Skip to main content

चतुराई

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 16/08/2008 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
चतुर. एक साधा किटक. पण थेट काही दशके मागे नेणारा. शाळेतले दिवस आठवायला लावणारा. फुलपाखरे, टाचण्या आणि चतुर हे विशेष कुतुहलाचे विषय. काही मुले फुलपाखरे पकडायची व बाटलीत ठेवायची. मग ती मेल्यावर पंख पुस्तकात घालायचे! हा प्रकार मला कधीच आवडला नाही. त्या काळी प्रकाशचित्रणाचा नाद नव्हता आणि अक्कलही नव्हती (अजुनही नाहिये म्हणा; पण हातात क्यामेरा तर आहे?) मला चतुर आणि टाचण्या अधिक आवडायच्या. चतुर बरे. दबकत जाऊन पकडायचे आणि शेपटाला बारीक घागा बांधुन पतंगासारखे उडु द्यायचे.

(१६ ऑगस्ट.)

लेखक केशवटुकार यांनी शनिवार, 16/08/2008 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित कवितांना मिळणारा राजाश्रय बघून विडंबकाला वाटले आपणही फेकुन मारावे एक विडंबनाचे गाढव .

लोकायतचे सहर्ष स्वागत...!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 16/08/2008 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, कालच पार पडलेल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहुरावर लोकायत डॉट कॉम हे मायमराठीतील एक नवे संकेतस्थळ स्थापन झाले आहे. मिसळपावचेच तांत्रिक सल्लागार श्री नीलकांत यांनी हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मी वैयक्तिकरित्या, तसेच समस्त मिसळपाव परिवारातर्फे नीलकांतचे व लोकायत डॉट कॉमचे सहर्ष स्वागत करतो. हे संकेतस्थळ संगणक, संगणकीय तंत्र, तसेच आंतरजाल इत्यादी विषयांवरील तांत्रिक माहितीच्या देवघेवीकरता स्थापन झालेले व त्याला वाहिलेले संकेतस्थळ आहे.

१६ ऑगस्ट.

लेखक रामदास यांनी शनिवार, 16/08/2008 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनाला मिळणारा लोकाश्रय बघून कविला वाटले आपणही लिहावी एक कविता.
Taxonomy upgrade extras

तांडव..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 16/08/2008 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्य तांडव सुरू जाहले करूनी ललकार नित्य होती वार जैसे घुमे तलवार.. वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार कडाडकडकड अभ्र कोसळे सोसूनी प्रहार जलौघ बरसे वायूसंगे होऊनी बेजार कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार 'जलद' चालला बरसत धारा टाकीत फुत्कार कसा जाहला हिरवाईचा त्यासी साक्षात्कार युद्ध होते ग्रिष्माशी, तो होता ऐसा स्वार जाती धावूनी हाक देण्या, अवनीची पुकार रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार.. - प्राजु

रशियाचा धडा

लेखक भास्कर केन्डे यांनी शनिवार, 16/08/2008 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात रशियाने एका धडाक्यात जवळ जवळ अख्खा जॉर्जिया पदक्रांत केला. कारण काय तर दक्षिण-ओसेटिया या जॉर्जियाच्या फुटीर भागात जॉर्जियाने पुन्हा आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती. त्यात जॉर्जिया पडला अमेरिकेचा मित्रदेश! त्यांचा प्रभाव आपल्या परसदारात वाढू देणे रशियाच्या पचणी पडणारे थोडेच होते! मग काय... शेकडो रशियन रणगाडे निघाले.

" एकद्दाच्यं कायथे होन ज्यावूद्दये " -इती, पिंग-पॉन्ग-चू

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 15/08/2008 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
"शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड" अशी एक म्हण आहे.मांसाहाऱ्यांसाठी प्राण्याना कुठ्ल्या दिव्यातून जावं लागतं ह्याचा जरा कानोसा घेतला.आणि मग ठरवलं, " एकद्दाच्य कायथे होन ज्यावूद्दये " -इती, पिंग-पॉन्ग-चू दिलीप प्रभावळकर.

स्वातंत्र्यदिनाची ही कविता लवकरात लवकर शिळी होवो...

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 15/08/2008 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली तेव्हा मी 'स्वातंत्र्य पन्नाशीचा अभंग' नावाची कविता लिहिली. स्वातंत्र्यास वर्षे| जाहली पन्नास केला सत्यानास| भामट्यांनी अशी तिची सुरवात होती. स्वातंत्र्याची साठी पूर्ण झाली तेव्हा पहिल्या दोन ओळी बदलल्या. अन्य काही किरकोळ बदल केले. आशयाच्या दृष्टीने दहा वर्षात फारसा फरक पडला नव्हता. ती कविता खाली देत आहे. आज स्वातंत्र्याला एकसष्ट वर्षे पूर्ण होत आहेत.
Taxonomy upgrade extras

स्वातंत्र्य तर मिळाले, पण...??

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 15/08/2008 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्य तर मिळाले इंग्रज तर पळाले, पण... दहशतवाद जन्मला ...तो येथेच आहे. भ्रष्टाचार जन्मला ... तो येथेच आहे. स्वातंत्र्य तर मिळाले, स्वराज्य तर मिळाले, पण... महागाई वाढली .. ती जात नाही बेरोजगारी वाढली ..ती जात नाही स्वातंत्र्य तर मिळाले, लोकशाही तर मिळाली, पण... लोकसंख्या वाढली ... ती वाढतेच आहे बेईमानी वाढली .. ती वाढतेच आहे. स्वातंत्र्य तर मिळाले इंग्रज तर पळाले, पण... इंग्रजी येथेच आहे ... ती जाणार नाही गरीबी येथेच आहे ...ती जाणार नाही
Taxonomy upgrade extras