Skip to main content

पावले

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 16/07/2008 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
पावले . चालता चालता पावले थांबतात, थकतात, कि कानोसा घेतात.. आपल्याच मनोबलाचा! चालता चालता पावले अडखळतात, मागे फिरतात, कि चाचपतात. . आपल्याच विश्वासाला! चालता चालता पावले शिणतात, वैतागतात, कि विचार करतात.. "ती चालता आहेत, कि चालवली जात आहेत याचा!" चालता चालता पावले चाचपतात, विचार करतात, कि पडताळून पहातात.. "ध्येय आहे म्हणून.. ती चालतात, कि ती चालतात म्हणून.. ध्येय आहे?" चालता चालता पावले थांबतात, अडखळतात, कि विचारी बनतात!!! ==================== आपली स्वाती फडणीस................1995
Taxonomy upgrade extras

कार्यालय

लेखक विनोद इन्गळे यांनी बुधवार, 16/07/2008 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
इथे पहायला मिळतात नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिल नाही कुणाचही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय

"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?"

लेखक शितल यांनी बुधवार, 16/07/2008 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी कोर्टात नोकरीला असताना मला समाजाच्या असा स्तरातील गुन्हेगारी जवळुन पहायला मिळाली ते पाहुन कोणत्या ही सहदय माणसाच्या डोळ्यातुन आश्रु नक्कीच येतील. गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात. पोटाच्या भुके पुढे काही गोष्टी हतबल होतात. मी कोर्टात जजची पी.ए. म्हणुन होते त्यामुळे सतत डायसवर असायचे त्यामुळे गुन्हेगार आणि त्याने केलेला गुन्हा कोणत्या परिस्थित झाला त्याची पार्श्वभुमी जाणुन घेण्याची सधी जवळुन मिळाली. एकदा एका मजुराला एका चोरीच्या गुन्ह्यात समोर आणले.

एक प्रायोगिक कविता

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 16/07/2008 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आम्ही जे अकलेचे दिवे लावले त्याबद्दल रामदासशेठची व्यनि करून माफी मागितली. हल्ली विडंबनांना मिळणारा प्रतिसाद त्यातच भर म्हणून वाढते विडंबनकार, ह्या सगळ्याचा विचार करता आता विडंबनाचे दुकान बंद करून दुसरे काहीतरी सुरू करावे ह्या विचारात असतानाच रामदासशेठचे उत्तर आले
माफी? कशाबद्दल? मला विडंबन फार आवडले/आवडते. आता आणखी एक गंमत करू या. मी शेवटचे कडवे देतोय.
Taxonomy upgrade extras

असावी मुलगी एक तरी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 16/07/2008 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
व्हावी एक तरी मुलगी असे आल्याने प्रत्यंतर मुली शिवाय कसले जीवन अन नसे कसले गत्यंतर करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती की जग फिरावे तिच्या भोंवती जन्माने असेल जरी ती बाई करू नका गैरसमज काही क्षणात ती हंसे अन क्षणात ती रुसे विचारपूस करण्याची करू नका घाई नाही सांगणार ती मनातले काही असे ती गोड अन प्रेमळ अन असे ती हुषार सोज्वळ मन,बुद्धी अन मृदू हृदयाची असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची उमले ती कळी बनून अन फुलते ती फूल बनून बालपणाच्या बहरातून सुगंध दरवळे चोहिकडून विकसूनी होई जणू सुंदरी उमलते ती अपुली कळी होऊनी माता भविष्यातली उघडी रहस्य निसर्गाचे उरी धरूनी त्या देवदुतासी सांगे अपुल्या लोचनातूनी