Skip to main content

आहे आणि नाही असा!

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 18/08/2008 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
आहे आणि नाही असा! . संतत पडणारा पाऊस.. आहे आणि नाही असा! पाना पानावर ओलावा.. आहे आणि नाही असा! एकच थेंब खरा.. इथे तिथे विखुरलेला.. भुरभूर वारा; बोचरा, कापरा! थरथरती फांदी; झटकत पानांना..? टिप्प... एक थेंब; थेंबांना जोडणारा.. एक थेंब; थेंबांनी जोडलेला... आहे आणि नाही असा!!! =================== स्वाती फडणीस......... ०४-०८-२००८
Taxonomy upgrade extras

दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही..!

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 18/08/2008 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही. कांगारुंशी त्यांच्या देशी लढतो. कधी केनिया बांगलादेशही नडतो. या हरण्याचे कारण उमगत नाही. या हरणे म्हणवत नाही. कसोटी, वनडे, २०-२० चे तुकडे. त्यावर नाचे बीसीसीआयचे घोडे. या घोड्याला लगाम शोधीत आहे, आयसीसीला गवसत नाही. तेंडल्या अनफ़िट फ़ॉर्मात नाही युवी. पाटा पीचवर झहीर भज्जी हेवी. पराभवाला हजार कारणे देतो. पण कबूल करवत नाही. फ़ायनल मॅचला आता हसतो थोडे. मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे. या खेळाला विजयाचाही आता. मेघ पालवत नाही. -- अभिजीत दाते मूळ गीत - दिवस असे की कोणी माझा नाही कवी - संदिप खरे

नारळाच्या वड्या

लेखक ऋचा यांनी सोमवार, 18/08/2008 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर मी बाहेरुन(चितळे,काका हलवाई,इ.) काही न आणता घरीच गोड काहीतरी बनवायचे ठरवले. माझी ही पहीलीच गोड पा.कृ. आहे. तरी ह्यात काही बदल करुन अजुन चांगली कशी बनवता येईल हे सांगावे. साहीत्य : नारळाचा चव(खोवलेला नारळ) १ वाटी,साखर १ वाटी ,दुध(सायी सकट),वेलदोडे पुड. कृती : प्रथम नारळाचा चव आणि साखर एकत्र करुन घ्यावे त्यात सायीसकट दुध-साधारण आर्धी वाटी - घालावे. हे मिश्रण शिजवत ठेवावे. आणि हलवत रहावे नाहीतर करपते. मिश्रणाचा रंग बदलला (चॉकलेटी दिसते) आणि त्याचा गोळा तयार झाला की त्यात वेलदोडा पुड घालावी (लहान अर्धा चमचा).

आज १५ ऑगस्ट ना..!

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 18/08/2008 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ ऑगस्ट ना मित्रा. आनंदाने भरून आलाय ऊर. पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर.. आज १५ ऑगस्ट ना मित्रा, सांग भारतात स्टेट्स आहेत किती ? असतील पंचवीस तीस. आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..! आज १५ ऑगस्ट ना मित्रा, सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ? कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही पण ए. आर.
Taxonomy upgrade extras

('माथा' फिरे कुणाचा __ )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 18/08/2008 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
----------------------------------------------------------------------('माथा' फिरे कुणाचा, आक्रंदतात कोणी ) चालः काटा रुते कुणाला ----------------------------------------------------------------- 'माथा' फिरे कुणाचा, आक्रंदतात कोणी तुज फूसही मिळावी हा राजयोग आहे ! कळे कधी कुणाला भाषा आपुली मराठी ? हातातल्या दगडांचा मग एक मार्ग आहे ! दंगा करु पहातो होण्यास अनर्थ तेथे नेता सदाकदाही वेठिस धरत आहे ! हे काय करतो मी, काहिच समजेना काढुनी सर्व पाट्या मी आजमस्त आहे. -------------------------------------------------------------------

काही स्केचेस

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 18/08/2008 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर , नमस्कार ! काही स्केचेस जोडत आहे. उदय सप्रे

अंतर थोडेसे

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 18/08/2008 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य आणि असत्य ह्यांत फक्त एका अक्षराचे अंतर अशाच छोट्याशा अंतरामुळे छोट्या नारायणाचा जीव गेला. जीवन आणि मृत्यु ह्यात फक्त एका श्वासाचे अंतर पण मृत्यु फक्त शरीरारालाच येतो. जीवन पुढे चालू रहात असेल कां? उधळपट्टी, कंजुषी आणि काटकसर ह्यात फक्त गरजेचे अंतर गरज नसतांना केलेला खर्च
---- उधळपट्टी
गरज असतांना न केलेला खर्च
---- कंजुषी
गरज तोलून मापून केलेला खर्च
---- काटकसर
आवड आणि नावड ह्यात फक्त चवीचे अंतर उगाच नाही म्हणत, नावडतीचे मीठ अळणी कवी आणि लेखक ह्यात आळशीपणाचे अंतर आळशी लेख
Taxonomy upgrade extras

सैनिक हो! तुमच्या साठी....

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 18/08/2008 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच माझ्या एका मित्राचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर माझ्या घरी आला होता.माझा मित्र डॉक्टर-सर्जन- आहे आणि हा मुलगा डॉक्टर- सायकॉलॉजीस्ट- आहे. गप्पा मारता मारता मुलगा म्हणाला, "आलेल्या संकटाला तोंड देवून पुनरप्रस्थापीत होण्याची निसर्गाने मनुष्याला दिलीली शक्ति" ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूंया. मला ह्या विषयावर अगदीच तुटपुंजं ज्ञान असल्याने मी ऐकून घेण्याचीच जास्त भुमीका घेतली. सुनील देवधर,हा माझा मित्र कारगीलच्या युद्धात जखमी जवानाना ट्रिटमेंट देवून त्यांना बरं करण्याच्या सेवेत होता.

नारळीभात..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 18/08/2008 05:54 या दिवशी प्रकाशित केले.
नारळीभाताची पाककृती अभिज्ञ ने मागितली होती. इथे माझी रेसिपी देत आहे. साहित्य : १. १ वाटी बासमती तांदूळ. २. तूप २ टे, स्पून ३. लवंगा ५-६ ४. वेलची ३-४ ५. गूळ(किसून किंवा चिरून) सव्वा वाटी ६. ओल्या नारळाचा चव १ वाटी. ७. ड्राय फ्रुट्स कृती : १. प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन त्याचा मऊ मोकळा भात शिजवून घ्यावा. आणि तो गरम असतानाच एका तसराळ्यात पसरून ठेवावा.. पसरताना त्याची शिते मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी. २. एका जाड बूडाच्या पातेल्यात तूप घालावे. ते गरम झाले की , त्यात लवंगा आणि वेलची घालावी. त्यातच काजूचे तुकडे, बदामाचे काप इ. सुका मेवा परतून घ्यावा. खूप लाल करू नये. ३. आता त्यात गूळ घालावा.