Skip to main content

'वाघ्या'

लेखक राधा यांनी शुक्रवार, 25/07/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
वाघ्या नावातच कस दमदार व्यक्तिमत्व झळकत ना. अहो .....होताही तो तसाच दमदार, भरभक्कम , निधड्या छातीचा. तो दिसला की कोणाची बिशाद नव्हती त्याच्यासमोरुन चालण्याची. नावाप्रमाणेच अंगावर वघासारखे कातडे, झुबकेदार शेपुट, तिक्ष्ण नजर अन भुंकला तरी वाघाने डरकाळी फोडावी तसा आवाज. हो असाच होता आमचा इमानी कुत्रा 'वाघ्या'. वाघ्या ची आमच्या घरात entry तशी मजेशीरच झाली. माझ्या बाबांना प्राण्याविष्ई खुप प्रेम, खास करुन कुत्रा अन मांजर अगदी उंदीर सुध्दा.

मी शिकले माझ्या वडलांकडून

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 24/07/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
"काही गोष्टी त्यानी मला नकळत शिकवल्या.जसं काम करून आल्यावर धडपडत जिना चढून वर येवून ते त्यांच शेवटचंच येणं कसं झालं, ते पण." ज्यावेळी वृंदा मला बोलता बोलता असं म्हणाली त्यावेळेला मला निश्चीतच वाटलं तिला काहीतरी मेसेज मला द्दयायचा आहे.वृंदा माझ्या एका मित्राची मुलगी.दहा वर्षापुर्वी तिचे वडील निर्वतले.त्यावेळेला मी तिला भेटलो होतो.त्यानंतर पांच वर्षापुर्वी मी तिला तिच्या लग्नात भेटलो.सध्या ती न्युझरिपोर्टरचं काम करते. मला म्हणाली, "काका,तुम्ही तुमची तब्यत चांगली ठेवली आहे.तुम्ही सुरवातीपासून काम करण्य़ाची एक शिस्त ठेवली होती.

बिडी काडी व्यसनमुक्ती

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/07/2008 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
मुलींच्या सिगरेटी ओढण्यावरून / दारू पिण्यावरून चर्चा चालू आहे. पण आत्ताच वाचल्याप्रमाणे बिल गेट्स आणि न्यू यॉर्क शहराचा महापौर मायकेल ब्लूमबर्ग या दोघांनी मिळून $५०० मिलियन्स हे विकसनशील राष्ट्रातील लोकांमधून सिगरेटचे व्यसन जाण्यासाठी गुंतवायचे ठरवले आहे. बिल अँड मिलेंडा गेट्स फाउंडेशन त्यासाठी $१२५ मिलियन्स देत आहेत तर ब्लुमबर्ग (स्वतः माजी स्मोकर)ने $२५० मिलीयन्स आता आणि आधीत $१२५ मिलियन्स देण्याचे जाहीर केले आहे.

मराठी माणसाने काय करावे - फतवा!

लेखक विकेड बनी यांनी गुरुवार, 24/07/2008 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार वाचकहो, संकेतस्थळावर वावरता वावरता आमची अनेक मंडळींशी मैत्री झाली, विचार जुळले. मतांचे आदान प्रदान झाले. यांतून मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी एक समिती स्थापन करण्याचे ठरले. या समितीची काही ठोस उद्दिष्टे असावीत ती इतरांपर्यंत पोहोचावीत असा मनोदय ठेवून हे लिखाण होत आहे. मराठी माणसाला गप्पा-गोष्टी करण्यात जेवढा रस आहे तेवढा रस पेकाट मोडून कामं करण्यात नसावा. नाही हो, म्हणजे असता तर काम-धाम सोडून मंडळी नानाविध विषयांवर जीव तोडून प्रतिसाद न देती.

((माउस))

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 24/07/2008 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा ही एक प्रयत्न माउस हाताळण्याचा अर्थात प्रेरणा श्री.
Taxonomy upgrade extras

श्रावण बिर्याणी

लेखक स्नेहश्री यांनी गुरुवार, 24/07/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझी खास मैत्रिण गेल्यावर्षी Deuthchland(Germany)ला गेली होती श्रावणाच्य सुमारास. पण श्रावणांत कांदा लसुण खात नसल्याने काय स्पेशल करायचे हा प्रश्नच होता आणि म्हणुन एक प्रयोग म्हणुन ह्या " श्रावण बिर्याणी" चा शोध मी लावला. आता श्रावण महिना सुरुन होणार म्हणजे कांदा-लसुण बंद.

मेथीची दाणे लावुन पातळ भाजी (खांदेशी)

लेखक योगिता_ताई यांनी गुरुवार, 24/07/2008 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
कुंदनच्या आग्रहाखातीर.... साहित्य: मेथीची पालेभाजी बारीक चिरलेली - २ वाटी शेंगदाणे - १/२ वाटी हिरवी मिरची - ६ ते ७ (चवीनुसार) लसुण पाकळ्या - ५ ते ६ कोथिंबीर - बारीक चिरुन आवडीनुसार फोडणी साठी - जिरे, मोहरी मीठ चवीनुसार तेल कृती : शेंगदाणे व मिरच्या कढईत थोडे तेल गरम करुन खमंग भाजुन घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, शेंगदाणे , कोथिंबीर, लसुण पाकळ्या, जिरे एकत्र मिक्सरवर बारीक वाटण करुन घ्यावी. कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात वरील वाटलेली चटणी घालुन तेल सुटेपर्य॑त परतावे. त्यात मेथीची बारीक चिरलेली भाजी टाकुन २ मिनीटे चांगले परतावे.

(माउस)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 24/07/2008 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..! झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..! मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला, मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..! कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला. रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..! अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा, कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा

ज्वारीचे नूडल्स

लेखक योगिता_ताई यांनी गुरुवार, 24/07/2008 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
चायनीज पदार्थ आवडणाऱ्या, भाज्या, भाकरी न खाणाऱ्या मुलांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी पौष्टिक पदार्थ करून पाहा. ...... साहित्य - दोन वाट्या ज्वारीचे पीठ, कोबी, गाजर, फ्लॉवर, ढोबळी मिरची प्रत्येकी एक वाटी, स्वीट कॉर्नचे दाणे, मोड आलेले मूग, मटार, भिजवलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे प्रत्येकी अर्धी वाटी, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, रिफाईंड तेल एक डाव, चवीपुरते मीठ, लसूण- आलं पेस्ट दोन चमचे. कृती - आपण भाकरीसाठी जसे पीठ मळतो तसे चवीपुरते मीठ घालून ज्वारीचे पीठ मळावे.