Skip to main content

राक्षस रसायनाची गोष्ट.

लेखक रामदास यांनी बुधवार, 09/07/2008 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी सुखी गृहस्थ आहे. सरकारी नोकरी.कस्टम्स मध्ये. जेनपीटी (उरण)ला अप्रेजर.मुंबईत राह्यचं. सुटीत पुण्याचं घर. सुंदर बायको.एक मुलगा. त्याचंही शिक्षण पूर्ण होत आलं आहे.पैसा गाठीशी बांधलेला आहे. दहा वर्षं बाकी नोकरीची. नंतर पेन्शन आहे.सगळं काही सेट झालेलं आहे.संध्याकाळी दोन पेग . रविवारी साडेतीन.राक्षस रसायनाची आठवण व्हावी असं काहीच झालं नव्हतं. आता राक्षस रसायनाची गंमत काय आहे ते आधी सांगतो. उरण ला पोस्टींग झालं तेव्हा बोकडविर्‍याजवळ आमचं जुनं घर आहे तिथं फेर्‍या वाढल्या. हे आमचं आजोबांचं घर.साठ सत्तर वर्ष जुनं. मी फारसा या घरी कधी गेलो नव्हतो. आजोबा बरीच वर्षं एकटेच राहत होते.

कंहाभारत आणि सरकार राज

लेखक अनामिक यांनी बुधवार, 09/07/2008 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपाववर नवा आहे आणि थोडाफार लिहायचा प्रयत्न करणार आहे. काही चुका झाल्या तर निदर्शनास आणून देऊन योग्य मार्गदर्शन करावे. काल देवदत्त यांनी लिहिलेला पौराणिक कथांवरील लेख वाचला आणि youtube वर नव्याने सुरू झालेलं महाभारत (की कंहाभारत म्हणावं? ) पाहिलं. या मालिकेच्या दिग्दर्शकानं सरकार राजच्या रामूकडून ट्रेनिंग घेतलेलं दिसतंय. तसेच शिवाजी नागरे हे दररोज नवी लुंगी वापरत असल्याने त्यांच्या वापरलेल्या काळ्या लुंग्यांपासून कंहाभारतातल्या सगळ्याच पात्रांचे कपडे बनवलेत असा माझा ठाम विश्वास आहे. सगळ्यांना काळे कपडे घालायला लावण्यामागे दुसरे काही कारण असू शकते असं मला वाटत नाही.

मसालेदार भेंडी स्मिता चावरे

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 09/07/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
वाढणी: ३-४ जणांना पाककृतीला लागणारा वेळ: ३० मिनिटे पाककृतीचे जिन्नस अर्धा किलो भेंडी, ३ कांदे, १ मोठा टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लसूण पेस्ट १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे पूड, १ चमचा लिंबाचा रस, तिखट-मीठ तळणासाठी तेल क्रमवार मार्गदर्शन: प्रथम भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घ्या. पाव इंच लांबीचे तुकडे करून तेलात तळून घ्या. कांदे, टोमॅटो, मिरची सर्व बारीक चिरून घ्या. थोड्या तेलात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात लसूण, मिरची व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला व धणेपूड घाला.

बिना अंड्याचा केक स्मिता चावरे

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 09/07/2008 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
वाढणी: तुम्ही तुकडे कसे कराल, त्यावर अवलंबून[ मी १२ तुकडे करतो] पाककृतीला लागणारा वेळ: ६० मिनिटे पाककृतीचे जिन्नस अडीच कप मैदा, पाउण कप साखर, २ मोठे चमचे साखरेचा पाक, १ कप पाणी व एक कप दूध १ मोठा चमचा मनुका, ३ चहाचे चमचे[सपाट कापून] बेकिंग पावडर, चिमुटभर मीठ ३ मोठे चमचे लोणी / तूप किन्वा मार्गारीन क्रमवार मार्गदर्शन: नेहेमीप्रमाणे तूप [ लोणी/ मार्गारिन] आणि साखर फेसून एकजीव करावी. त्यात साखरेचा पाक आणि मीठ घालून पुन्हा फेसावे. मग त्यात दूध व पाणी घालावे. मैदा ३ वेळा चाळून घ्यावा.

चॉकलेट ब्रेड पुडींग

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 09/07/2008 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
वाढणी: २-३ जणांसाठी पाककृतीला लागणारा वेळ: ४५ मिनिटे पाककृतीचे जिन्नस ३०० मिली दुध, ४-५ टेबल स्पून साखर, ४ ब्राऊन ब्रेडच्या स्लाईसेस, ३ अंडी, २ टेबल स्पून ड्रिंकिंग चॉकोलेट अथवा कोको, १/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, क्रमवार मार्गदर्शन: ब्रेडचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. अंडी फोडून फेटून घ्यावीत व त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा. दुध गरम करून त्यात साखर घालावी. साखर विरघळली कि त्यात ड्रिंकिंग चॉकोलेट अथवा कोको घालून चांगले ढवळून घ्यावे. गॅस बंद करून त्यात फेटलेली अंडी आणि ब्रेडचे तुकडे घालून नीट ढवळावे.

उपासाचा डोसा मराठीप्रेमी

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 09/07/2008 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
वाढणी: ३-४ जण पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे पाककृतीचे जिन्नस भगर - ३ लहान वाट्या, साबुदाणा - १ लहान वाटी भरून चवीपुरते मीठ चटणीसाठी- ओले खोबरे (१ वाटी खवून), मिरची-१, मूठभर निवडलेली कोथिंबीर १" आले, चवीपुरती साखर, लिंबू, मीठ भाजीसाठी -३ बटाटे उकडून, चमचाभर दाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून तूप/तेल, क्रमवार मार्गदर्शन: रात्री वरई (भगर) व साबुदाणा नीट धुवून वेगवेगळे भिजत टाकावे. दुसरे दिवशी सकाळी ते बारीक वाटून घेवून एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालून ३ तास झाकून ठेवावे.

पुण्यात लव्हर्स पार्क!! मीमराठी

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 09/07/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
कही दिवसंपुर्वी TV वर एक चर्चा पाहिली... नाव होते "पुण्यात लव्हर्स पार्क! - असावी कि नसावी". अनेक लोक प्रतिक्रिया देत होते परंतु ज्या चैनल वर हा कार्यक्रम होता तो चैनल एवढा प्रसिद्ध नाही, त्यामुळे चर्चा एकाच भागात संपली... !! माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे. ( सामाजिक द्रुष्ट्या.. ) आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिले तर थोड्या अधिक सुधारणा आवश्यक असतील.. ! आता खरचं विचार करण्याची वेळ आलेली आहे... कारण तर सुज्ञांना माहितच आहे !! कृपया आपले मत नोंदवा... ह्या लेखांच्या प्रतिक्रियांवर मी रोज नजर ठेवून असेन.. !

पावसाची परी

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 09/07/2008 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
काल मिपा वर पावसाची परी नावाने नवीन सदस्य आले.
Taxonomy upgrade extras