लेखकभाग्यश्रीयांनी गुरुवार, 07/08/2008 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी हे चित्र काढलं.. पहीलाच प्रयत्नात हे असं आलं.. अजुन एकदा दोनदा मी नक्कीच हे काढणार आहे.. कारण खूप सुधारणा लागतील अजुन..पण माझ्या मते, नऊवारी साडी,चेहर्यावरचे किंचीत दुख्खी एक्सप्रेशन्स बर्यापैकी जमलेत.. चारकोल वापरणं अजुन नीट जमत नाही. तुमची काय सजेशन्स?
लेखकसंदीप चित्रेयांनी गुरुवार, 07/08/2008 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारणातील घडामोडींकडे लक्ष ठेवणार्यांसाठी एक हलकाफुलका विरंगुळा !
----------------------------------------------------------
त्याला जरा रागवा ना बाई
तो काही माझे ऐकत नाही…
घर बदलले दार बदलले
मी सारे आधार बदलले
तो काही माझे पाहत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … १
आषाढ गेले श्रावण आले
महिने काय सालही गेले
तो काही पाऊस पाडत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … २
दबाव टाकले गार्हाणे नेले
विमानही ते ओळखीचं झाले
तो म्हणे की डाळ शिजत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … ३
लोक जमवले पार जागवले
पत्रकार तर नेहमीचे झाले
तो म्हणे की बार उडत नाही
त्याला जरा रागवा ना बाई … ४
---------------------------------------
लेखकविष्णुयांनी गुरुवार, 07/08/2008 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात.
लेखकचिन्या१९८५यांनी बुधवार, 06/08/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला.काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते.यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पध्दतीने अवलोकन केले आहे यातुन परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसुन येते.
लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी बुधवार, 06/08/2008 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
"हे सर्व ऐकून झाल्यावर माझ्या मनात आलं की हिनें आपल्या उद्देशाला किती वाहून घेतलं आहे.नवल नाही की ती मला म्हणाली "मला माझा जॉब आवडतो म्हणून."
आमच्या बिल्डिंगच्या अगदी वरच्या माळ्यावर एक चतर्जी म्हणून बंगाली कुटुंब राहत होतं.राहत होतं म्हणण्याचं कारण बरेच वर्षानी ते आपलं घर सोडून कलकत्यात राहायला गेलं.पण इतकी वर्ष मुंबईत राहिल्याने त्यांच्या सर्व मुलाना मराठी अगदी अस्खलीत येत होतं.कदाचीत हे मुळचे बंगाली आहेत असं सांगणं पण जरा कठीण झालं असतं.
लेखकबेचवसुमारयांनी बुधवार, 06/08/2008 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
.....स्व.सुरेश भटांची माफी मागुन.....त्यांच्या "रंग माझा वेगळा" ह्या रचनेचे ई-डंबन
ढोसुनि गुत्त्यात सार्या ब्रँड माझा वेगळा
गुंतुनि गुंत्यात सार्या हँड माझा मोकळा
कोण जाणे कोठुनी ह्या बाटल्या येता पुढे
मी असा की होतसे मग ओवळ्याचा सोवळा
राहती माझ्यासवे हे बेवडे भूतांपरी
कोणते हे मद्य ज्याचा लागला आम्हा लळा
कोणत्या काळी कळेना मी उठाया लागतो
लुडकणारा मी कुठेही ठार ऐसा वेंधळा
सांगते 'तात्पर्य' माझे भणंग ही माझी दशा
बेवडा मी फाटका मी अस्थि