Skip to main content

(सारक)

लेखक केसुरंगा यांनी शनिवार, 02/08/2008 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे ह्यांच्या 'स्मारक' कवितेने जरा 'सारक' भावना निर्माण झाल्या त्या अशा! कळले मला, अंधार होता जरी तळहात होता, ओठ होते त्यावरी निजली मुले , विझले खोलीतले दिवे मरु देत पोथ्या आणि चर्पटपंजरी वाटे प्रवाशांना किती कृतकृत्यसे दिसतात जेव्हा 'मोर' हे रस्त्यावरी विसरु शिरस्ता ग्लास भरतू सत्वरी करुया गटारी मद्य घेऊन साजरी पळणे नको, आसने नको अन् जोरही त्रिफळा परी सारक असावे हे घरी - केसुरंगा
Taxonomy upgrade extras

दहशत वाद्यान्चे उपकार (?)

लेखक मानव यांनी शनिवार, 02/08/2008 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादि निर निरळ्या मार्गाने जिवित हानि करतात,कधि हे कधि ते ! पण हे उपकारकच वाटावे अशि परिस्थिति आहे ! आजुबाजुला पाहिल कि हे जानवते सन्जय दत्तला पाहन्यासाठि ५००० गर्दि जमते,फाल्तु नाच गान्यान्च्या कार्यक्रमाला लाखाने एसएमएस जातात्,पानि मिळत नाहि पन गल्लो गल्लि वाइन शोप उघडलि जात आहेत्,सरकार वाचवल्याबद्दल पन्तप्रधान गुन्डाना नमस्कार घालतात्,आम्च्या सारखे पुने मुम्बैकर हा एव्ढाच भारत आहे अस समजतात !

ग्रहण

लेखक पार्टनर यांनी शुक्रवार, 01/08/2008 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रहणात का खाऊ नये याची शास्त्रीय माहिती कुठे मिळेल ? मुळात त्याला तसा शास्त्रीय आधार आहे का ? आज एकाने मला ग्रहण आणि आपल्या रूढींबद्द्ल विचारलं.. मी जमेल तसं पाळतोय , माझा विश्वास आहे पण माझ्याकडे ठोस असं उत्तरच नाहिये. काही वर्षांपूर्वी मी एका धार्मिक पुस्तकात वाचलेलं पण आत्ता माझ्याकडे ते पुस्तकही नाही आणि मला तशी माहिती जालावर मिळतही नाहिये. याबद्द्ल अधिक माहिती कोणी देऊ शकेल का ? ( link वगैरे असेल तर जरूर द्या.). आणि हो, तुम्हाला काय वाटतं ? नावाउलट वागणारा - पार्टनर

ऒलिम्पिक आणि भारत : अपेक्षा क्षमता आणि तारतम्य...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 01/08/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
ऒलिंपिक जवळ आलं की वर्तमानपत्रांतून आणि टी व्ही वरून एक विचित्र प्रकारचं मार्केटिंग सुरू होतं, अपेक्षा वाढवणारं बाजारीकरण..आपल्या संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देणं, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं मी समजू शकतो, पण पदकांची अपेक्षा / पदकांची अपेक्षा असं किती म्हणत राहणार ?

सहजीवन

लेखक शितल यांनी शुक्रवार, 01/08/2008 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
सहजीवनाच्या मैदानात तुझ्यासाठी हरूनही तुला, मला जिंकता आले नाही. डाव तुझ्या हाती दिला तरी, तुला खेळता आला नाही. रडुन जिंकता येत नाही आणि चिडुन डाव उधळायचा नसतो, कधी समजणार हे तुला , प्रेमाने कोणालाही जिंकंता येते. सहजीवनाच्या प्रवासात तुझ्यासाठी राजमार्ग सोडुन पाऊल वाट स्विकारली होती अरूंद, अवघड, वळणे पाऊलवाटेची जरी गंमत त्यातली तुला कधी कळ्लीच नाही. कधी कळणार हे तुला , सोबत असली प्रेमाची की प्रवास हा जाणवतही नाही.
Taxonomy upgrade extras

सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण (नासाचे संस्थळ)

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 01/08/2008 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! आज सूर्यग्रहण आहे हे आपणाला माहितच आहे. नासाच्या या संकेतस्थळावर (http://www.nasa.gov/multimedia/nasatv) चीन मधून दिसणारे ग्रहण थेट दाखवत आहेत. या स्थळाची माहिती मला आताच समजली. नासाचे हे स्थळ जागातल्या अश्या काही घडामोडी नेहमीच थेट दाखवते असे दिसते आहे. म्हणजे पुढील वेळेस सुद्धा या स्थळाकडे लक्ष ठेवल्यास काही चांगले बघायला, ऐकायला मिळेल. या स्थळावर अजून काही स्वारस्यपूर्ण सापडल्यास कृपया प्रतिसादात लिहावे.

ब्रेडची भजी

लेखक शिप्रा यांनी शुक्रवार, 01/08/2008 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेडचे स्लाईस त्रिकोणी, डाळिचे पीथ, थोडी तांदुळाची पिटी, तिखट, चवीप्रमाणे मीट, जिरे पावडर, हिंग, हळ्द ,ओवा आणि वाट्ल्यास थोडा इनो कुरकुरित होयला. किंवा गरम तेल थोडेसे अगदि.., पाणी डाळीच्या पिटात वरि ल सर्व घालुन कालवा.. खुप पातळ नको ..ब्रेडचे स्लाईस त्यात बुडवुन खमंग तळा.. आणी मस्त खिडकितुन पाऊस बघत सॉस बरोबर हापसा...

कोकोच्या वड्या

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 01/08/2008 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- १०० ग्राम मिल्क पावडर, १/२ वाटी कोको पावडर, १/२ वाटी लोणी, सव्वा वाटी साखर, बदाम तुकडे (ऐच्छिक) कृती - मिल्क पावडर+कोकोपावडर एकत्र करून चाळून घेणे‌. साखरेचा पक्का गोळीबंद पाक करणे. लोणी पाकात घालणे. गॅस मंद करून हलवणे. आता गॅस बंद करून भांडे खाली घेऊन त्यात कोको पावडर+मिल्क पावडर घालणे व गुठळी होऊ न देता ढवळणे.हवे असल्यास बदामाचे तुकडे घालणे.एका ताटाला तूप लावून घेणे.मिश्रण घट्ट झाल्यावर वड्या थापणे.

पकाऊ जोक्स ... (लोकग्रहास्तव नवा धागा)

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 01/08/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक्स ... प्राजू तैंनी सुरू केलेला धागा अंमळ तुंबलाय आणि त्यामुळे विनोबा आपले डोक्यावरचे केस ऊपटून राहिलेत .. त्यांच्या साठी .. नविन धागा सुरू करत आहे होओओओओओओओओओ तर ज्याला कोणाला आपले पाचकळ , पुचाट , फालतू , भंगार, केस ऊपटायला लावणारे विनोद खरडायचे असतिल तर फळा मोकळा आहे ... हाही फळा तुंबेल अशी आशा करतो .. केस ऊपटायला लावणारा एक विनोद (खन्ना नाही .. मेहरा .... तोपण केस ऊपटायला लावत असे) माझ्या कडुन .... राजे शिकारीला चाललेत ..