मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहजीवन

शितल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सहजीवनाच्या मैदानात तुझ्यासाठी हरूनही तुला, मला जिंकता आले नाही. डाव तुझ्या हाती दिला तरी, तुला खेळता आला नाही. रडुन जिंकता येत नाही आणि चिडुन डाव उधळायचा नसतो, कधी समजणार हे तुला , प्रेमाने कोणालाही जिंकंता येते. सहजीवनाच्या प्रवासात तुझ्यासाठी राजमार्ग सोडुन पाऊल वाट स्विकारली होती अरूंद, अवघड, वळणे पाऊलवाटेची जरी गंमत त्यातली तुला कधी कळ्लीच नाही. कधी कळणार हे तुला , सोबत असली प्रेमाची की प्रवास हा जाणवतही नाही. सहजीवनाच्या जीवनात तुझ्यासाठी विणले होते छोटेसे घरटे,समजून माझी तुला, पाहिली होती अनेक स्वप्ने स्वप्नात रंगणे तुला कधी जमलेच नाही कधी कळणार तुला, स्वप्नेही कधी कधी साकार होतात, स्वप्नील नजर मात्र हवी.

वाचने 4293 वाचनखूण प्रतिक्रिया 11

मनस्वी Fri, 08/01/2008 - 17:38
डाव तुझ्या हाती दिला तरी, तुला खेळता आला नाही.
छान लिहिलएस शितल. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मदनबाण Fri, 08/01/2008 - 17:42
ताई मस्त लिहले आहेस.. सहजीवनाच्या प्रवासात तुझ्यासाठी राजमार्ग सोडुन पाऊल वाट स्विकारली होती अरूंद, अवघड, वळणे पाऊलवाटेची जरी गंमत त्यातली तुला कधी कळ्लीच नाही. हे फार आवडल.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

प्राजु Fri, 08/01/2008 - 19:57
छान कविता. तुझ्या या मुक्तछंदाने, कधी ही नाही कधीच नाही... प्रीत तुला ही कळली नाही.. हे गाणे आठवले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे Fri, 08/01/2008 - 20:00
विचारांचा ओघ छान लिहिला आहेस ग >> विणले होते छोटेसे घरटे,समजून माझी तुला, पाहिली होती अनेक स्वप्ने >> स्वप्नात रंगणे तुला कधी जमलेच नाही हे तर खास -------------------------- www.atakmatak.blogspot.com

इनोबा म्हणे Sat, 08/02/2008 - 00:56
मुक्तछंदातली कविता आवडली. अजून येऊ दे असेच मुक्तक !!! हेच म्हणतो शितल छान कविता करते आहेस, अजुन अशाच सुंदर कवितांची अपेक्षा करतो. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर Sat, 08/02/2008 - 13:26
रडुन जिंकता येत नाही आणि चिडुन डाव उधळायचा नसतो, कधी समजणार हे तुला , प्रेमाने कोणालाही जिंकंता येते. वा! क्या बात है! शितल छान लिहिलं आहेस हो... आपला, (एकटा जीव सदाशिव) तात्या.

आनंदयात्री Sun, 08/03/2008 - 16:05
>>स्वप्नात रंगणे तुला कधी जमलेच नाही >>कधी कळणार तुला, स्वप्नेही कधी कधी साकार होतात, स्वप्नील नजर मात्र हवी. सही लिहलं आहेस शितल !