Skip to main content

बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली...

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 27/07/2008 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
बुश:काल होता होता, `लाल'रात्र झाली (आमची प्रेरणा: उषःकाल होता होता काळरात्र झाली !
Taxonomy upgrade extras

गणेशोत्सव

लेखक ऐका दाजीबा यांनी रविवार, 27/07/2008 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना का केली? लोकांनी एकत्र यावे म्हणून. त्यांचा उद्देश साध्य झाला. लोक एकत्र आले. पण त्यांनी एकत्र येऊन काय केलं? गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवस जो तमाशा चालतो, त्याबद्दल हा ऊहापोह. काही मंडळं निदान दहा दिवसांत काही वेळा तरी भजनं लावतात. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र कहर होतो. अक्षरश: दारु पिऊन, "कोई मेरे साथ कोई रात गुजारे..." सारख्या गीतांच्या तालावर हे तथाकथित "गणेशभक्त" नाचत असतात. अरे, दारू पिऊन नाचायचंच आहे तर पब्ज मध्ये जा ना! त्यासाठी गणपतीची अशी विटंबना कशाला? खेदपूर्वक नमूद करावंसं वाटतं की टिळक जर आज हयात असते, तर त्यांनी आज गणेशोत्सव बंद केले असते!!

केळ्याचे धोणास (सांदण)

लेखक धनंजय यांनी रविवार, 27/07/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याच्या अमिताबाय सलत्री यांच्या "रुच्चीक" पुस्तकातून स्फूर्ती घेऊन : (शिवाय त्यात काय फरक करून मिपा ईशान्य यूएस कट्ट्यासाठी ही पाकृ केली, ते सोयिस्कर फरक.) साहित्य : अ.

पहाट

लेखक पंचम यांनी रविवार, 27/07/2008 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा लिहतो मी, तेव्हा लेखणीत उरतो मी, होऊन थेंब शाईचा, कागदावरी पसरतो मी...... जेव्हा पाहतो मी, तेव्हा स्वप्न सांधतो मी, होऊन ईंन्द्र्धनुश्याचे रंग, दाही दिशात सांडतो मी....... जेव्हा बोलतो मी, शब्द चोरतो मी, कधी हास्यांचे तर कधी आसवांचे दान फेकतो मी....... जेव्हा गातो मी, सप्तसुर होतो मी, होऊन भरलेले आभाळ जमिनीवर बरसतो मी....... जेव्हा नाव सांगतो मी, जरासा घाबरतो मी, बिनचेह-याच्या या गर्दीत स्वताची ओळख लपवतो मी.......
Taxonomy upgrade extras

एका पक्ष्याचे प्रकाशचित्र

लेखक लिखाळ यांनी रविवार, 27/07/2008 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! मागच्या नोव्हेंबर मध्ये महाबळेश्वर येथे फिरायला गेलो असता एका तारेवर छान पक्षी दिसला. बर्‍यापैकी लहान होता पण उन्हात असल्याने त्याचा फोटो काढायचा मोह आवरला नाही. कसा वाटला ते सांगा. कॅमेरा निकॉन कूलपिक्स एस ४. १०पट झूमचा. पक्षी फार लांब असल्याने चित्र स्पष्ट असले तरी आकाराने लहान झाले आहे. फोकल लेंग्थ ६३ मी मी ऍपरचर १/४ शटर १/१७० आयएसओ ५० पक्षी थ्रश या प्रकारातील असावा असे वाटते. कोणाला माहित असेल तर कृपया सांगावे. -- (पक्षीमित्र) लिखाळ.

जाने तू... या जाने ना...

लेखक फटू यांनी रविवार, 27/07/2008 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
महिन्याभरापूर्वी "मेरे बाप पहले आप" आप हा हिंदी चित्रपट पाहीला. पाहिला म्हणणे खरं तर धाडसाचे होईल. "झेलला" हाच शब्द योग्य आहे. आणि झेलला तोसुद्धा त्या पोरीसाठी. खुप गोड आहे ती पोरगी. हो पोरगीच नाही तर काय... पाच वर्षांनी लहान आहे ती माझ्यापेक्षा. केवळ तीचं ते निरागस हसू पाहण्यासाठी प्रियदर्शन, परेश रावल आणि अक्षय खन्ना यांचा पांचटपणा खपवून घेतला. (विश्वास नाही बसत हो की याच प्रियदर्शन आणि परेश रावल यांनी सुनिल शेट्टी आणि अक्षय कुमार या मारधाड द्वयींसोबत काम करून "हेराफ़ेरी" सारखा उत्तम विनोदीपट बनवला होता.) असो. मी तुम्हाला सांगत होतो त्या गोड पोरीबद्दल. जेनेलिया डिसोझा तिचं नाव.

बंगळुरु आणि २५ जुलै २००८

लेखक यशोधरा यांनी रविवार, 27/07/2008 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगळुरु सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगळुरुमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही... नेहमीप्रमाणे रस्त्यावरची बरीचशी दुकानं बंदच असतात. इथले दुकानदारही तसे पुण्यातल्या दुकानदारांचे भाऊबंदच!! आरामात साडेनऊ - दहाला आपापली दुकानं उघडणार!! अगदी इस्त्रीवाल्यापासून ते मॉलवाल्यांपर्यंत सगळे जण या परंपरेचं न चुकता पालन करणार...

नाहीतर माणूस कंप्युटरसारखाच असता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 27/07/2008 06:07 या दिवशी प्रकाशित केले.
"अमुक अमुक असा,असा,होता.तसा,तसा होता. पण मात्र तो माणूसही होता"असं काही व्यक्तिना श्रद्धांजली देताना म्हणतात ते उगाच नाही. त्याचं असं झालं,अलीकडे मला जरा थकल्या थकल्या सारखं वाटू लागलं होत.माझ्या डॉक्टरांकडे ही माझी तक्रार मी गेले कित्येक दिवस करीत होतो.ह्यावेळी परत तेच माझं रडगाणं ऐकून डॉक्टर मला म्हणाले आपण तुमचं पुर्ण चेकअप करून घेवूया.पण त्यासाठी मी सांगतो त्या नर्सिंग होम मधे तुम्हाला कमीत कमी एक आठवडा ऑबझरव्हेशन खाली राहवं लागेल.मी मनात म्हणालो ’बापरे!

गुरूपुष्यामृत योग

लेखक धोंडोपंत यांनी शनिवार, 26/07/2008 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, गुरूपुष्यामृत योग दिनांक ३१ जुलै रोजी येत आहे. यालाच गुरू पुष्य अमृतसिद्धीयोग असेही म्हणतात. हा योग सायंकाळी ०७ वाजून २६ मिनिटांपासून ते शुक्रवारी सकाळी ०६ वाजून १९ मिनिटांपर्यंत आहे. आपला, (पंचांगी) धोंडोपंत