Skip to main content

रानात वनात

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 06/08/2008 18:14 या दिवशी प्रकाशित केले.

रानात वनात

रानात घुमले
मेघांचे तराणे
सोबत तयांच्या
थेंबाचे नाचणे

बावर्‍या पानांना
झाडाची सोबत
साथीला चालले...
हे.. पाऊसगाणे

हरपले भान ..
धुंद रानवन
हिरव्या रानाचे
भुईला उखाणे

आपुल्या रायाची
लागुनी चाहुल..
हळूच लाजली
हिरवी.... कंकणे

विझल्या मनात
जागली जाणीव
सावळे आकाश
झाले रे दिवाणे

रात्रीच्या साथीला
पावसाची धून
मनात फुलले
प्रीतिचे चांदणे
-सोनाली जोशी

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1327
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया