Skip to main content

गटारी अमावस्या

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 28/07/2008 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
गटारी अमावस्या - गेले काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबर सारखेच या दिवसा कार्यक्रम आखले जातात. श्रावण महिन्यात मांसाहार साधारण पणे केला जात नाही. पुढील संपुर्ण श्रावण महिना उपवास घडणार असल्याने श्रावण सुरु होण्यापुर्वीच्या अमावस्येदिवशी भरपेट मांसाहार ( पेयपान ) करुन पुढील महिन्याची उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न केला जातो. ( मुंबईत बहुतेक श्रावण सुरु होण्यापुर्वीचा शेवटचा रविवार गटारी म्हणुन साजरा केला जातो. ) यामागचे काय शास्त्र आहे ? काय रुढी आहेत ? हे या चर्चेतुन माहित करुन घ्यायला आवडेल.

मिसळपाव आज पुणे मिरर मधे...

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 28/07/2008 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिसळपाव बद्दल टाईम्स ऑफ इन्डीयाच्या पुणे मिरर या वर्तमानपत्रात बातमी आली आहे. मिसळपावकरांनी बंगलुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाबद्दल जी तात्काळचर्चा केली आणि त्याला बंगलुरूवासी मिपाकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यात माहिती दिलेली आहे. मिसळपावचा एक फोटो (स्नॅपशॉट) देऊन ५ नं पानावर ही बातमी आहे. पुणे मिररचे स्वतंत्र संकेतस्थळ नसल्यामुळे बातमीचा मथळा देत आहे. Potpourri of information Misalpav.com is one the websites which has been pivotal in relaying news from the blast-torn cities of Bangalore and Ahmedabad.

उन्हाळा-१

लेखक दोयल यांनी सोमवार, 28/07/2008 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
होळी पेटली, पुरणपोळी खाऊन दुसरया दिवशी ची धुळवड खेळून झाली कि कपाटा वरचा टेबल फॅन खाली यायचा. रविवारी दुपारी जेवल्यावर त्याच्या आवाजच्या लयीत आपसूकच डोळे मिटायाचे. पांगारा लाल सडा घालायचा अंगणात, त्याच्या मखमली पाकळ्या आणि स्वर्गिय रंग.. आहा, भर दुपारी डोळ्यातून मनात उतरत जायचा.त्याचा मधहि तितकाच अफलातून असला पहिजे, पोपट (काहि काहि वेळा जंगली राखाडी पोपटंचे थवेच्या थवे उतरायचे पांगार्याच्या झाडांवर) बुलबुल, हळद्या, मैना, कोतवाल, धनेश, भारद्वाज, कवड्या असलेच आणि आणखीही अद्भुत पक्षी तिथे जमायाचे.

एक शून्य ......

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 28/07/2008 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
कवड्या तुझी धाव आहे शुन्या कडून शुन्या कडे पंच्याऐंशी वाचनांनंतरही नि:शब्द जालाचे कडे ऐकून होतो मायाजाली दुर्लक्षील्या जातो जो नडे समजती अनुभवांती वेडे सरळास लाभती वाकडे प्रतीसाद आभास मायावी असतील काही सत्यही थोडे का अट्टाहास करशी भूलीचा जाणूनी पाखरू दूर जाया उडे

आगे बढो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 27/07/2008 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
"खरंच,पाटी पुर्ण पुसून टाकल्यास जगात गुन्ह्यापासून झालेली होरपळ,आपण केलेली बदल्याची होरपळ, उघड उघड विसरून जावून जर का "आगे बढो" म्ह्टलं तर किती बरं होईल. " हल्ली त्यामानाने खूपच लोकांचे प्राण जातात.काहींचे अपघातात तर काहींचे मारामारीत,कांही मरतात आतंगवाद्दयाकडून वगैरे. हे शहरात जास्त होत असतं.