Skip to main content

नशीब

लेखक डोमकावळा यांनी सोमवार, 28/07/2008 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ काका, काही काम देता का?" बुटाची लेस बांधता बांधता माझं लक्ष एका आवाजाकडे गेलं. आठ दहा वर्षाचा एक मुलगा त्या चप्पल स्टँडच्या मालकाकडे पहात होता. जेजूरी गडावर आलेल्या भक्तांच्या गर्दी कल्लोळात माझी नजर या छोट्या मुलाकडे गेली. अंगात मळालेले कपडे, पायात तुटकी स्लीपर अन् भावनाशुन्य नजर. नक्कीच तो रुपया-दोन रुपयांसाठी हात पसरणा-या मुलांमधला नव्हता. "स्मथिंग इज राँग...टेरिबली राँग..." माझं मन मला सांगत होतं. कारण ज्या वयात खेळायचं, मित्रांबरोबर मनसोक्त बागडायचं त्या वयात तो काम मागत होता. "नाव काय रे तुझं?" त्या चप्पल स्टँडच्या मालकाने त्याला विचारले.

मिपा विरह - एक चिडचिड....अर्थातच 'आपल्या ह्या हव्याहव्याशा मिसळपाव विड्रॉवल सिंड्रोम चे काय करायचे?' :)

लेखक मनिष यांनी सोमवार, 28/07/2008 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
वि.सू. :- शीर्षक वाचून घाबरू नका...गंभीर काहीच नाही खाली! वाचून बघा....:) गेल्या आठवड्यात कामामुळे आणि करामुळे -- दोन्ही कर, आपले हात; सदा-सर्वकाळ गुंतले होते, त्यामुळे इथे येणे जमलेच नाही...नाही म्हणायला तल्ल्फ फार व्हायची पण सी.ए.

मुंबईत धुवाधार पाऊस..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 28/07/2008 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत सकाळपासून जोरदार वार्‍यांसह धुवाधार पाऊस! बोरिवली, दहिसर विभाग, पाण्याने भरला. त्या भागातील बरीचशी घरे पाण्याने भरलेली आहेत. जवळजवळ ४ ये ५ फूट पाणी घरात शिरलेलं आहे. मालाड आणि अंधेरी परिसरातदेखील पुष्कळ पाणी साचलं आहे. जोरदार वार्‍यासह सतत पाऊस सुरू आहे! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत. मुंबईकर मिपाकरहो, काळजी घ्या! आपला, (२६ जुलै २००५ ची मुंबई पाहिलेला मिपाकर) तात्या.

भूलेश्वर -२

लेखक डोमकावळा यांनी सोमवार, 28/07/2008 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
ध्रुव यांचा भुलेश्वर हा लेख वाचून त्याबाबत आणखी थोडी माहिती द्यावीशी वाटते. मंदिराची जागा ही अतिशय शांत व निवांत असून मंदिरात प्रवेश हा काहीसा वेगळ्या पद्धतीचा आहे. मंदिराच्या मुख्य दाराच्या समोर एक प्रचंड आकाराची पितळी (किंवा मिश्रधातूची) भग्न झालेली घंटा आहे. मुख्य दारातून आत शिरता लगेच एक अंधारी खोली असून तिच्या उजव्या बाजूला एक दगडी जिना आहे जो मंदिरात जातो.

विडंबन - विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 28/07/2008 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
खासदार फोडू, सरकार पाडू. काढीत जाऊ आज "व्हिप" साजणी..! असंतुष्ट गाठू,पैशास वाटू कोटीत होई सारे ठीक साजणा..! नको काळजी तू कर खुशाल बंड, इलेक्शन विना रे दुजा काय छंद तुला देतो साथी ,मी हवी ती खाती, आत्म्यास तूही थोडे वीक साजणी..! संसदेत चाले अरे हा तमाशा. डाव्या उजव्यांची कशी एक भाषा प्रतिष्ठाच सारी धुळीला मिळाली. कसे गद्दारांचे आले "पीक"साजणा..! विश्वास निष्ठा लिलावात सारे. इथे नीतीमत्ता कुठे शोधता रे ! तू का मनाशी ,लाज वाटून घेशी ? अशी लोकशाहीची आहे "रीत" साजणी..! -- अभिजीत दाते मूळ गीत - धुंदीत राहू मस्तीत गाऊ चित्रपट - बाळा गाऊ कशी अंगाई

हे फक्त भारतीय चित्रपटातच घडू शकत.

लेखक नि३ यांनी सोमवार, 28/07/2008 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
बाघबानः अमीताभ आणी हेमा हे होळी नंतर (आठवा होली खेले रघुवीरा...गाण) सहा महिन्या करीता एकमेंकापासुन वेगळे होतात (म्हणजेच मार्च पासुन सप्टेंबर) आणी त्या सहा महीण्याच्या कालावधीत ते वेलेंटाईन डे साजरा करतात जो १४ फेब्रुवारी ला असतो ,करवा चौथ पण (जे साधारणता ऑक्टोंबर मधे असते). आता काही माझ्या क्रिकेट प्रेंमीसाठी ... लगानः ते म्हणतात की ही कहाणी १९व्या शतकातील आहे (भारत ईंग्रंजाच्या पारतंत्र्यात असतांना). त्या वेळेस क्रिकेट मधील एक षटक हे ८ चेंडु च असायच परंतु पिक्चर मधे ते ६ चेंडुच दाखवलय.

कुळथाचे(हुलग्याचे)पिठले

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 28/07/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
शेखरच्या मागणीवरून ही पाकृ लिहिते आहे. कुळीथ पीठ १/२ वाटी,३ ते ४ हिरव्या मिरच्या,६ते ७ लसूण पाकळ्या,एखादे आमसुल,ओले/सुके खोबरे,कोथिंबिर,तेल,फोडणीचे साहित्य कुळथाच्या पीठात ३ ते ४ वाट्या पाणी घालून कालवून घ्यावे,त्यात मीठ घालावे. तेलाची खमंग फोडणी करावी.त्यात लसूण पाकळ्या,मिरच्या,आमसूल घालावे.व हे कुळथाचे पीठ घालावे.खोबरे व कोथिंबिर घालावे.खळखळून उकळू द्यावे,चांगले शिजू द्यावे.

छायाचित्र परिक्षण - ३ :)

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 28/07/2008 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मिपाचे एक सन्माननीय सभासद सूर्य यांनी मिपावर 'छायाचित्र परिक्षण' हे एक सुंदर सदर सुरू केले आहे. याचे पहिले दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत. त्यात मिपावरील काही तज्ञ छायाचित्रकारांनी संबंधित छायाचित्राबद्दल आपापले विवेचनही दिले आहे. आज आम्ही सूर्यदेवांच्या परवानगीविना (ते परवानगी नाकारणार नाहीत याची खात्री आहे म्हणून!) हा तिसरा भाग प्रकाशित करत आहोत. मिपावरील छायाचित्र तज्ञांनी व रसिकांनी खालील छायाचित्राचे परिक्षण करावे.

नरकयातना

लेखक मनस्वी यांनी सोमवार, 28/07/2008 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
देवगाव (ता. नगर) येथील या चिमुरडीच्या नशिबात पुन्हा आशेचे किरण खुलू शकतात; परंतु सुमारे एक लाख रुपयांच्या शस्त्रक्रियेनंतर. आर्थिक मदत मिळाली तरच या शस्त्रक्रिया होऊ शकतात. पैशांची जमवाजमव झाल्यानंतर पुण्यातील 'रुबी हॉल' मध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तेथे डॉक्‍टरांनी दोन अवघड शस्त्रक्रिया करण्यास सांगितल्या. शस्त्रक्रिया झाल्या नाहीत, तर जिवाला धोका होऊ शकतो.

किती सत्य आहे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 28/07/2008 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं मन मला म्हणालं,आजच्या आज पेक्षा उद्दाचा उद्दा नक्कीच ग्रेट असणार.ज्या जगात माझी पिढी वाढणार आहे ते जग नक्कीच जास्त चांगलं असणार,वाईट नक्कीच नसणार." त्यादिवशी तळ्यावर मी प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो.नेहमीच्या वेळेवर प्रोफेसर काही आले नाहीत त्यावेळी मी समजलो की आता जास्त वेळ त्यांची वाट बघण्यात अर्थ नाही.म्हणून मी उठतो उठतो तोच त्यांचा नातु माझ्या मागे उभा असलेला दिसला.