Skip to main content

तुमची "लाडकी" यमी आज टीव्हीवर

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 12/08/2008 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
बय्राच खरडींना उत्तरं देण्यापेक्षा मी जाहीर करून टाकते की आज झी २४ तास वर माझी मुलाखत दाखवणार आहेत. पण संध्याकाळी ४:३० (भारतीय वेळेनुसार)! शक्य झालं तर रेकॉर्डींग कुठेतरी उपलब्ध करून देईन, त्या वेळी हापिसातून मिपा वाचणाय्रांसाठी! यमी /अदिती / यमी आज्जी वगैरे वगैरे वगैरे! अवांतर (पण महत्त्वाचं): माझं खरं नाव संहिता जोशी आहे (आणखी एक जोसपड मिपावरची)! :-)

परमसखा मृत्यू : किती आळवावा...

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 12/08/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
विशेष सूचना- सदर लेख हा आजचा सुधारक या वैचारिक मासिकात ऒगस्ट २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. लेखाच्या खालील टिपणी ही आजच्या सुधारकच्या संपादकांची आहे. सदर लेख हा चर्चेचा प्रस्ताव म्हणुन जशाच्या तसा देत आहे . या वरील प्रतिक्रिया या आजच्या सुधारक च्या संपादकांना कळविल्या जातील.

विचाराच्या पलिकडले.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 12/08/2008 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रो.देसाई आज आपल्या धाकट्या भावाला तळ्यावर घेवून आले होते.मझी त्यांची पहिलीच ओळख झाली होती.बोलता बोलता कुठचा विषय कुठे गेला ह्याचं भानच राहिलं नाही. मी त्यांच्या भावाला सहजच म्हणालो, "कॉलेजच्या जीवनातला एखादा संस्मरणीय अनुभव आठवत असेल तर सांगा" थोडासाचा विचार करून ते म्हणाले, "मी तुम्हाला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अनुभव अवश्य सांगतो. एकोणीशे सत्तरच्या दर्म्यान मी कॉलेज मधे प्रवेश केला.देवाच्या अस्थित्वावर माझा विश्वास अजूनही जागच्याजागी होता.पण शिकत असताना एका क्लास मधे मी माझ्या श्रद्धेच्या पलिकडे जावून पाहिलं आणि खरं सत्य म्हणजे काय ते मला कळून चुकलं. माझा

खुळा अश्वत्थामा

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 11/08/2008 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिन्यापासून माझा चातुर्मास सुरु होतो. रोजचे काम आटपून घरी जायला उशीर होतो. आहे त्या वेळात जास्तीतजास्त विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो.

विनम्र राहिल्याने अंगात एक प्रकारची क्षमता येते.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 11/08/2008 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
एका विद्वान माणसाने मला सांगितलं, "तू काहीच करीत नाहिस असं नाही.स्वतःच्या दुःखाला एव्हडं सामोरं जावं हेच मुळात खूप कठिण काम आहे." कोकणातला पाऊस सर्वाना माहित आहे.एकदां पडायला लागला की मग मागे वळून बघणार नाही. तो अति प्रचंड वृष्टीचा दिवस होता.दिवसाच रात्र झाली आहे असं वाटत होतं.ढगानी सारं आकाश व्यापलं होतं.सर्व घराच्या दारं खिडक्या लाऊन लोक घरात घुडूप होऊन बसले होते.अशा प्रसंगी माझ्या पतिना एका एकी हृदयाचा झटका आला.कुणाला मदतीला बोलवायला जायला शक्यच नव्हतं.पावसाच्या कहराबरोबर माझ्याही घरात असाच कहर झाला होता. ती घटना होऊन गेल्यावर नंतर जवळ जवळ तीन चार दिवस पाऊस सतत पडत होता.मी घाराच्या पडवीत

हापिसात टायमपास करण्याच्या युक्त्या

लेखक लबाड मुलगा यांनी सोमवार, 11/08/2008 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या.... . डोळे मिटा............... .. .कान कोरा............ .. .आधी उजवा ... मग डावा....परत उजवा मग डावा ऽ दहा पाच वेळा झाले की मग हातात हात गुंफुन सरळ वर न्या .... अग आइ ग म्हणुन जोरदार आरोळी द्या ऽऽ हाताचा तळवा नाका वर घासा जोरदार नाक दुखेपर्यत ऽऽ खुर्चीवर उभे राहा तोल संभाळुन ऽऽ परत बसा माण मोडा बोटे मोडा ऽऽ छ्या असे जोरात म्हणुन कागद उडवा परत गोळा करा ऽऽ शांत बसा एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या.... . डोळे मिटा............... .. (तुम्ही अजुन तुम्हाला माहित असलेल्या युक्त्या टाका: मी अजुन पाणी ओततो)