Skip to main content

तुझ्या गळा, माझ्या गळा..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 29/07/2008 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या गळा, माझ्या गळा, सीबीआय चौकशीच्या माळा. दाद मागायची कोणाला ? चला रे आता कोर्टात चला. तुज "पोटा", मज "मोक्का". आणखी "टाडा" कोणाला? लाज वाटते का तुम्हाला ? मला कुणाची, देशाला.
Taxonomy upgrade extras

सोड्याची खिचडी

लेखक पद्मश्री चित्रे यांनी मंगळवार, 29/07/2008 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण येण्यापुर्वी एक खास सी के पी पाककृती. साहित्य- ४ वाट्या तांदुळ, १ वाटी सोडे, २ चमचे हळद, ४ चमचे तिखट, मीठ, तेल, हींग, लिम्बु/ चिन्चेचा कोळ, २ बारीक चिरलेले कांदे,गरम मसाला, आले-लसुन पेस्ट ,लवंग्,दालचीनी, गरम पाणी, कोथिंबीर्,खवलेले खोबरे कृती- करण्यापुर्वी १/२ तास तान्दुळ धुवुन ठेवावेत व सोडे भिजत घालावेत. सोड्यांचे जरा छोटे तुकडे करुन घ्यावेत. त्यांना हळद, तिखट, मीठ, आले-लसुण पेस्ट, गरम मसाला ,मीठ लावुन लिंबु पिळुन वा चिन्चेचा कोळ घालुन १० मिनीटे ठेवावे. एका तव्यात तेल तापवुन त्यात हिन्ग व थोडा कांदा परतुन घ्यावा.

जी.एम.आर.टी. ला सहल- कोणकोण येणार

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 29/07/2008 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
जी.एम.आर.टी. ला सहल काढायचा बेत ठरतो आहे. जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप : http://www.misalpav.com/node/2738 जी.एम.आर.टी. ला अभ्याससहल: http://www.misalpav.com/node/2738#comment-38198 मी आत्ताच माझ्या एका बॉसशी बोलले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आपण जर आपला एक ग्रुप घेऊन गेलो तर चालेल. आपल्याला फक्त वाहतूक आणि जेवण यांची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा पुण्या-मुंबईच्या मिपाकरांना जर रस असेल तर आपण काहीतरी प्लॅन करू शकतो. माहितीजालावर लिहिलं आहे की फक्त शुक्रवारीच तिथे जाता येईल.

तवसाळं

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 29/07/2008 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
धनंजयाचे केळ्याचे सांदण वाचून आणि (कट्ट्यातला फोटो)पाहून मला सांदणाच्या बहिणीची आठवण झाली.मी आमच्या त्सेंटा आजीला गुर्कन कुकन अर्थात काकडीचा केक ह्या नावाने तवसाळं खिलवले आहे.(तवस- काकडी) साहित्य- जाड रवा १/४ किलो, एका नारळाच्या वाटीतले खोबरे, १/४ किलो गूळ, १ वाटी भाजलेल्या दाण्यांचे तुकडे, १/२ वाटी काजू/ बदाम तुकडे,वेलदोडा पूड, १/४ चमचा सोडा किवा १/२ चमचा बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ. १ मोठी काकडी. खिरे नव्हेत.

'वाढदिवसाच्या शुभेच्छा '

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 29/07/2008 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपले सर्वांचे आदरणीय जेष्ठ सभासद श्री. धोंडोपंत यांना त्यांच्या जन्मदिवसा बद्दल मनापासुन शुभेच्छा ( संदर्भ : त्यांचा स्वतःचा ब्लॉग ) यापुढील त्यांचे जीवन, सुखा-समाधानात, आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. (शुभेच्छुक ) अमोल केळकर

" त्या अनोळख्याने माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 29/07/2008 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं,मी माझे डोळे उघडे ठेवून सर्वांकडे पाहत असावं.आणि त्यांच्या बुध्दितून शिकावं.मला वाटतं,आपले जवळचे आपण गमावले तरच आपलं सर्वस्व आपण गमावतो. मला वाटतं, त्या अनोळख्याने मला त्या झालेल्या बोलण्यातून माझं उरलेलं जीवन बदलून टाकलं."असे उद्गार काढण्याची माझ्या एका मित्रावर पाळी आली.ती त्याची कथा सांगताना, मला म्हणाला, " मनुष्याच्या आत्म्यावर माझा विश्वास आहे आणि इतरांबरोबर दुवा ठेवण्याच्या आत्म्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे.

हुंगायचे इन्सुलिन

लेखक संजय अभ्यंकर यांनी सोमवार, 28/07/2008 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
डांबिसराव व मि.पा. वरिल मान्यवर वैद्य मंडळींस काहि प्रश्नः १. काही काळापुर्वी फयझरने हुंगायचे इन्सुलिन अमेरिकी बाजारात आणले होते. ते कितपत यशस्वी झाले? २. त्याचे काही अन्य परिणाम रुग्णांवर आढळले का? ३. हे औषध खर्चाच्या दृष्टिकोनातुन भारतीयांच्या ख्शाला परवडेल का? ४. आर्थर हेलीने त्याच्या स्ट्राँग मेडीसिन ह्या कादंबरीत भाकितपर लिहिले होते कि भविष्यकाळ हुंगायच्या औषधांचा असेल. हे भाकित कितपत खरे ठरले आहे?

नशीब

लेखक डोमकावळा यांनी सोमवार, 28/07/2008 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ काका, काही काम देता का?" बुटाची लेस बांधता बांधता माझं लक्ष एका आवाजाकडे गेलं. आठ दहा वर्षाचा एक मुलगा त्या चप्पल स्टँडच्या मालकाकडे पहात होता. जेजूरी गडावर आलेल्या भक्तांच्या गर्दी कल्लोळात माझी नजर या छोट्या मुलाकडे गेली. अंगात मळालेले कपडे, पायात तुटकी स्लीपर अन् भावनाशुन्य नजर. नक्कीच तो रुपया-दोन रुपयांसाठी हात पसरणा-या मुलांमधला नव्हता. "स्मथिंग इज राँग...टेरिबली राँग..." माझं मन मला सांगत होतं. कारण ज्या वयात खेळायचं, मित्रांबरोबर मनसोक्त बागडायचं त्या वयात तो काम मागत होता. "नाव काय रे तुझं?" त्या चप्पल स्टँडच्या मालकाने त्याला विचारले.