त्याचा जाडसर रवा काढून तो चांगला भाजून घ्यावा. पूर्ण पिकलेल्या बरक्या फणसाचे गरे घ्यावे आणि नुसते स्टीलच्या चाळणीवर चांगले घोटून त्याचा रस काढून घ्यावा. साधारणपणे इडली सारखे होईल इतपत फणसाचा रस आणि तांदळाचा रवा यांचे मिश्रण करुन २ तास भिजत ठेवावे. मग त्यात व्यवस्थित गूळ घालून तो गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत रहा.

( जाता दुरदेशी सुख वाटे जीवा -)

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 01/07/2008 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
जाता दुरदेशी सुख वाटे जीवा! डॉलरे भेटता आनंदहोई !!१!! या चलनाची उपमा नाही त्रिभुवनी! करुन चाकरी इतर देशा !!२!! ऐसा परदेश ऐसे देशोदेशी लोक ! ऐसे रहाणीमान दावा कोठें !!३!! ऐसी उठाठेव ऐसा व्यवहार! ऐसा N R I कोणी दावा !!४!! ऐसे सरकार लावी करावर कर आउट्सोअर्सिंग चालू येथे !!५!! पैसा परी खुप केलीस भ्रमंती! देशा परी सुख न मिळे जीवा !!

खुषी न मिळता मिळते रुसणे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 01/07/2008 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-पी.के.मिश्रा) तुझ्या प्रीतित मन माझे का तडपते फुलासम असे तुझा चेहरा हृदय मात्र तुझे पाषाणा सम शोभते कळ्या न मिळता मिळती कांटे खुषी न मिळता मिळते रुसणे तोडूनी सारे संबंध मोडूनी सारी नाती होवून वेडा रमलो मी करूनी तुझ्यावर प्रीति अमृत न मिळता विष मिळे काय मी अपेक्षिले अन काय दैवे योजिले मोकळ्या तुझ्या केशभारी गेलो मी गुरफटूनी मुष्किल झाले जगणे मुष्किल झाले मरणे खुषी न मिळता मिळते रुसणे श्रीकृष्ण सामंत

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 01/07/2008 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष " नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? " " काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? " अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो...

केल्याने रेखाटन

लेखक टारझन यांनी मंगळवार, 01/07/2008 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
लकांन्नो .... ईकडे यकापेक्षा यक ईचारवंत पायले (खरं तर वाचले) लिखान जाम डेंजर नसलं तरी वह्यांची पानं आम्हीही लई खरडली बगा . पन आक्षरांपेक्षा आक्रूत्याच जास्त भावल्या आन आवडत्या बाईंपासनं(तेंव्हा ८वी असेन) ते जाड भिंगाच्या मारकुट्या मास्तरांना खरडंलय. मास्तर मला हाताखालंन काढायचं आन मग म्या त्यांना (कागदाबर बरं का) हाताखालून काढायचो. ते एवढ कार्टून व्हयचं की म्या बसत आसल्याला कोपरा हासून हासून 'यडा' व्हायचा.मंग ते पान आख्या वर्गातंन हास्यलाटा तयार करत शिवटी मास्तरच्याच हातात थांबायचं.. मंग त्यो मला पुन्यांदा हाताखालनं काडायचा...