Skip to main content

तो होता तरी कोण? (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 08/03/2021 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या दोघांची भेट घडणे हा निव्वळ योगायोग असेल, असे मी अजिबात म्हणणार नाही. तो योगायोग असूच शकत नाही. योगायोगाने जुळून येणाऱ्या गोष्टी, एवढ्या समर्पक असूच शकत नाहीत. बहुतेक एखाद्या अदृश्य शक्तीनेच आम्हाला एकमेकांशी भेटवले असणार. पण एक गोष्ट कबुल करेन मी, या आमच्या भेटीचे सर्व श्रेय त्यालाच जाते. तोच माझ्याकडे आला होता. अगदी अनाहूतपणे.               तो मला भेटला! बोलला! तेव्हा मला जाणवले की, त्याचे मला भेटणे किती जरुरीचे होते. त्याची भेट मी आयुष्यभरात कधी विसरेन, कधी तो विस्मरणात जाईल असे होणारच नाही.

ती

लेखक आर्णव यांनी रविवार, 07/03/2021 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
हिरवी गर्द वनराई, भोवताली पर्वत रांगा ते भिरभिरणारे पक्षी, ती संथ प्रवाही गंगा डोळे भरून पाहताना, ते स्मरणी साठवताना मज ती अचानक दिसली, विवस्त्र स्नान करताना भोळी आदिवासी अबला, स्वच्छंद तिच्या जल क्रिडा ना भोवतालची जाण, संकोच, भीती ना पीडा सौंदर्य मिसळले होते, सृष्टी ने तिच्या यौवनात कोलाहल होता उठला, माझ्या अस्थिर मनात क्षण मोहाचा सामोरी, क्षण नाजूक परी अघोरी क्षण लपवणे ही चोरी, क्षणात पाटी कोरी क्षणभर गढूळ झालो मी, ती क्षणाचीच कसोटी क्षणी भानावर ज्या आलो,तो क्षण किमती कोटी कोटी त्या दिवशी पर्वत, वारा, व्योम, सूर्य अन पाणी हे सर्व तिला पाहून, विरक्त राहीले होते मग मी ही विलीन झाल

मातीतली माणसं

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 06/03/2021 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
मला वाटते सोशल मीडिया म्हणजे समुद्र , खुप काही चांगल्या वाईट गोष्टींचा खजिना,आणी बरेच काही.आसेच एक दिवस कोणीतरी मारवाडी मीत्राने मारवाडी समाजाचे सुंदर विवेचन शेअर केले. मला नाही माहीत की तो मारवाडला कधी गेला होता का नाही पण मी त्या भागात खुप फिरलो आहे. जोधपुर मधे बराच काळ होतो. त्यावेळची परिस्थिती आणी आताचे जोधपूर फारच अंतर आहे. नोकरी बरोबरच संध्याकाळी काँलेजात शिक्षण घेत असल्या मुळे बरेच मारवाडी मीत्र, मैत्रीणी. लग्न समारंभ, सणवार किवा असाच पारीवारीक संबध आला व त्यातुनच काही गोष्टी लक्षात आल्या. नोकरी मुळे सिकर, बारमेर, पोखरण, रामदेवरा, लूणी, मारवाड या भागात पण भरपूर फिरणे झाले.

शिक्षणाचे मानसशास्त्र: गोष्ट सांगत गणित शिकवा ... 3

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 06/03/2021 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
घाबरलेली मुलं एकमेकांना बिलंगुनच उभी होती. आजूबाजूला बघून कानोसा घेत होती. भिंतीवरची अक्षरं दिसत होती पण कोणी वाचत नव्हते... ************************* गोष्टीचा आधीचा भाग ... इथे टिचकी मारा ************************* हळू हळू मुलं रिलॅक्स होऊ लागली आणि आजूबाजूला बघू लागली. भिंतीवरच्या अक्षरांचा शिवाय कुठेही काहीच नव्हतं. नेहा सॅमीला म्हणाली - चिंट्याला पिन कोड SMS कर, सारखा ट्राय करू नको सांग - तो भलताच काहीतरी ट्राय करेल आणि आपण इथे लॉक होऊ विनाकारण ... "मी इथेच आहे" हळूच चिंट्या म्हणाला ... चिंट्या!

डेस्टिनेशन ∞

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 06/03/2021 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
अनंताच्या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे चांदणचुर्‍याचे भूकलाडू हिमनगांचे तहानलाडू (तहानभूक हरपू दे पण) रसद टकाटक तयार आहे प्रकाशवर्षी मोजपट्टी डार्कमॅटरचा भव्य फळा धूमकेतूचा खडूतुकडा होल्डाॅलमध्ये भरला आहे दिशा कोन ढळून जातील घड्याळ काटे उलटे फिरतील उद्याच्या बातम्या काल कळतील याची तयारी ठेवली आहे मुक्कामाला पोचलो तर दृृृष्ट तिथे काढतील माझी त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप काजळडब्बी घेतली आहे आता फक्त यान कुठचे इंधन साठवायला कॅन कुठचे उकडले तर फॅन कुठचे ह्या प्रश्नांशी लढतो आहे अनंताच्या यात्रेसाठी फक्त निघायचं बाकी आहे

लॅपटॉप साध्या कामासाठी - Laptop for Basic Work

लेखक हेमंत सुरेश वाघे यांनी शनिवार, 06/03/2021 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
लॅपटॉप घेताना अनेक जण गोधळतातयात अनेकांना फार साधी कामे करायची असतात. आणि तरीही गरज नसतील तर उद्या लागेल म्हणून प्रचंड ताकदीचा लॅपटॉप घेतला जातो - वस्तूत: हि ताकद कधीही वापरली जात नाही - किंवा फार क्वचित वापरली जाते . अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो .आज लॅपटॉप अतिशय मागणी आल्याने आणि चीन मधून पुरवठा बराच कमी झाल्याने लॅपटॉप च्या किमती - नवीन आणि जुन्या फार वाढल्या आहेत .

भूक

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 05/03/2021 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
 भूक  सुप्रियाची सुनंदा आत्या नाशिकमध्ये एकटीच राहात होती. सुनंदा आत्याने नुकताच एक लहासा तिच्यापुरता असा फ्लॅट घेतला होता एका नवीन होणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये आणि या वयात देखील अगदी हौसेने सजवला होता. सुप्रियला तिच्या सुनंदा आत्याचं खूप कौतुक वाटायचं. एकटी राहात होती तरी एकदम खुश असायची. या वयात देखील तिने whatsapp, facebook कसं वापरायचं ते शिकून घेतलं होतं आणि ती ते अगदी सफाईदारपणे वापरत देखील होती. सुप्रिया देखील तिच्या आत्याची अत्यंत लाडकी भाची होती. भावाला उशिरा का होईना पण गोंडस बाळ झालं याचा आत्याला खूप आनंद होता. त्यात सुप्रिया अत्यंत गोड आणि साधी सरळ मुलगी होती.

दगड

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 05/03/2021 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
शिल्पकार आणी शिल्पकला प्राचीन भारतात कीती प्रगत होती याचे पुरावे जागोजागी अढळतात. माझा काही अनुभव शेअर करतो. जबलपुर भेडाघाट लाईमस्टोन, जयपुर मकराणा मार्बल स्टोन ताजमहाल आणी अलीकडची बिर्ला मंदिर , जैन मंदिरे मध्यप्रदेश खजुराहो मंदिरे , सँण्ड स्टोन, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू कृष्णशिळा ब्लँकस्टोन, तिरुपती बालाजी ग्रानाईट आसे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांमधून आपल्या पूर्वजांनी अद्भुत शिल्प निर्माण केली आहेत. पुण्यात बदली झाल्यावर विचार केला दक्षिण भारतात प्रवासाला जाऊया. मदुराई, कोडाईकँनाल, रामेश्वरम- कन्याकुमारी आणी त्रिवेंद्रम आसा दहा दिवसाचा प्रोग्राम.