राक्षस रसायनाची गोष्ट.
तसा मी सुखी गृहस्थ आहे. सरकारी नोकरी.कस्टम्स मध्ये. जेनपीटी (उरण)ला अप्रेजर.मुंबईत राह्यचं. सुटीत पुण्याचं घर. सुंदर बायको.एक मुलगा. त्याचंही शिक्षण पूर्ण होत आलं आहे.पैसा गाठीशी बांधलेला आहे. दहा वर्षं बाकी नोकरीची. नंतर पेन्शन आहे.सगळं काही सेट झालेलं आहे.संध्याकाळी दोन पेग . रविवारी साडेतीन.राक्षस रसायनाची आठवण व्हावी असं काहीच झालं नव्हतं.
आता राक्षस रसायनाची गंमत काय आहे ते आधी सांगतो. उरण ला पोस्टींग झालं तेव्हा बोकडविर्याजवळ आमचं जुनं घर आहे तिथं फेर्या वाढल्या. हे आमचं आजोबांचं घर.साठ सत्तर वर्ष जुनं. मी फारसा या घरी कधी गेलो नव्हतो. आजोबा बरीच वर्षं एकटेच राहत होते.
मिसळपाव