Skip to main content

महागाई कमी करण्या साठी आपण आता आपल्या परी ने काय काय करु शकतो?

लेखक नोहिद सागलीकर यांनी शनिवार, 09/08/2008 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रां नो प्रश्न सरळ आहे यात सरकार काय करु शकतं महागाई कमी करण्या साठी या पेक्षा आपण वयक्तिकरीत्या काय करु शकतो याच्या वीषयी थोडस लीहावं , उदा. एकवेळचे जेवण कमी करणे , अर्धे कपडे कमी वापरने, .............................. कींवा इतर काही वास्तव,............... उपाय..................

आयआयटीत मराठी ऐट!

लेखक एडिसन यांनी शनिवार, 09/08/2008 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
कालच आयआयटी मुंबईचा ४६वा पदवीदान समारंभ पार पडला. आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या मुख्य अतिथी होत्या. या समारंभात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आयआयटीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण! आजच्या मटामध्ये आलेली ही बातमी पण हेच सांगून जाते.
विशेष म्हणजे २००८-०९ या शैक्षणिक वर्षात बी.टेक्.,एम्.टेक्.,ड्युअल डिग्री आणि पी.एच्.डी.

माफक ईच्छा...मिपाधर्म वाढवावा......

लेखक नि३ यांनी शनिवार, 09/08/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
(जो लेख गमत्या ने लिहला आहे त्याच विषयावर मि त्याच्या दोनेक दिवस आधी लिहायचा विचार केला होता पण काही कारणास्तव लिहणे जमले नाही.

इथले प्रत्येक क्षण.!

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 09/08/2008 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
इथले प्रत्येक क्षण मानवी संवेदनांना हादरा देणारे असतात... आणि तरीही सर्वजण नेहमी मरुन जगत असतात. इथले प्रत्येक क्षण... दंगली होतात, बॉम्बस्फोट होतात. भेसळयुक्त सिमेंटच्या इमारतीखाली आणि कधी पावसाच्या मा-याखाली माणसे शेकड्याने मरतात. इथले प्रत्येक क्षण... जखमी, मृतांच्या नावाने अनुदान जाहीर केली जातात. मदतीच्या नावाखाली मंत्री स्वत: चीच खळगी भरतात. इथले प्रत्येक क्षण... लोकही थोड हळहळतात सरकारच्या नावाने बोटे मोडतात. नंतर पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागतात. इथले प्रत्येक क्षण... स्वप्न ऊध्वस्त होताना बघतात. जीव मुठीत धरून जगतात. हे आता नित्याचच झाल आहे असेच सारे म्हणतात...

भुमीपुत्र...

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 09/08/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
भुमीपुत्रच भूमीहीन झालाय, दाही दिशांना वणवण फिरतोय. लोकांचे पोट भरणाराच आज उपासमारीने मरतोय. शेतक-याचा पोर उपाशी शेतक-याच्या देशामध्ये. कुपोषणाच्या वेषात बालमृत्यू थैमान घालतोय. बँकांकडून कर्ज घेतले दुष्काळाने लादली नादारी. घाव हा दुहेरी प्रवृत्त आत्महत्येला करतोय. सरकारी अनुदाने होत आहेत मंत्र्यांच्या तिजोरीत बंद. कर्जवसुलीसाठी शेतक-यांच्या घरादारावर नांगर फिरतोय. श्रीमंतांच्या, हिरोन्च्या भल्यासाठी नवस सायास केले जातात. गरीब शेतक-याला आपण पद्धतशीर विसरतोय.

उघड दार देवा आता...

लेखक अंकुश चव्हाण यांनी शनिवार, 09/08/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आता तळीरामाला मार्ग कोणी दावा... उघड दार देवा आता उघड दार देवा. पिते दारू डोळे मिटुनी जात बेवड्याची, मनी त्याच्या भीती का हो नशा चढण्याची? सरावल्या पायांनाही कंप का सुटावा? उघड दार देवा आता उघड दार देवा. रोज रात्री करतो देशी बारची हा वारी. घरी मात्र जाताना का शोधी दिशा चारी? बेहोश होई रोज करूनी मदिरेची सेवा. उघड दार देवा आता उघड दार देवा. रस्त्यावरूनी चालताना मोजतो हा पावले. झिंग चढल्यावाचून घरी जाणे नाही भावले. शेजा-याच्या दारातही अपुला दरवाजा दिसावा. उघड दार देवा आता उघड दार देवा.

श्वास

लेखक पेशवे बाजीराव तिसरे यांनी शनिवार, 09/08/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याच आठवांमधुनी सखे काही श्वास तरंगून गेले घडा रिताच राहीला आयुष्याचा अन प्राण कलंडून गेले हात तुझे ते हातांमधले एकांती स्मरुनीया गेले रंग हळवे ते शपथांचे भासात विरुनीया गेले आधार वाटणारे तुझे ते डोळे काल स्वप्नात दिसुनीया गेले दडपलेले दुःख मनातील शब्दात उतरुनिया गेले