प्रारब्ध आणी कर्म
काही विचार स्वताःचे आणी काही दुसर्यांचे, आयुष्यातील यशापयशाचा आढावा घेताना डोक्यात उडालेला गोंधळ.
ज्ञात अज्ञात लेखकांचे आभार.
" कात्रजच्या घाटात वरती डोंगरावर काही माकडे खेळत होती, दोन तरुण मुलं मोटर सायकल वर सातारकडे जात होती मोटरसायकल बोगद्यात प्रवेश करत असताना अचानक मोठा दगड वरून गडगडत आला आणी पाठीमागे बसलेल्या तरूणाच्या डोक्यात पडला आणि मृत्यूला कारणीभूत झाला". रेडिओवर ही बातमी कदाचित तुम्ही सुद्धा ऐकली आसेल.
मनात विचार आला आसे का? विचार म्हणजे काय असते? मनातल्या मनात नं कळत चाललेली प्रश्नोत्तरे…… काय चुकलं त्याचं? माकडांचं आणी त्या तरूणाच मागच्या जन्मीचं काही वैर होतं का?
ऊन्हाचा तुकडा
चकचकता कशाच्याही खाली न दडणारा
उन्हाचा तुकडा
बिन-तक्रार हातात येईल
असं वाटलं होतं
पण ते काही खरं नव्हतं
या उन्हाच्या तुकड्यावर फक्त माझा
असेल हक्क.
मनातला ऐवज..
मनातला ऐवज..
दिलाय उधार
ठेव जपून...
वाटलं तर
परत कर..
कातर सांजवेळ
डोळ्यातलं काजळ
स्मिताच मोहळ
..
अन् नाहीच जमलं तर
उधळूही नको
फक्त कुरवाळत राहा
एक एक भाव जपत राहा..
काव्यरस
दिवाळी अंक 2020
1992 पासून मी दरवर्षी दिवाळी अंक विकत घेतो. सुरूवातीला काही वर्षे, म्हणजे साधारण 2006 पर्यंत, हवे असलेले सगळे अंक लगेच विकत घेत होतो, पण 2006-07 च्या सुमारास समजले की, डोंबिवली येथे मार्च-एप्रिल मध्ये, हेच दिवाळी अंक, कमी पैशांत मिळतात. त्यामुळे, 2-3 वाचनालयातून हे अंक गोळा करतो.
नमनाला, इतके तेल भरपूर झाले.
आता मुळ मुद्द्याकडे येतो....
ह्यावर्षी खालील अंक घेतले
1. उत्तमकथा
2. आवाज, पाटकर
3. साप्ताहिक सकाळ
4. लोकमत, दीपोत्सव
5. दीपावली
6. लोकसत्ता
7. जत्रा, मेनका प्रकाशन
8. जत्रा, महाराष्ट्राची
9. किस्त्रीम
10. धनंजय
11. मौज
12. माहेर
13. ऋतुरंग
14. मोहिनी
15. पद्मगंधा
16.
मिसळपाव